खुशखबर ! शेतकऱ्यांना ५ मिनिटांत मिळणार कर्ज , नाबार्डनं RBI सोबत केला करार; घेऊया जाणून काय होणार फायदा.
Ekcc nabard NABARD-RBI Innovation Hub partnership
नाबार्ड कडून सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांसाठी डिजिटल किसान क्रेडिट कार्ड (eKCC) कर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी हा डिजिटल क्रेडिट सिस्टम प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे.
कृषी पीक कर्जाच्या या डिजिटायझेशनमुळे बँकांची कार्यक्षमता सुधारेल आणि शेतकऱ्यांना देखील त्वरित कर्ज पुरवठा होणार आहे.
या सुलभ व जलद प्रक्रियेमुळे ग्रामीण भागाच्या समृद्धीला चालना मिळणार आहे. भागीदारीमुळे कर्जाची प्रक्रिया सुरळीत होईल आणि देशातील १२ कोटी शेतकऱ्यांसाठी कर्ज वाटपाचा कालावधी तीन-चार आठवड्यांवरून केवळ पाच मिनिटांवर येईल.