ऑनलाईन जन्म-मृत्यू नोंदणीच्या नावे फसवणूक | Birth death certificate online Maharashtra

ऑनलाईन जन्म-मृत्यू नोंदणीच्या ( birth death certificate online ) नावे फसवणूक; फसव्या संकेतस्थळांपासून सावध राहण्याचे आवाहन.

Birth death certificate online

fake Birth death certificate online Maharashtra

जन्म -मृत्यू प्रमाणपत्र नोंदणी च्या नावे नागरिकांना फसवलं जात असून जन्म -मृत्यू प्रमाणपत्र नोंदणी करणाऱ्या फसव्या, बनावट संकेतस्थळांबाबत नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्य आरोग्य माहिती व जीवनविषयक आकडेवारी कार्यालयाचे उपसंचालक तथा उपमुख्य निबंधक जन्म व मृत्यू महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.

भारत सरकारच्या ( Govt of india ) अधिकृत मूळ संकेतस्थळांची नक्कल करुन CRSORGIGIGOOVI.IN, CRSRGIIN, BIRTHDEATONLINE.COM अशा अनेक फसव्या, बनावट संकेतस्थळांच्या माध्यमातून समाजकंटकांद्वारे नागरिकांच्या जन्म मृत्यूच्या नोंदण्या केल्या जात आहेत.

मुळात ही संकेतस्थळे दिसायला अधिकृत मूळ संकेतस्थळांसारखीच आहेत. या संकेतस्थळांवर नागरिकांकडून जन्म – मृत्यू प्रमाणपत्रांसाठी रक्कम घेतली जात आहे. आपली फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी अशा संकेस्थळांवर जन्म – मृत्यू घटनांची नोंदणी करु नये.

जन्म – मृत्यू नोंदणीसाठी ग्रामीण भागात ग्रामसेवक, शहरी भागात मुख्याधिकारी नगर परिषद, नगर पंचायत, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महानगरपालिका, कार्यकारी अधिकारी, कटक मंडळे (कॅन्टोनमेन्ट बोर्ड), शासकीय आरोग्य संस्थेचे प्रमुख (जर घटना शासकीय आरेाग्य संस्थेत घडली असेल तर) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: