कुसुम सोलर ( pm kusum yojana Maharashtra) योजनेत तांत्रिक कारणाने फेल झालेले किंव्हा दुबार पेमेंट ( Kusum Mahaurja Payment ) परत मिळविण्यासाठी महाउर्जा कडून पत्रक ( Mahaurja circular ) काढण्यात आले आहे.
Kusum Mahaurja Payment circular
7 मे 2022 पासून शेतकऱ्यांना कुसुम ( Kusum solar) योजनेअंतर्गत पेमेंट ऑप्शन आलेला आहे. शेतकऱ्याने पेमेंट करायला सुरु केलं होतं परंतु सुरुवातीला पेमेंट करत असताना पहिल्यांदा शेतकऱ्याचा पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर सुद्धा बर्याच शेतकर्यांना पुन्हा एकदा पेमेंट ऑप्शन दाखवली जात होती.
तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या पेमेंट करताना पेमेंट फेल झालं होतं अशा शेतकर्यांनी ही पुन्हा एकदा त्याच्यामध्ये दुबार पेमेंट केलं होतं. अशा सर्व शेतकऱ्यांना एक पेमेंट परत मिळविण्यासाठी कुसुम महाउर्जा कडून पत्रक काढून परतावा अर्ज करण्याच आवाहन करण्यात आले आहे.
यासाठी शेतकऱ्यांना ac@mahaurja.com या मेल आयडी वरती मागणी अर्ज करण्याची सूचना देण्यात आलेली आहे.
त्याच्यासाठी एक word आणि पीडीएफ मध्ये फाइल देण्यात आलेले आहे
प्रधानमंत्री कुसुम कृषी सौर पंप योजना दुबार अथवा अधिक वेळेस महाऊर्जा खात्यावर जमा झाली असल्यास अतिरिक्त जमा रकमेसाठी परतावा मागणीअर्ज
या अर्जा मध्ये लाभार्थ्यांचा पूर्ण नाव द्यायचे आहे. संपूर्ण पत्ता द्यायचा आहे. VAN अर्थात आभासी नंबर व MK आय डी द्यायचा आहे.
आपण केलेल्या पेमेंट तपशील यात पेमेंटची दिनांक, बँकेचे नाव, शाखा तपशील, लाभार्थी बँक खाते क्रमांक, पेमेंट ची रक्कम पेमेंट, पेमेंट कशा प्रकारे केलेले त्याचा ट्रांजेक्शन आय डी अशी सर्व डिटेल या अर्जात द्यायची आहे.
आपण एक-दोन-तीन जेवढे पेमेंट केले असतील त्या पूर्ण पेमेंट ची माहिती आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे आणि अर्जदाराची स्वाक्षरी करायचे अशा प्रकारचा हा विहित नमुन्यातील अर्ज आपल्याला दिलेल्या मेल आयडीवर ती स्कॅन करून पाठवायचे आहेत.
अशी माहिती या पत्रकात दिली आहे.
पत्रक येथे पहा.👇👇
https://www.mahaurja.com/meda/data/kusum/circular240522.zip