या विवाहाला शासनाचे ₹२.५ लाख अनुदान | dr babasaheb ambedkar marriage scheme

आंतर जातीय विवाह केलेल्या दांम्पत्यास या योजनेतर्गत 2 लाख 50 हजार रुपये इतके अर्थसहाय्य babasaheb ambedkar marriage scheme 2022

babasaheb ambedkar marriage scheme

babasaheb ambedkar marriage scheme 2022

केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन या स्वायत्त संस्थेच्या वतीने आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांसाठी सन २०१४ १५ पासून प्रायाेगिक तत्त्वावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना ही नवी योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह केलेल्या दांपत्यास २ लाख ५० हजार रुपयांची मदत अनुदान म्हणून दिली जाणार आहे.

१ एप्रिल २०१५ पासून पुन्हा या योजनेचे पुनर्मूल्यांकन करून केंद्रीय सामजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून ही योजना पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

देशातील जातीय भेदभाव कमी करुन सर्व धर्मात समानता व्हावी, जाती जातीमध्ये असणारी दरी कमी व्हावी, सामाजिक समतोल साधता यावा या दृष्टीकोनातून केंद्र शासनाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना ( dr. babasaheb ambedkar marriage scheme 2022) सन 2014-15 पासून सुरु करण्यात आली.

योजनेच्या अटी व पात्रता निकष

या योजनेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत.

  • नवविवाहितांपैकी एक जण अनुसूचित जाती व एक जण अनुसूचित जाती सोडून इतर प्रवर्गातील असलेल्या नवदांपत्यास या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे.
  • हिंदू विवाह कायदा १९५५ अंतर्गत नोंदणीकृत विवाह केलेल्या दांपत्यासच फक्त योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे. ( इतर धर्मासाठी धर्म प्रमाणपत्र असावे )
  • हा विवाह कायद्यानुसार वैध असावा आणि हिंदू विवाह कायदा, 1955 अंतर्गत रीतसर नोंदणीकृत असावा अशे बंधन आहे.त्यांचे कायदेशीररित्या विवाहित आणि वैवाहिक संबंध असल्याचे प्रतिज्ञापत्र जोडप्याद्वारे सादर केले जाईल.
  • फक्त पहिल्या विवाहासाठी हे अनुदान असणार आहे.
  • दांपत्यापैकी जर एकाचा दुसरा विवाह असेल, तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • अर्जदार दांपत्याचे दोघांचे मिळून ५ लाखांपर्यंत उत्पन्न असण्याची अट अाहे.
  • अर्जदार दापत्याने आंतरजातीय विवाह केल्यापासून एका वर्षाच्या आत अर्ज करणे बंधनकारक राहील. एक वर्षा पेक्षा पुढील कालावधी तील अर्ज ग्राह्य धरण्यात येत नाही.

आवश्यक कागदपत्र DOCUMENTS for Dr Ambedkar scheme for marriage

  • अर्जदाराचा विहित नमुन्यातील अर्ज
  • अर्जदाराचा जोडीदारा समवेत फोटो
  • अर्जदाराचे पासपोर्ट साईज फोटो
  • विवाहाचे प्रमाणपत्र हिंदू विवाह कायदा 1955 अंतर्गत विवाह प्रमाणपत्र. हिंदू विवाह कायदा 1955 व्यतिरिक्त इतर बाबतीत धर्म प्रमाणपत्र.
  • अर्जदाराचे जातीचे प्रमाणपत्र ( SC cast certificate of applicant)
  • रहिवासी प्रमाणपत्र,
  • शाळा सोडल्याचा दाखला टी.सी. ( school leaving certificate)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (दोघांचे मिळून मर्यादा रुपये 5 लाखाच्या आत),
  • आधार कार्ड,
  • पॅन कार्ड,
  • पती पत्नीच्या नावाने संयुक्त बँक खाते क्रमांक,
  • जिल्ह्यातील आमदार, खासदाराचे शिफारस प्रमाणपत्र इत्यादी. किंवा जिल्हाधिकारी / दंडाधिकारी यांनी केली पाहिजे आणि राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकार / जिल्हा दंडाधिकारी / जिल्हाधिकारी / उपायुक्त यांनी शिफारस सादर केली पाहिजे.

योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान

डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत ( ambedkar scheme 2022 ) आंतरजातीय विवाह केलेल्या प्रत्येकी एका दांपत्यास २ लाख ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. या रकमेपैकी ५० टक्के रक्कम डिमांड ड्राफ्टद्वारे प्रदान केली जाणार आहे, तर ५० टक्के रक्कम दांपत्याच्या संयुक्त खात्यात ५ वर्षांसाठी फिक्स्ड डिपॉझिट म्हणून ठेवली जाणार आहे.

हिंदू विवाह कायदा 1955 व्यतिरिक्त विवाह नोंदणीकृत असलेल्या प्रकरणांमध्ये, जोडप्याने फॉर्मेटच्या परिशिष्ट-1 नुसार वेगळे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या लग्नासाठी कोणतेही प्रोत्साहन उपलब्ध नाही. विवाहानंतर एक वर्षाच्या आत प्रस्ताव सादर केल्यास तो वैध मानला जाईल.

जर जोडप्याला राज्य सरकारकडून आधीच कोणतेही प्रोत्साहन मिळाले असेल. / केंद्रशासित प्रदेश प्रशासन या उद्देशासाठी, जोडप्यांना मंजूर / जारी केलेली रक्कम या योजनेअंतर्गत त्यांना जारी करण्यात येणाऱ्या एकूण प्रोत्साहनातून समायोजित केली जाईल.

योजनेंतर्गत प्रोत्साहन देण्याच्या प्रस्तावाची शिफारस एकतर संसद सदस्य किंवा विधानसभेचे सदस्य किंवा जिल्हाधिकारी / दंडाधिकारी यांनी केली पाहिजे आणि राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकार / जिल्हा दंडाधिकारी / जिल्हाधिकारी / उपायुक्त यांनी सादर केली पाहिजे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजनेत ( intercaste marriage ) प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

आंतर जातीय विवाह केलेल्या दांम्पत्यासह या योजनेतर्गत 2 लाख 50 हजार रुपये इतके अर्थसहाय्य दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आंतर जातीय विवाहित दांम्पत्यापैकी एक व्यक्ती अनुसूचित जातीचा असणे आवश्यक आहे.

विवाहाचा एक वर्षाच्या आत परिपूर्ण प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद कार्यालयास प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

सविस्तर माहिती साठी योजनेच्या २०२० च्या मार्गदर्शक सूचना खालील लिंक वर पहा

New GR

योजेने साठी सादर करावयाच्या अर्जाचा नमुना खालील लिंक वर मिळेल. dr babasaheb ambedkar marriage scheme form PDF

arj namuna

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *