
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना २०२२ – २३ मध्ये राबविण्यास मंजुरी ( Ekatmik falotpadan 2022 )
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान ( Ekatmik falotpadan 2022 ) अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता आँनलाईन अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन.
दिनांक ३ जून २०२२ रोजी एक महत्वपूर्ण शासन निर्णय घेऊन एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाचा कार्यक्रम
२०२२-२३ मध्ये महाराष्ट्रात राबविण्याकरिता मंजुरी दिली आहे.
शासन निर्णय येथे पहा 👇
Ekatmik falotpadan 2022 GR
या अभियानाच्या सन 2022-23 च्या
वार्षिक कृति आराखड्यास मंजुरी मिळालेली आहे.
त्यामध्ये क्षेत्र विस्तारमध्ये ड्रगन फ्रुट, सुट्टी फुले, हळद लागवड व मशरुम उत्पादन प्रकल्पासाठी
जुन्या फळबागाच्या पुनरुज्जीवनासाठी
सामूहिक शेततळे
शेततळे अस्तरीकरण
संरक्षित शेती
मधुमक्षिका पालन
शेतकरी प्रशिक्षण
पॅक हाऊस
कांदाचाळ
रायपनिंग चेंबर, प्राथमिक प्रक्रिया केंद्र
फिरते विक्री केंद्र
जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना” या सदराखाली आपला वैयक्तीक मोबाईल क्रमांक आपल्या आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे.
महाडीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/ हे संकेतस्थळ असून या संकेतस्थळावरील ‘शेतकरी योजना” हा पर्याय निवडावा.
शेतकरी स्वत:च्या मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र इत्यादी माध्यमातून महाडीबीटी च्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतील. ‘वैयक्तीक लाभार्थी’ म्हणून नोंदणी करु इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करुन घ्यावा लागेल.
यापूर्वीच अर्जदाराने माहिती भरली असल्यास पुन्हा भरण्याची आवश्यकता नाही. मात्र लाभाच्या घटकांमध्ये शेतकरी बदल करु शकतात. ज्या शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलवर कृषिविषयक योजनांचा लाभ मिळविण्यासाठी अद्याप अर्ज केला नसेल.
त्यांनी महाडीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/ हे संकेतस्थळ अर्ज भरावेत.
तसेच अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी व मंडळ कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क करावा.