नांदेड जिल्ह्याची अंतिम पैसेवारी जाहीर | kharif paisewari nanded

kharif paisewari nanded – नांदेड जिल्ह्याची अंतिम पैसेवारी जाहीर, पैसेवारी ५० पैश्याच्या आत.

kharif paisewari nanded

kharif paisewari nanded 2023 declared अंतिम पैसेवारी नांदेड

नांदेड जिल्ह्यातील 1562 महसूल गावांमध्ये 15 डिसेंबर 2023 रोजी खरीप हंगाम 2023 अन्वये अंअंतिम पैसेवारी नांदेड ही 50 पैसे पेक्षा कमी जाहीर करण्यात आली आहे. आणेवारी काढण्याची पद्धत शासनाने निश्चित करून दिलेली आहे. आणेवारी ही केवळ पर्जन्यमानावर अवलंबून नसते. पीक कापणी प्रयोगानुसार ही पैसेवारी जाहीर केली जाते.

यंदा नांदेड जिल्ह्यात 99 टक्के पर्जन्यमान झाले असले तरी पावसाळ्याच्या पहिल्या कालखंडात काही तालुक्यातील महसुली मंडळात अतिवृष्टी झालेली आहे. या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. काही मंडळांमध्ये पर्जन्यमानाच्या कालावधीत 15 ते 21 दिवसांचा खंड पडलेला होता. खंड पडलेल्या पावसामुळे हलक्या जमिनीवर असलेले सोयाबीन पीक करपून गेल्याचे प्रशासनाच्या पाहणीत आढळून आले आहे.

मध्यम आणि भारी जमिनीमध्ये असलेल्या सोयाबीन पिकांची वाढ खुंटलेली जाणवली. परिणामी पिकांच्या उत्पन्नात घट देखील झाल्याच्या नोंदी आहेत. शेतीचे उत्पन्न कमी झाल्यामुळे पैसेवारी हा कृषी उत्पादनाचा इंडिकेटर कमी होतो. पिक विमा कंपनीने स्वतंत्र सर्वेक्षण करून अतिवृष्टी हा ट्रिगर लक्षात घेऊन मध्यावधी नुकसान जाहीर केले आहे.

ज्या तालुक्यांमध्ये मध्यम किंवा गंभीर दुष्काळ असल्याचे सूचित करणारा ट्रिगर- 2 लागू होतो त्या तालुक्यांमध्ये पिकांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण अर्थात ग्राउंड ट्रुथींग केली जाते. या ग्राउंड ट्रुथींग नुसार मध्‍यम किंवा गंभीर स्‍वरुपाचा दुष्‍काळ जाहिर केला जातो. नांदेड जिल्ह्याची आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी आलेली असली तरी देखील जिल्ह्यात अद्यापही दुष्काळ व्यवस्थापन संहिते मधील तरतुदीनुसार दुष्काळ जाहीर करण्यात आलेला नाही.जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत 75 टक्के पेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान साडेसातशे मि.मी पेक्षा कमी झाले आहे अशा जिल्ह्यातील 8 तालुक्यातील 25 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आलेली आहे.

जिल्ह्याची पैसेवारी कमी असणे म्हणजे कोरडा दुष्काळ नव्हे.पैसेवारी ही पर्जन्यमानासोबतच पर्जन्याचे असमान वितरण, पिकांवरील रोगराई, कीटकांचा प्रादुर्भाव आदी घटकांवर आधारित असते. सोयाबीन हे नांदेड जिल्ह्याचे मुख्य खरीप पीक आहे. या पिकावर यल्लो मोजॅक व्हायरस, खोडकुज, मूळकूज या बुरशीजन्य आजारांमुळे देखील मुख्य उत्पन्न असलेल्या सोयाबीनची उत्पादकता घटली आहे. नांदेड जिल्ह्याची पीक पैसेवारी 50 पैसे पेक्षा कमी असली तरी दुष्काळ व्यवस्थापन संहिते मधील तरतुदीनुसारच दुष्काळ जाहीर केला जातो. 

नांदेड जिल्ह्यात सन 2023 खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे.  

शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या अंतिम पैसेवारी नांदेड जिल्ह्यातील 50 पेक्षा कमी पैसेवारी आहेत. 

2023 मध्ये सुरुवातीला अतिवृष्टी व नंतर दोनदा झालेला ढगफुटी सदुर्श्य पाऊस यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले.  

खरिप पिकांचेही यात मोठे नुकसान झाले आहे.  

सोयाबीन, कापूस सारख्या नगदी पिके मोठ्या प्रमाणात नुकसान ग्रस्त झाली आहेत.

Hungami paisewari Update 2023 nanded खरीप हंगाम हंगामी पैसेवारी

यामुळे आता पैसेवारी काय येतेय याकडे सर्वांचे लक्ष लागले होते, यातच आता 30 सप्टेंबर रोजी  2023 चा खरीप हंगाम हंगामी पैसेवारी kharif paisewari nanded शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.

 नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यातील 1 हजार 462  महसुली गावातील एकूण लागवडीखालील क्षेत्र 8 लाख 44 हजार 347 हेक्टर आहे.

नांदेड जिल्हा तालुकानिहाय हंगामी पैसेवारी kharif paisewari nanded खालीलप्रमाणे

अर्धापूर तालुक्यातील 64 गावांची पैसेवारी 52 पैसे ardhapur paisewari

देगलूर तालुक्यातील 108 गावांची पैसेवारी 51 पैसे denglur paisewari 2023

कंदहार  तालुक्यातील 126 गावांची पैसेवारी 48 पैसे kandhar antim paisevari

मुखेड तालुक्यातील 135 गावांची पैसेवारी 46 पैसे mukhed paisevari

बिलोली तालुक्यातील 91 गावांची पैसेवारी 47 पैसे biloli paisewari

लोहा तालुक्यातील 127 गावांची पैसेवारी 46 पैसे loha paisewari

भोकर तालुक्यातील 77 गावांची पैसेवारी 55 पैसे

नायगाव तालुक्यातील 89 गावांची पैसेवारी 47 पैसे

मुदखेड तालुक्यातील 55 गावांची पैसेवारी 53 पैसे

उमरी  तालुक्यातील 62 गावांची पैसेवारी 56 पैसे

हदगाव तालुक्यातील 137 गावांची पैसेवारी 51 पैसे

नांदेड तालुक्यातील 88 गावांची पैसेवारी 52 पैसे

किनवट तालुक्यातील 191 गावांची पैसेवारी 53 पैसे

हिमायतनगर तालुक्यातील 64 गावांची पैसेवारी 48 पैसे

धर्माबाद तालुक्यातील 56 गावांची पैसेवारी 52 पैसे

माहूर  तालुक्यातील 92 गावांची पैसेवारी 53 पैसे

तर या जाहीर केलेल्या पैसेवारीतून नांदेड  तालुक्यातील तेरा गावांचा महापालिकेत समावेश करण्यात आला असल्यामुळे या हंगामी पैसेवारी तून ही 13 गावे वगळण्यात आली आहेत. मात्र बाकी सर्व तालुके 50 ते 55 पैशांच्या श्रेणीत दाखवले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *