जाणून घेऊया नेमकं किती मिळत ठिबक सिंचन, तुषार सिंचन ला अनुदान Drip subsidy 2023 – Per drop more crop
शेती हा निसर्गाच्या भरवशावर चालणारा व्यवसाय आहे, असे म्हटले जाते. निसर्गाच्या बेभरवशावर मात करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या सिंचन योजना शेतकऱ्यांच्या मदतीला आल्या आहेत. राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक हे ध्येय घेऊन या योजना काम करतात.
मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना ठिबक सिंचन व मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना तुषार सिंचन
या दोन्ही योजनांचा सिंचनाखालील लागवडीयोग्य क्षेत्र वाढविणे, उपलब्ध पाण्याची कार्यक्षमता वाढविणे, पिकांच्या उत्पादनात व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे, हा उद्देश आहे.
ठिबक सिंचन योजनेची खर्च मर्यादा Drip subsidy 2023
अ.क्र | अंतर (मि. मी. मध्ये) | क्षेत्र 0.2 हे. | क्षेत्र 0.4 हे. | क्षेत्र 1 हे. |
1 | १.२ x ०.६ | ३१४३६ रू. | ५७२४१ रू. | १२७५०१ रू. |
2 | १.८ x ०.६ | २४५६९ रू. | ४२९९२ रू. | ९१५६० रू. |
3 | १.५ x १.५ | २८१०६ रू. | ४६९९५ रू. | ९७२४५ रू. |
4 | ३ x ३ | १५७९२ रू. | २६१९० रू. | ४७७५१ रू. |
तुषार सिंचन खर्च मर्यादा Sprinkler subsidy 2023
क्षेत्र | पाईपचा व्यास (Pipe Dia) मि. मी. मध्ये | ||
63 | 75 | 90 | |
0.4 हे.पर्यंत | 13211 रू. | लागू नाही | लागू नाही |
1 हे. पर्यंत | 21588 रू. | 24194 रू. | 0 |
2 हे. पर्यंत | 31167 रू. | 34657 रू. | 0 |
3 हे. पर्यंत | लागू नाही | लागू नाही | 46779 रू. |
4 हे. पर्यंत | लागू नाही | लागू नाही | 58995 रू. |
5 हे. पर्यंत | लागू नाही | लागू नाही | 66789 रू. |
अर्ज सादर करण्याची पद्धत
drip subsidy 2023 अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून महाडीबीटी पोर्टलचे http://mahadbtmahit.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा, शेतकरी स्वतःचा मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र CSC ग्रामपंचायतमधील संग्राम केंद्र यासारख्या माध्यमातून संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतील.