Gram panchayat election Maharashtra 2022 ग्रामपंचायती च्या निवडणूका जाहीर

राज्यात 7751 ग्रामपंचायती च्या निवडणूका ( Gram panchayat election)  जाहीर, थेट सरपंच निवडी सह निवडणुका. असा असेल कार्यक्रम.

Gram panchayat election

Gram panchayat election Maharashtra 2022

राज्याच्या विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी कार्यक्रम आज निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. राज्यातील ७७५१ ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला; कार्यक्रम जाहीर

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने आज या कार्यक्रमाची घोषणा केली आहे.

राज्यातील ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 december 2022 रोजी मतदान होणार आहे.

त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 20 december 2022 रोजी मतमोजणी होणार आहे.

Gram panchayat election Maharashtra 2022 time table असा असेल कार्यक्रम ग्रामपंचायत निवडणूक

  • जाहीर केलेल्या तालुक्याचे तहसीलदार18 november २०२२ रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. ( Election circular )
  • या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची सूचना प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 डिसेंबर 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 18 डिसेंबर 2022 रोजी  सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. तसेच नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 20 डिसेंबर 2022 रोजी होईल.

निवडणूक जाहीर केलेल्या तालुक्यातील गावाची संख्या. Gram panchayat election Maharashtra 2022

 तालुकानिहाय ग्रामपंचायतींची ( Gram panchayat ) संख्या:

  • विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या : अहमदनगर- 203, अकोला- 266, अमरावती- 257, औरंगाबाद- 219, बीड- 704, भंडारा- 363, बुलडाणा- 279, चंद्रपूर- 59, धुळे- 128, गडचिरोली- 27, गोंदिया- 348, हिंगोली- 62, जळगाव- 140, जालना- 266, कोल्हापूर- 475, लातूर- 351, नागपूर- 237, नंदुरबार- 123, उस्मानाबाद- 166, पालघर- 63, परभणी- 128, पुणे- 221, रायगड- 240, रत्नागिरी- 222, सांगली- 452, सातारा- 319, सिंधुदूर्ग- 325, सोलापूर- 189, ठाणे- 42, वर्धा- 113, वाशीम- 287, यवतमाळ- 100, नांदेड- 181 व नाशिक- 196. एकूण- 7,751.

https://www.prabhudevalg.com/2020/12/blog-post_19.html

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: