Kusum solar 2 – या टप्प्यात राज्यात ५०,००० पंप लागणार, नोंदणी सुरू

शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हाव यासाठी राज्यात प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप ( pm kusum solar yojana ) योजनेअंतर्गत चालू वर्षात १ लाख सोलर पंप वाटपाचे उदिष्ट ठेवून ही योजना सुरू करण्यात आली आहे.

Kusum solar 2

राज्यात राबविल्या जात असलेल्या कुसुम सोलर पंप योजनेच्या घटक ब अंतर्गत सौर कृषी पंपासाठी प्राप्त झालेल्या अर्जामधून लाभार्थी निवड आणि सौर पंप स्थापण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.

Kusum solar pump yojana Maharashtra 2022

राज्यात ही योजना महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण अर्थात महाऊर्जा ( Mahaurja MEDA) मार्फत राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून लोकसंख्येच्या प्रमाणात राज्यांना कृषी सौर पंप ( solar pump ) दिले जातात.

या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यात जवळपास ५०,०००  सौर कृषी पंप दिले जाणार आहेत, तर योजनेच्या पहिल्या टप्प्यात जवळपास २७५० सौर पंप बसवण्यात आले आहेत अशी माहिती महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण अर्थात महाऊर्जा कडून देण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत राज्यात शेतक-यांनी ऑनलाईन नोंदणी ( pm kusum registration ), कागदपत्रांची प्रक्रिया व पैशाचा भरणा ( pm kusum payment) प्रक्रिया सुरू आहे.

ज्यामध्ये राज्यातून साधारण पने १ लाख ८० हजार नोंदणी झाली असून १ लाख ६६ हजार शेतकऱ्यांनी आपली कागदपत्र अपलोड केली आहेत.

https://grnshetiyojna.in/kusum-solar-pump-yojana-maharashtra-2022/

यामध्ये मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. लातूर, नांदेड, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यात ५०,००० च्या वर तर औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी जिल्ह्यात जवळपास 34 हजारांवर नोंदणी,अर्ज प्राप्त झाले आहेत.

यापैकी पात्र झालेल्या १३,३०० लाभार्थ्यांना हिस्सा भरण्यासाठी एसएमएस द्वारे कळविण्यात आले आहे. या शेतकऱ्यांना पैशाचा भरणा करण्यासाठी अंतिम मुदत ही ३१ मे २०२२ असणार आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना आपला ऑनलाईन लाभार्थी हिस्सा भरावा लागणार आहे.

शेतकरी आपला लाभार्थी हिस्सा ऑफलाईन पध्द्तीने DD काढून जवळच्या महाऊर्जा यांच्या कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे.

शेतक-यांना कुसुम सोलर (pm kusum ) च्या या पोर्टल वर अर्ज करण्यास, लाभार्थी हिस्सा भरण्यास किंव्हा कंपनी निवड करण्यास अडचणी आल्यास महाउर्जा च्या दूरध्वनी क्रमांकावर सकाळी ०९:३० ते सायंकाळी १७:३० संपर्क करावा अशे आवाहन महाऊर्जा कडून करण्यात आले आहे.

MAHAURJA MEDA कार्यालय संपर्क खालील लिंक वर मिळतील

Click here

पहिल्या टप्प्या अंतर्गत लातूर विभागातील 513 सौर कृषी पंप बसण्याचं काम पूर्ण झाले तर औरंगाबाद विभागीय कार्यालयांतर्गत 721 सौर कृषी पंप बसविण्यात आले आहेत.

तर या योजनेच्या दुसऱ्या टप्प्या अंतर्गत राज्यात 50 हजार सौर कृषी पंप बसविले जाणार आहेत.

मात्र अहमदनगर, औरंगाबाद, बीड, बुलढाणा, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, पुणे, सोलापूर, वाशिम, जळगाव आणि यवतमाळ या जिल्ह्यात अधिक नोंदणी झाली असल्याने कोठा पूर्ण झाला आहे

तर अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, कोल्हापूर, नागपूर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, ठाणे आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये कोठा शिल्लक असल्याने सौर कृषी पंप नोंदणी सुरू आहे, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असे आवाहन देखील महाऊर्जा कडून करण्यात आलेले आहे.

4 thoughts on “Kusum solar 2 – या टप्प्यात राज्यात ५०,००० पंप लागणार, नोंदणी सुरू”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *