किती मिळत ठिबक, तुषारला अनुदान | Drip subsidy 2023

जाणून घेऊया नेमकं किती मिळत ठिबक सिंचन, तुषार सिंचन ला अनुदान Drip subsidy 2023 – Per drop more crop

शेती हा निसर्गाच्या भरवशावर चालणारा व्यवसाय आहे, असे म्हटले जाते. निसर्गाच्या बेभरवशावर मात करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या सिंचन योजना शेतकऱ्यांच्या मदतीला आल्या आहेत. राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक हे ध्येय घेऊन या योजना काम करतात.

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना ठिबक सिंचन व मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना तुषार सिंचन

या दोन्ही योजनांचा सिंचनाखालील लागवडीयोग्य क्षेत्र वाढविणे, उपलब्ध पाण्याची कार्यक्षमता वाढविणे, पिकांच्या उत्पादनात व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे, हा उद्देश आहे.

दोन्ही योजनांसाठी अनुदान अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना खर्च मर्यादेच्या ८० % व इतर शेतकऱ्यांना खर्च मर्यादाच्या ७५% अनुदान देय आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेतून ५५% / ४५% व उर्वरित पूरक अनुदान मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना २५% / ३०% देय आहे.

ठिबक सिंचन योजनेची खर्च मर्यादा Drip subsidy 2023

अ.क्रअंतर (मि. मी. मध्ये)क्षेत्र 0.2 हे.क्षेत्र 0.4 हे.क्षेत्र 1 हे.
1१.२ x ०.६३१४३६ रू.५७२४१ रू.१२७५०१ रू.
2१.८ x ०.६२४५६९ रू.४२९९२ रू.९१५६० रू.
3१.५ x १.५२८१०६ रू.४६९९५ रू.९७२४५ रू.
4३ x ३१५७९२ रू.२६१९० रू.४७७५१ रू.

तुषार सिंचन खर्च मर्यादा Sprinkler subsidy 2023

क्षेत्रपाईपचा व्यास (Pipe Dia) मि. मी. मध्ये
 637590
0.4 हे.पर्यंत13211 रू.लागू नाहीलागू नाही
1 हे. पर्यंत21588 रू.24194 रू.0
2 हे. पर्यंत31167 रू.34657 रू.0
3 हे. पर्यंतलागू नाहीलागू नाही46779 रू.
4 हे. पर्यंतलागू नाहीलागू नाही58995 रू.
5 हे. पर्यंतलागू नाहीलागू नाही66789 रू.

अर्ज सादर करण्याची पद्धत

drip subsidy 2023 अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून महाडीबीटी पोर्टलचे http://mahadbtmahit.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा, शेतकरी स्वतःचा मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र CSC ग्रामपंचायतमधील संग्राम केंद्र यासारख्या माध्यमातून संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतील.

drip subsidy 2023 योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व खातेदार शेतकरी पात्र लाभार्थी आहेत. मात्र, त्यांनी यापूर्वी त्याच क्षेत्रावर मागील ७ वर्षांत लाभ घेतलेला नसावा. यासाठी पाण्याचा स्त्रोत आवश्यक असून, ७/१२, ८ अ चा उतारा, संवर्ग प्रमाणपत्र (एससी, एसटीसाठी) ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: