अतिवृष्टी बाधित झालेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा ( Hingoli pik vima ) भरपाई मिळावी यासाठी जिल्हाधिाऱ्यांमार्फत अधिसूचना निर्गमित.
Hingoli pik vima – pik vima update 2024
जिल्ह्यात सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित पिकांचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत शासनाकडून निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार क्षेत्रीय संयुक्त समितीमार्फत केलेल्या सर्वेक्षणानुसार सर्व महसूल मंडळामध्ये सोयाबीन पिकामध्ये मध्यम हंगाम प्रतिकूल परिस्थिती लागू होत असल्याने संबंधित विमा धारकांना पिक नुकसानीच्या प्रमाणात विमा संरक्षित रकमेच्या 25 टक्के अग्रीम देण्याचे आदेश सोमवारी पारित केले आहेत.
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2024 अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान ही जोखीम लागू करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हास्तरीय संयुक्त समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये क्षेत्रीय स्तरावरील संयुक्त समितीच्या सर्वेक्षणानुसार सोयाबीन पिकाचे नजर अंदाजानुसार अपेक्षित उत्पादन हे मागील 7 वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या 50 टक्के पेक्षा कमी आल्याचे निदर्शनास आले आहे. तर तूर व कापूस पिकांच्या नजर अंदाजानुसार अपेक्षित उत्पादनात 50 टक्के पेक्षा जास्त घट दिसून आली नाही.
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम-2023 ते रब्बी हंगाम 2025-26 करिता राज्यात राबविण्याबाबत दि. 26 जून, 2023 च्या शासन निर्णय निर्गमित केला आहे. या शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी यांच्यामार्फत नुकसानीचा अहवाल व अधिसूचना जाहीर झाल्यानंतर एक महिन्याच्या आत वरील तरतुदीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनीमार्फत नुकसान भरपाई देण्यात येईल.
उपरोक्त बैठकीतील चर्चेनुसार तसेच प्राप्त सर्वेक्षण अहवालानुसार अधिसूचित पिक विमा क्षेत्रातील सोयाबीन पिकासाठी संभाव्य नुकसान भरपाई रक्कमेच्या 25 टक्के आगाऊ रक्कम सर्व विमाधारक शेतकऱ्यांना देण्याचे आदेश एचडीएफसी ईरगो कंपनी लि. यांना जिल्हास्तरीय संयुक्ती समितीच्या मान्यतेने जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
2023 Old Update 👇
यामुळे पिकांवर कीड व रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे या प्रतिकूलतेमुळे सोयाबीनच्या सरासरी उत्पादकतेमध्ये मोठ्या प्रमाणात घट अपेक्षित आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 9 सप्टेंबरला पिकविमा कंपन्यांचे प्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, के व्ही के शास्त्रज्ञ व तालुका कृषी अधिकारी यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली.
या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार 21 सप्टेंबरला झालेल्या जिल्हा सनियंत्रण सभेत याविषयी चर्चा होऊन सोयाबीन पिकाकरिता अधिसूचना Amravati Agrim pikvima लागू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
या अधिसूचनेनुसार नुकसानग्रस्त पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा कंपनी द्वारा एक महिन्याच्या आत नुकसान भरपाई देण्यात यावी अशी सूचना देण्यात आली आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या एक जुलै 2022 च्या शासन निर्णयानुसार हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये 50% पेक्षा जास्त घट अपेक्षित असल्यास नुकसान भरपाईच्या प्रमाणात विमाधारक शेतकऱ्यांना 25% अग्रीम देण्याचे निश्चित करण्यात येते. शेतकऱ्यांना आगाऊ स्वरूपात देण्यात आलेली ही रक्कम अंतिम भरपाईत समायोजित करण्यात येते.
जिल्हाधिकाऱ्यांनी अमरावती जिल्ह्यातील 7 तालुक्यातील 41 महसूल मंडळातील सोयाबीन पिकासाठी Amravati Agrim pikvima अधिसूचना लागू केली आहे.
यामध्ये दर्यापूर तालुक्यातील ८ महसूल मंडळांचा, अंजनगाव तालुक्यातील ६ महसूल मंडळांचा , भातकुली तालुक्यातील ६ महसूल मंडळांचा, धामणगाव तालुक्यातील ७ महसूल मंडळांचा , चिखलदरा तालुक्यातील ६ महसूल मंडळांचा, चांदूररेल्वे तालुक्यातील 5 महसूल मंडळांचा व धारणी तालुक्यातील ३ महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला आहे.
दर्यापूर तालुक्यात येवदा, वडने गंगाई, रामतीर्थ, दर्यापूर, सामदा, थिलोरी, खल्लार, दारापूर महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला आहे.
अंजनगाव सुर्जीमध्ये अंजनगाव, सातेगाव, भंडारज, विहिगाव, कापू- सतळणी, कोकर्डा महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला आहे.
भातकुलीमध्ये आष्टी, खोलापूर, पूर्णानगर, भातकुली, निभा, आसरा मंडळांचा समावेश आहे.
धामणगाव तालुक्यात धामणगाव, अंजनवती, दत्तापूर, मंगरुळ, चिंचोली, भातकुली मंडळांचा समावेश आहे.
चिखलद- रामध्ये चिखलदरा, सेमाडोह, टेंभुसोडा, चुर्णी, गौलखेडा, हतरू मंडळांचा समावेश आहे.
चांदूररेल्वेमध्ये चांदूर रेल्वे, आमला, घुईखेड, पळसखेड, सातेफळ व धारणी तालुक्यात धारणी. सावलीखेडा व धुळघाट मंडळासाठी अधिसूचना आहे. यानुसार एक महिन्याच्या आत विमाधारक शेतकऱ्यांना संभाव्य नुकसानभरपाईच्या २५ टक्के अग्रिम Amravati Agrim pikvima शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत.