शेतात सौर कृषी पंप लागलाय, मग हे घ्या जाणून | Solar Pump User Manual

आपल्या शेतात लागलेला सौर ऊर्जा कृषी पंप ( Solar pump ) हा चांगला चालावा, बिघाड होऊ नये यासाठी काही काळजी घेणे गरजेचे आहे, जाणून घेऊया काय घ्यावी दक्षता, कशी राखावी निगा – Solar Pump User Manual

Solar Pump

Solar Pump User Manual

सोलर कृषी पंप देखभाल व दुरुस्ती Solar pump Maintenance

1) सौर पॅनल – Solar panel

सोलर पॅनल वर धूळ, कचरा, झाडाची पाने, पक्ष्याची विष्टा, साचल्यामुळे सोलर पॅनल वर पडणारी सूर्य प्रकाशाची तीव्रता कमी होऊन योग्य तीव्रता सौर पॅनेलवर न पडल्याने विद्युत पुरवठ्याची क्षमता कमी होते. त्यामुळे सौर कृषी पंप पाणी उपसा करण्याची क्षमता कमी होते. आपला सौर पंप पूर्ण क्षमतेने चालावा यासाठी सौर पॅनल वरची धूळ दर ८ ते १० दिवसांनी  साफ करणे आवश्यक आहे.

मात्र सौर पॅनल साफ करत असताना कडक किंवा चरे पडणा-या वस्तूनी स्वच्छ करु नये तर पॅनल स्वच्छ करण्यासाठी शुध्द पाणी व कोमल कापडाचा वापर करा. पॅनल साफ करण्यासाठी साबण व इतर रासायनीक पदार्थांचा वापर करु नये.

याचबरोबर सौर पॅनल सकाळी ७ च्या आत किव्हा सध्याकाळी ७ वाजल्यानंतर साफ करावा. सौर पॅनेलवर झाडाची सावली येत असल्यास अशा झाडाची फांदी छाटनी करावी.

2) सौर कृषी पंप केबल देखभाल Cable Maintenance

सौर पंपामध्ये वापरात असलेल्या वायर मध्ये उच्च दाबाच्या DC विद्युत पुरवठा प्रवाहात असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीत स्वतः सौर कृषी प्रणालीतील वायर काढण्याचा किव्हा लावण्याचा प्रयत्न करू नये. सौर कृषी पंप प्रणाली मधील वायर कोणत्याही ठिकाणी टांगती राहणार नाही याची काळजी घ्यावी.

जर केबल खराब झालेली असेल, अथवा उंदरांनी कुरतडली असेल तर अशा वेळी येताच कंपनी च्या टोल फ्री नंबर वर तक्रार द्यावी. शक्यतो वायरमध्ये सुधारणा होई पर्यंत पंप सुरु करू नये. सौर कृषी पंपात बिघाड होण्याचे महत्वाचे कारण आहे  वायर चे लूज कनेक्शन याकडे हि लक्ष देणे गरजेचे आहे.

सौर पॅनेल स्ट्रक्चर Solar Panel Stretcher

सौर पॅनेल स्ट्रक्चर मधील बोल्ट लूज झालेले नाहीत ना, जॉईंट सैल झालेले आहेत का किव्हा नट बोल्ट ला गंज लागला नाही ना याची नियमित तपासणी करणं देखील आवश्यक आहे. पॅनेल जमिनी लागत असल्यामुळे पॅनल जवळ पाळीव तसेच भटक्या जनावरांचा वावर राहणार नाही याची काळजी घ्यावी आणि शक्य असल्यास पॅनल Stretcher आजुबाजूला कुंपण लावावे.

सौर पॅनल ची दिशा Solar Panel Direction

दिवस सौर पॅनलची दिशा ( Solar panel direction ) बदलणे गरजेचे आहे. सूर्य प्रकाशचये तीव्रतेचा सदुपयोग करुन घेण्यासाठी सौर पॅनलची दिशा ३ वेळेला खालील प्रमाणे बगळाल्यास जास्त फायदा होतो.

वेळ सकाळ  ( ६ ते १०.३० ) आग्नेय – दुपार ( १०.३०ते २.३० ) दक्षिण – संध्याकाळ ( २.३० ते ६ ) नैऋत्य

Safety Precaution

Soalr pump safety precaution

हे करा Do This

सौर कृषी पंप बंद झाल्यास मुख्यमंत्री सौर saur krushi pump yojana मधील असेल तर महावितरण च्या टोल फ्री नंबर १८००१०२३४३५  / १८००२३३३४३५ वर संपर्क करावा आणि जर पंप Kusum solar pump yojana महाऊर्जा मधून मिळाला असेल तर खालील दिलेल्या क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी.

Mahaurja Contact Details Click here

उपलब्ध असेल कंपनी पुरवठादार यांच्याशी संपर्क साधावा कोणत्याही परिस्थितीत अनधिकृत व्यक्ती, खासगी इलेकट्रीशियन अथवा कॉन्ट्रॅक्टर कडून पंप परस्पर दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू नये, हे धोकादायक ठरू शकते. तसेच सौर पंपात इतरांनी केलेल्या कामामुळे काही दबघाड झाल्यास सौर पंप हमी कालावधीत ( Warranty ) देखील बदलून मिळत नाही.

सौर पॅनल, पंप, कंट्रोलर इ. मध्ये असणाऱ्या विद्युत प्रवाहामुळे आज बाजूला असलेल्या व्यक्तीस शॉक बसू नये यासाठी पंपाला अर्थिंग ची व्यवस्था करण्यात आलेली असते, ती कार्यक्षम राहावी म्हणूया अर्थिंग किट मध्ये ४-५ दिवसातून एकदा पाणी देखील टाकावे.

पंप चालू केल्यानंतर १० ते १५ पाणी गढूळ येत असल्यास पाण्याच्या स्रोतात गाळ येतो आहे असे अनुमान निघते अशा वेळी नेमका गाळ का येतो याचा तपास घेऊन पाण्याच्या स्रोतातील गाळ काढू न घेण्याची व्यवस्था  करावी. पाण्यासोबत सतत गाळ आल्यास पंप खराब होण्याची शक्यता असते. अशा कारणामुळे देखील पंप खराब झाल्यास हमी कालावधीत पंप बदलून मिळत नाही.

पाण्याची पातळी पंपाच्या पातळीपर्यंत आल्यास पंप ऑटोमॅटिक बंद होतो मात्र असा पाणी कमी झाल्यामुळे पंप बंद होत नसल्यास कंपनी शी संपर्क साधावा. स्रोतात पाणी कमी असल्यास पंप वारंवार बंद चालू होण्याची शक्यता असते अशा वेळी बिघाड होण्याची दाट शक्यता असते.

पंप बांधण्याकरिता वापरलेला वायर दोर (Safety Rope) वेळोवेळी तपासणी करावी गरज असल्यास बदला. भागात वादळ, पाऊस झाल्यानंतर पंप  योग्य काम करण्यासाठी चालू करून तपासा. पावसाळ्यात गरज नसेल तरी आठवड्यात किमान एक ते अर्धा तास तरी सौर पम्पाचा उपयोग करावा.

 के करू नका Dont Do This

सौर पम्पाला दिलेल्या कंट्रोलर शिवाय पंप चालवू नये. पम्पा सोबत दिलेला कंट्रोलर इतर कोणत्याही हेतूसाठी वापरू नका.

सोलर चाळीत कृषी पंप किव्हा मोटर कोरडी म्हणजे विहीर, बोअर च्या पाण्या बाहेर चालवू नका. दिलेल्या प्रणालीवर पम्पा व्यतिरिक्त इतर कोणतेही भार जोडू नका.

आपल्या पम्पाशी इतर शेजारच्या शेतातील पाण्याच्या पम्पाशी  तुलना करू नका कारण ती तुमच्या बोअर, विहिरीच्या स्थितीवर अवलिंबून असते.

सुरक्षा उपकरण व उपाययोजने शिवाय सौर पंप प्रणालीतील कुठल्याही उपकरणाला स्पर्श करू नका, इतर मेक सौर पॅनेल मधील पार्ट परस्पर बदलू नका. सौर पॅनेलमधील कनेक्शन स्वतः उघडू नका. सौर पॅनेल सुरु असताना कोणात्याही भागाला हात लावू लावू नये अथवा  दुरुस्ती करु नये.

Solar Pump Insurance Claim

शेतकऱ्याच्या सोलर पंप चे नैसर्गिक रित्या नुकसान झाल्यास किव्हा अज्ञात व्यक्तीने चोरी केल्यामुळे नुकसान झाल्यास शेतकरी विम्याचा दावा करण्यास पात्र असतो.

अशे नुकसान झाल्यास २४ तासाच्या आत महाऊर्जा , माहावितरण कार्यालयाशी संपर्क साधून विवाह खाली दिलेल्या संपर्कांवरती संपर्क करून आपापली तक्रार नोंदवावी.

MAHAVITARAN – 18001023435 , 18002333435

MAHAURJA – Click here

Mahaurja Contact Details Click here

सौर पंप प्रणालीचे नैसर्गिक रित्या नुकसान झाल्यास विमा दावा करण्यासाठी ३ दिवसात संबधीतांकडून पंचनामा करून  पुरवठादाराच्या स्थळ परीक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्याला देणे आवश्यक आहे. सौर पंप चे सामान चोरी झाल्यास विमा दावा करण्यासाठी ३ दिवसात जवळच्या पोलीस ठाण्यात FIR दाखल करून त्याची प्रत संबंधित पुरवठादाराच्या स्थळ परीक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्याला देणेआवश्यक आहे.

विमा दावा करण्याच्या प्रक्रिये साठी 3 दिवसाचा कालावधी असतो. सर्व कागदपत्र ३ दिवसात देणे बंधन कारण सर्व कागदपत्र सादर करावीत. पात्र झाल्यानंतर विमा  एजन्सीकडू न पुरवठादाराला नुकसान झालेल्या बाबी बदली करून देण्याबाबतचा अहवाल दिला जातो व  पुरवठादार या खराब झालेल्या , चोरी गेलेल्या बाबी बदली करून सोलर पंप सुरु करून देतात.

तर मित्रांनो आपापल्या शेतात सोलर पंप लागला असेल तर हि काळजी घ्या 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: