आणीबाणी बंदिवासांना मानधन देण्याची आणीबाणी पेन्शन योजना ( anibani pension yojana ) पुन्हा सुरू. ३१ ऑक्टोंबर २०२२ पर्यंत अर्ज सादर करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन,
anibani pension yojana 2022
पात्रताधारकांनी परिपूर्ण कागदपत्रांसह अर्ज करण्याचे प्रशासनाचे आवाहन.
आणीबाणीच्या कालावधीत (सन 1975 ते 1977) मधील लढा देणाऱ्या व्यक्तींना सन्मान / यथोचित गौरव करण्यासाठी आणीबाणी बंदिवासांना मानधन देण्याची योजना नव्याने सुरु करण्यात आली आहे.
ही योजना नव्याने सुरु करण्यास 28 जुलै 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत आणीबाणीच्या काळात एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक 10 हजार रुपये व त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस / पतीस 5 हजार रुपये मानधन देण्यात येईल.
एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक 5 हजार रुपये तर त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस / पतीस 2 हजार पाचशे रुपये मानधन अनुज्ञेय राहील.
Arj Namuna Download Here
आणिबाणीच्या लढयामध्ये सहभाग घेतलेल्या व्यक्ती ज्यांनी यापूर्वी अर्ज केला नाही त्यांनी अर्जाचा नमुना परिशिष्ट अ व शपथपत्राचा मसुदा परिशिष्ट ब मध्ये माहिती व आवश्यक पुरावा कागदपत्रांच्या प्रमाणित प्रतीसह अर्ज सादर करावेत, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.