शासनाने केले तुकडेबंदी कायद्यात बदल, नवीन अधिसूचना निर्गमित | new Update tukda bandi kayda 2024
Table of Contents
तुकडेबंदी कायद्यात बदल, अधिसूचना निर्गमित | tukda bandi kayda 2024
सर्वसामान्य नागरिकांनी खरेदी केलेल्या एक, दोन, तीन किंवा चार-पाच गुंठे क्षेत्राचे तुकडे नियमित करण्यास प्रांताधिकाऱ्यांकडून मान्यता दिली जात आहे. त्यासाठी पूर्वी झालेल्या व्यवहाराच्या (दस्त) रेडिरेकनरच्या पाच टक्के रक्कम शुल्क म्हणून शासनाला भरावी लागणार आहे. त्यानंतर त्या गुंठ्याच्या खरेदी- विक्रीस परवानगी मिळेल; पण विहीर, घर बांधकाम व रस्त्यासाठीच त्या गुंठ्यांचे व्यवहार होतील.
२०१७ साली केलेल्या सुधारणेनुसार १९६५ ते २०१७ या कालावधीत झालेले तुकड्यांचे व्यवहार नियमित करण्यासाठी बाजार मूल्याच्या २५ टक्के रक्कम शासनास जमा करण्याची अट घालण्यात आली. पण, ही रक्कम सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरील असल्याने बहुतेक लोक समोर आलेच नाहीत. ही अडचण दूर करण्यासाठी विद्यमान सरकारने प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची खरेदी- विक्री करून झालेले व्यवहार नियमित करण्यासाठी २०१७ सालापर्यंतची मुदत २०२४ पर्यंत वाढविली.
तसेच २५ टक्के शुल्काऐवजी पाच टक्के शुल्क भरून त्या जमिनी नियमित करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानपरिषद आणि विधानसभेत त्याचे विधेयक सादर केले. या विधेयकाला दोन्हीही सभागृहात मान्यता मिळाल्याने तुकडेबंदी कायद्यातील सुधारणेचा मार्ग मोकळा झाला आहे.
तुकड्यांच्या खरेदीसाठी शुल्क भरून नियमित करुन घेणे आवश्यक
तुकडेबंदी कायद्यानुसार प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी जमिनीच्या खरेदी- विक्रीवर निर्बंध होते. पण, आता त्या तुकड्यांचे व्यवहार नियमित करण्यासाठी बाजारमूल्याच्या पाच टक्के शुल्क शासनाला भरून एक, दोन, तीन, चार, पाच गुंठ्यांची खरेदी-विक्री आता करता येईल. त्यासाठी नगरपालिका, महापालिकेतील संबंधित अधिकारी किंवा ग्रामीणमधील प्रांताधिकाऱ्यांकडून गुंठेवारी नियमित झाल्याचे प्रमाणपत्र घ्यावे लागेल.
या’ तीन कारणांसाठी मिळेल परवानगी
● विहिरीसाठी गुंठेवारी खरेदी-विक्रीस परवानगी
● शेती किंवा अन्य रस्त्यांसाठीही गुंठ्यांची करता येईल खरेदी-विक्री
● रहिवासी क्षेत्रात (रेसिडेन्शियल) घर बांधण्यासाठी देखील गुंठ्यांच्या व्यवहारास परवानगी
या अधिसूचनेनुसार ( gazette Maharashtra ) प्रमाणभूत क्षेत्र जिरायत जमिनीसाठी 40 गुंठे वरून 20 गुंठे पर्यंत खाली आणण्यात आले आहे, या नव्या कायद्यामुळे आता महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील महानगरपालिका तसेच महानगरपालिकांच्या हद्दी वगळता महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातील प्रमाणभूत क्षेत्र कमी करण्यात येणार आहे.
Tukdebandi kayda gr pdf https://www.prabhudevalg.com/2022/09/blog-post.html
तुकडे बंदी, तुकडे जोड कायदा अंतर्गत ( tukda bandi kayda 2024 ) महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रमाणभूत क्षेत्र हे कोरडवाहू क्षेत्रासाठी 40 गुंठे वरून 20 गुंठे तर बागायत क्षेत्रासाठी दहा गुंठे अशा प्रकारे कायद्यामध्ये बदल करन्या संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून एक अधिसूचना / राजपत्र ( egazette ) 8 august 2023 रोजी प्रकाशित करण्यात आली आहे.
राज्यात नोंदणी कायदा हा फक्त दस्तऐवज नोंदणी करण्यापुरता मर्यादित आहे. अशा नोंदणी करण्यात आलेल्या दस्तांची नोंद सातबारावर ( 7/12 land records ) करण्याची तरतूद ही महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अंतर्गत करण्यात आलेली आहे.
मात्र या कायद्यांतर्गत नोंदणी झालेल्या दस्तांची सातबारावर नोंद करताना तुकडे बंदी तुकडे जोड कायदा याचा विचार करण्यात येतो तसेच नोंदणी अधिनियम अंतर्गत कोणताही दस्तऐवज नोंदवताना महाराष्ट्र नोंदणी नियम 1961 मधील कार्यपद्धती विचारात घेतली जाते हेच कार्य पद्धती विचारात घेऊन नोंदणी विभागाने तुकडे बंदी कायद्या विरुद्ध दस्तांची नोंदवता येणार नाही तुकडे बंदी परिपत्रक 2022 दिनांक 12 जुलै 2021 रोजी काढण्यात आले होते.
या परिपत्रकानुसार छोट्या छोट्या जमिनीच्या तुकड्यांच्या खरेदी विक्री वर निर्बंध आणण्यात आले होते, मात्र महसूल विभागाचे हे दिनांक १२ जुलै २०२१ चे तुकडे बंदी परिपत्रक 2022 औरंगाबाद खंडपीठानं गैरसंविधनिक ठरवून ते मागे घेण्याचे आदेश एका याचिकेत निकालात दिलेले आहेत.
औरंगाबाद खंडपीठाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होताना दिसते मात्र या निकालाचा काही अंशी लोकांमध्ये तुकडेबंदी कायदा रद्द झाला असा गैरसमज झाला आहे.
दिनांक 12 जुलै 2021 चे तुकडे बंदी परिपत्रक 2022 औरंगाबाद खंडपीठाने रद्द केल्यामुळे आता जमीन च्या तुकड्याची किंवा गुंठेवारीच्या ( Gunthewari ) नोंदी दुय्यम निबंधक कार्यालयात तुम्हाला करता येतील.
मात्र या दस्तांची सातबाराला नोंद करताना मात्र तुकडे बंदी तुकडे जोड कायदा विचारात घेतल्याशिवाय अशी नोंद सातबाराला होऊ शकणार नाही म्हणजे अशा गुंठेवारीच्या दस्तऐवजाची सातबाराला नोंद होणार नाही.
या कायद्यातील सर्व निर्बंध आहेत असेच आहेत त्यात कोणताही बदल झालेला नाही.
मात्र 7 august 2023 काढलेल्या या अधिसूचना मुळे या कायद्याअंतर्गत असलेले विविध जिल्ह्यातील जिरायत व बागायत प्रमाणभूत क्षेत्र मात्र कमी होणार आहे.
महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण Govt GR – tukda bandi kayda 2023
या अधिसूचना नुसार महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम 1947 – महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत ( Maharashtra Tukde Bandi Kayda ) अधिनियम 1947 चा 62 कलम 44 पोटकलम दोन व कलम 5चे कलम दोन द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासन जिल्हा सल्लागार समिती मार्फत विचार विनिमय करून यासंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या सर्व अधिसूचना अंशतः सुधारित करण्यात येत आहेत.
महानगरपालिका नगरपालिका यांच्या हद्दी वगळता कलम 44 पोटकलम एक अन्वये महाराष्ट्र शासन प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रमाणभूत क्षेत्रांमध्ये सुधारणा करत आहे.
Tukdebandi kayda gr pdf
याबाबत काही सूचना, आक्षेप असतील तर त्या नागरिकांकडून मागवण्यात आलेल्या आहेत. यासाठी ही अधिसूचना प्रकाशित झालेल्या तारखेपासून तीन महिन्याच्या आतमध्ये अप्पर मुख्य सचिव, महसूल मुद्रांक नोंदणी महसूल व वन विभाग, मादाम कामा महामार्ग, राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई 400032 या पत्त्यावर पाठवावेत.
या अधिसूचना नुसार स्थानिक क्षेत्र प्रत्येक जिल्ह्याचे त्याच्यामध्ये आपण पाहू शकता नाशिक अहमदनगर धुळे नंदुरबार जळगाव पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर औरंगाबाद जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद नागपूर चंद्रपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली अमरावती बुलढाणा वाशीम यवतमाळ ठाणे पालघर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जिरायत क्षेत्र क्षेत्र 40 गुंठे जमीन धारणा चे प्रमाण क्षेत्र आहे ते 20 गुंठे करण्यात आले आणि बागायती क्षेत्रासाठी एक दहा गुंठे ठेवण्यात आलेले आहे.
सिंधुदुर्ग,ठाणे, रत्नागिरी जिल्हा मध्ये वरकस जमिनीसाठी हे क्षेत्र सुद्धा 20 गुंठे क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आलेला आहे.
अशाप्रकारे राजपत्र अधिसूचना ( Maharashtra Government Gazette ) काढल्यामुळे आता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोरडवाहू क्षेत्रासाठी 20 गुंठे प्रमाणभूत क्षेत्र करण्यात आलेले आहेत.
Tukdebandi kayda gr pdf
अशा प्रकारचा बदल केल्यामुळे आता कमीत कमी अर्धा एकर पेक्षा जास्त खरेदी करणाऱ्यांच्या पूर्वी नोंदी होत नव्हत्या त्यामुळे आता त्यांच्या या समस्या सुटून, त्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.
त्या संबंधी प्रश्न असेल तर कमेंट करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या काही भागांमध्ये आपण त्याच्यावर सुद्धा माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करूयात.
GR kadhiparyant yenar ahe?
GR आला की व्हिडिओ येईल