माहिती बांधकाम कामगार नोंदणी व योजनांची | Bandhkam Kamgar Yojana 2023

आजच्या या लेखातून आपण बांधकाम कामगार नोंदणी व योजनांची | Bandhkam Kamgar Yojana 2023 माहिती जाणून घेणार आहोत.

Bandhkam kamgar Yojana
Bandhkam Kamgar Yojana

यामध्ये bandhkam kamgar nondani online कशी करावी , बांधकाम कामगारांना कोणत्या योजनांचा लाभ मिळतो, यासाठी अटी पात्रता काय असतात हे पाहूया सविस्तर.

Maharashtra building worker & other construction worker welfare board introduction

राज्यात सन २००१ च्या जनगणनेनुसार एकुण सुमारे १४.०९ लाख इतके बांधकाम कामगार आहेत. परंतु अधिकृत आकडेवारी जाहीर झाली नाही. सन २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्येत १५.९९% झालेली वाढ विचारात घेता ढोबळमानाने सध्या बांधकाम कामगारांची संख्या १८ लाख इतकी संख्या अपेक्षित आहे. आणि या कामगारांना विविध योजनांद्वारे सुरक्षा तसेच आरोग्य व इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.

Maharashtra building worker & other construction worker welfare board Main Aim

 • बांधकाम कामगाराच्या ऑनलाइन ( Maharashtra construction worker registration ) नोंदणी प्रक्रियाचे सुलभीकरण करणे.
 • माहिती, योजना बांधकाम कामगारांपर्यंत ( bhandhkam kamgar scheme )पोहोचणे आणि त्यांची माहिती गोळा करणे.
 • लाभासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांसाठी अर्ज दाखल करण्याच्या पद्धतींत सुलभपणा आणणे.
 • बांधकाम कामगारांना योजनांचा लाभ सहज मिळावा यासाठी कल्याणकारी योजनांच्या लाभ देण्याच्या पद्धतींत सुटसुटीतपणा आणणे.
 • पात्र झालेल्या लाभार्थ्यांना लाभाची रक्कम थेट बँक खात्यात ( DBT ) जमा करणे.
 • बांधकाम कामगार नोंदणीचे प्रमाण वाढविण्यासाठी बांधकाम कामगार काम करत असलेल्या कामाच्या जागेवर जाऊन त्यांची नोंदणी करणे.
 • प्रत्येक बांधकाम कामगाराला सेपरेट नोंदणी क्रमांक देणे.
 • नोंदणीच्या मान्यतेसाठी मान्यताप्राप्त अधिकाऱ्याकडून नोंदणीची ऑनलाइन प्रक्रिया. अशे अनेक उद्देश आहेत.

नोंदणी साठी आवश्यक पात्रता Bandhkam Kamgar yojana nondani eligibility

 1. राज्यातील असंघटीत क्षेत्रात काम करणारे १८ ते ६० वर्षे वयोगटातील सर्व प्रकारचे बांधकाम कामगार हे नोंदणी साठी पात्र असतील.
 2. नोंदणी साठी बांधकाम कामगारांने मागील एक वर्षामध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे.

Bandhkam Kamgar nondani required documents बांधकाम कामगार नोंदणी साठी आवश्यक कागदपत्रे

 1. नोंदणी करत असलेल्या बांधकाम कामगाराच्या वयाचा पुरावा
 2. बांधकाम कामगाराने गेल्या एक वर्षात 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र.
 3. बांधकाम कामगारांचा रहिवासी पुरावा
 4. बांधकाम कामगाराचे आधार कार्ड,ओळखपत्र पुरावा
 5. बांधकाम कामगाराचे पासपोर्ट आकाराचे 3 फोटो मागील तीन महिन्यात काढलेले असावेत

या सर्व कागपत्रासह ऑनलाईन पध्दतीने बांधकाम कामगाराला आपली नोंदणी करावी लागेल.

बांधकाम कामगार नोंदणी ऑनलाईन कशी करावी याचा व्हिडिओ खाली पहा.

Online Bandhkam Kamgar nondani process

नोंदणी साठी पात्र असलेले व्यवसाय

बऱ्याच जणांना प्रश्न पडतो नेमके बांधकाम कामगार म्हणजे कोण तर यामध्ये बांधकाम कामगार नोंदणीसाठी खालील काम करणारे कामगार पात्र असतील. 

बांधकाम व इतर बांधकाम करणे, बदलणे, दुरुस्ती करणे, देखभाल करणे किंवा नाश करणे इत्यादी ज्यात

 • इमारती निर्माण
 • रस्ते निर्माण
 • रेल्वे निर्माण
 • ट्रामवेज ची काम करणारे मजूर
 • एअरफील्ड,
 • सिंचन,
 • ड्रेनेज,
 • कूलिंग टॉवर्स
 • ट्रान्समिशन टावर्स आणि अशा इतर कार्य,
 • दगड कापणे, फोडणे व दगडाचा बारीक चुरा करणे.,
 • लादी किंवा टाईल्स कापणे व पॉलिश करणे.,
 • रंग, वॉर्निश लावणे, इत्यादीसह सुतारकाम.,
 • गटार व नळजोडणीची कामे.,
 • वायरिंग, वितरण, तावदान बसविणे इत्यादीसहित विद्युत कामे.,
 • अग्निशमन यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे.
 • वातानुकूलित यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे.,
 • उद्वाहने, स्वयंचलित जिने इत्यादी बसविणे.,
 • सुरक्षा दरवाजे उपकरणे इत्यादी बसविणे.,
 • लोखंडाच्या किंवा धातुच्या ग्रिल्स, खिडक्या, दरवाजे तयार करणे व बसविणे.,
 • जलसंचयन संरचनेचे बांधकाम करणे.,
 • सुतारकाम करणे, आभाशी छत, प्रकाश व्यवस्था, प्लास्टर ऑफ पेरीस यांसहित अंतर्गत (सजावटीचे) काम.,
 • काच कापणे, काचरोगण लावणे व काचेची तावदाने बसविणे.
 • कारखाना अधिनियम, 1948 खाली समावेश नसलेल्या विटा, छप्परांवरील कौल इत्यादी तयार करणे.,
 • सौर तावदाने इत्यादींसारखी ऊर्जाक्षम उपकरण बसविणे.,
 • स्वयंपाकखोली सारख्या ठिकाणी वापरण्यासाठी मोडुलर (आधुनिक) युनिट बसविणे.,
 • सिमेन्ट काँक्रिटच्या साचेबद्ध वस्तू इत्यादी तयार करणे व बसविणे.,
 • जलतरण तलाव, गोल्फचे मैदान इत्यादीसह खेळ किंवा मनोरंजनाच्या सुविधांचे बांधकाम करणे.,
 • माहिती फलक, रोड फर्निचर, प्रवाशी निवारे किंवा बसस्थानके, सिग्नल यंत्रणा इत्यादी बांधणे किंवा उभारणे.,
 • रोटरीजचे बांधकाम करणे, कारंजे बसविणे इत्यादी.,
 • सार्वजनिक उद्याने, पदपथ, रमणीय भू-प्रदेश इत्यादींचे बांधकाम.

अशा कामांचा समावेश होतो.

बांधकाम कामगार नोंदणी शुल्क

बांधकाम कामगार नोंदणी साठी फी- रू. 25/- व 5 वर्षासाठी वार्षिक वर्गणी रू.60/- एवढे शुल्क आकारले जाते. Online नोंदणी नंतर हे शुल्क भरून नोंदणी पूर्ण होते.

Bandhkam Kamgar nondani Offline Form

Schemes for registered Bandhkam kamgar – bandhkam kamgar Yojana 2022
शैक्षणीक योजना Educational Scheme
 • नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना १ ली ते ७ वी साठी प्रतिवर्षी रू.२५००/- किंवा इ.८ वी ते १० वी साठी प्रतिवर्षी रू.५०००
 • नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना इयत्ता १० वी व १२ वी मध्ये ५०% किंवा अधिक गुण मिळाल्यास रू.१०,०००/-.
 • नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना इयत्ता ११ वी व १२ वी च्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी रू.१०,०००/-.
 • नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना आणि पत्नीस पदवी च्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या पुस्तके व शैक्षणिक सामुग्रीसाठी प्रतिवर्षी रू. २०,०००/-.
 • नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना आणि पत्नीस वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी रू.१,००,०००/- व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरिता रू.६०,०००/-
 • नोंदणीकृत बांधकाम कामगारांचा पहिल्या दोन पाल्यांना शासनमान्य पदविकेकरिता प्रतिवर्षी रू.२०,०००/- व पदव्युत्तर पदविकेकरिता रू.२५,०००/- 
 • नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना संगणकाचे शिक्षण MSCIT करिता शुल्काची प्रतिपूर्ती.
आरोग्यविषयक योजना Health Scheme
 • नोंदीत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन जीवित अपत्यांच्या नैसर्गिक प्रसूतीसाठी रु. १५,०००/- व शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी रु. २०,०००/- 
 • नोंदीत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांना गंभीर आजाराच्या उपचारार्थ रू.१,००,०००/- (आरोग्यविमा योजना लागू नसल्यासच) 
 • पती/पत्नीने पहिला मुलीच्या जन्मानंतर कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत १८ वर्षापर्यंत रू.१,००,००० मुदत बंद ठेव
 • नोंदीत बांधकाम कामगारास ७५% अपंगत्व आल्यास रू.२,००,०००/- अर्थसहाय्य 
 • नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना
अर्थसहाय्य योजना
 • नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा बांधकामाच्या ठिकाणी अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास रू.५,००,०००/-.
 • नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास रू.२,००,०००/-
 • नोंदणीकृत बांधकाम कामगाराला घरखरेदी किंवा घरबांधणीकरता बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावरील रू.६ लक्ष पर्यतच्या व्याजाची रक्कम अथवा रू.२ लक्ष अनुदान.
 • नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधी करिता रू. १०,०००/-. 
 • नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नी अथवा स्त्री कामगाराच्या विधुर पतीस रू.२४,०००/- (५ वर्षांकरिता) ,(प्रति वर्षी अर्ज करणे आवश्क्य राहील).
सामाजिक सुरक्षा विषयक योजना
 • नोंदीत बांधकाम कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी रु.३०,०००/-. 
 • व्यक्तिमत्व विकास पुस्तक संचाचे वाटप. 
 • नोंदीत बांधकाम कामगारास हत्यारे /अवजारे खरेदी करण्याकरिता रू.५०००/-. अर्थसहाय्य 
 • नोंदीत बांधकाम कामगारांसाठी प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना.  
 • नोंदीत बांधकाम कामगारासाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. 
 • नोंदीत बांधकाम कामगारासाठी कौशल्य वृद्धीकरण योजना.

इत्यादीmahabocw kamgar yojana योजनांचा लाभ या नोंदीत बांधकाम कामगारांना दिला जातो.

या mahabocw सर्व योजनांचे अर्ज कसे भरावेत नक्की पहा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: