आता लागणार शेतकऱ्यांचे सौर कृषी पंप| kusum Solar GR

सौर कृषी पंपाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा, आता लागणार शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषी पंप kusum solar GR आला.

kusum Solar GR

शेतकऱ्यांसाठी दिवसा ८ तास सिंचन करता यावं यासाठी राबवली जाणारी महत्वाची योजना म्हणजे कुसुम सोलर पंप योजना.

राज्यातील शेतकऱ्यांचा या योजनेकडे खूप मोठ्या प्रमाणात कल आहे मात्र निधी आणि शासनाची उदासीनता यामुळे अतिशय मंद आशी pmkusum या योजनेची अंमलबजावणी सुरू होती.

आज अखेर या योजनेसाठी निधी वितरीत करण्यात आल्याने आता योजनेच्या अमलबजावणी ला वेग येण्याची शक्यता आहे.

Kusum Solar GR 2022

राज्यातील कृषी पंप विज जोडण्याचे सौर ऊर्जाद्वारे विद्युतीकरण करण्याच्या अभियाना अंतर्गत केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय हा ऊर्जा मंत्रालय नवी दिल्ली यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवम उत्थान महा अभियान कुसुम ( PM Kusum ) देशभरात राबविण्यात येत आहे.

या अभियानाच्या अंतर्गत घटक ब मध्ये मंजूर एकूण 1,00,000 पारेषण विरहित सौर कृषीपंप मंजूर केले असून त्याची अमलबजावणी महा ऊर्जाद्वारे करण्यात येत आहे.

कुसुम योजनेच्या राज्यस्तरीय सुकाणू समितीच्या दिनांक 10 फेब्रुवारी 2022 रोजीच्या बैठकीमध्ये वित्तवर्ष 2022 23 मध्ये कुसुम टप्पा दोन अंतर्गत 50.000 नग सौर कृषी पंप अस्थापित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

त्यानुसार दिनांक 13 एप्रिल 2022 रोजी 14 पुरवठादारांना आदेश निर्गमित करण्यात आले असून अंमलबजावणी वेगाने सुरू केली आहे.

कुसुम टप्पा 2 अंतर्गत 46997 लाभार्थ्यांनी लाभार्थी हिस्सा भरलेला असून त्यामधील आस्थापित 29810 पंपापैकी सर्वसाधारण वर्गवारीच्या लाभार्थ्यांसाठी 26399 पंप सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडील लाभार्थ्यांसाठी 2842 पंप व आदिवासी विकास सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडील लाभार्थ्यांसाठी 575 पंप आस्थापित करण्यात आले आहेत.

त्याचप्रमाणे 3240 स्थळांच्या ठिकाणी पुरवठादारांनी साहित्याचा पुरवठा केला असून सदर पंप आस्थापित करण्यात येत आहेत.

सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकरिता राज्यात शासनाच्या अर्थसंकल्पीय अनुदानातून 10 टक्के हिस्सा देण्यात येणार असून 10 टक्के लाभार्थी, 30 टक्के केंद्रशासनाचे परस्पर प्राप्त होणारे अर्थसहाय्यक अनुदान व उर्वरित 30 टक्के महावितरण कडील एसक्रो खात्यात वाढीव वीज विक्रीवरील करामधून परस्पर जमा होणाऱ्या रकमेतून होत आहे.

या नुसार सर्वसाधारण लाभार्थी साठी आस्थापित होणाऱ्या सर्व कृषी पंपाच्या सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांचा राज्य शासनाच्या अनुदानाचा 10 टक्के हिस्सा उपलब्ध करून द्यायचा आहे.

या साठी या शासन निर्णयानुसार ₹15.27 कोटी एवढा निधी वितरीत करण्यास मंजुरी मिळाली आहे.

या साठी या शासन निर्णयानुसार ₹22.91 कोटी एवढा निधी वितरीत करण्यास मंजुरी मिळाली आहे.

प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान (कुसुम) योजना अंतर्गत महाऊर्जाला आदिवासी (TSP)घटकाच्या सौर कृषिपंपांच्या लाभार्थ्यांच्या शासन हिस्स्यापोटी व

महाऊर्जाला अनुसुचीत जाती (SCP) घटकाच्या सौर कृषिपंपांच्या लाभार्थ्यांच्या शासन हिस्स्यापोटी सन 2022-23 मध्ये अनुदान वितरित करण्यास मंजुरी दिली आहे.

सदर रक्कम अदा करण्यासाठी श्री नारायण कराड उपसचिव ऊर्जा उद्योग ऊर्जा व कामगार विभाग मंत्रालय मुंबई यांना नियंत्रक अधिकारी व श्री ना रा ढाणे राणे अवर सचिव उद्योग ऊर्जा व कामगार विभाग मंत्रालय मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.

शासन निर्णय येथे पाहा.

Kusum solar gr pdf link

प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान (कुसुम) योजना अंतर्गत महाऊर्जाला सर्वसाधारण घटकाच्या सौर कृषिपंपांच्या लाभार्थ्यांच्या शासन हिस्स्यापोटी सन 2022-23 मध्ये अनुदान वितरित

प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान (कुसुम) योजना अंतर्गत महाऊर्जाला सर्वसाधारण घटकाच्या सौर कृषिपंपांच्या लाभार्थ्यांच्या शासन हिस्स्यापोटी सन 2022-23 मध्ये अनुदान वितरित करण्याबाबत..

प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान (कुसुम) योजना अंतर्गत महाऊर्जाला सर्वसाधारण घटकाच्या सौर कृषिपंपांच्या लाभार्थ्यांच्या शासन हिस्स्यापोटी सन 2022-23 मध्ये अनुदान वितरित करण्याबाबत

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202208231311029610.pdf

प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान (कुसुम) योजना अंतर्गत महाऊर्जाला आदिवासी (TSP)घटकाच्या सौर कृषिपंपांच्या लाभार्थ्यांच्या शासन हिस्स्यापोटी सन 2022-23 मध्ये अनुदान वितरित करण्याबाबत….

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202209211158105510.pdf

प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान (कुसुम) योजना अंतर्गत महाऊर्जाला अनुसुचीत जाती (SCP) घटकाच्या सौर कृषिपंपांच्या लाभार्थ्यांच्या शासन हिस्स्यापोटी सन 2022-23 मध्ये अनुदान वितरित करण्याबाबत….

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202209261512444210.pdf

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *