Shettale Anudan 2022 सामूहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरनासाठी अनुदान

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2022-23 अंतर्गत सामूहिक शेततळे ( Shettale anudan 2022) तर RKVY वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण घटकांसाठी अर्ज सुरू, शेतकऱ्यांनी महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन.

Shettale Anudan 2022

Shettale Anudan 2022 – Application Start

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2022-23 अंतर्गत वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण व सामूहिक शेततळे घटकांसाठी अर्ज सुरू, शेतकऱ्यांनी महा-डीबीटी पोर्टलवर ( Mahadbt Farmer Scheme )अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सामुहिक शेततळे हा घटक फलोत्पादन पिकासाठी संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण करणे व या उद्येशाने 100% अनुदानावर Shettale Anudan 2022 राबिवण्यात येत आहे.

याचबरोबर राष्ट्रीय कृषि विकास योजना अभियानाअंतर्गत वैयक्तिक शेततळे अस्तरीकरन हा घटक पाण्याचा साठा निर्माण करणे व साठविलेले पाणी झिरपून वाया जाऊ नये. पाणी टंचाईच्या काळात फळबागा जगविण्यासाठी साठविलेल्या पाण्याचा उपयोग व्हावा या उद्देशाने 50 टक्के अनुदानावर वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण ही योजना राबविण्यात येत आहे.

ज्या शेतकऱ्यांनी स्वखर्चाने अथवा विविध शासकीय योजनेतून शेततळे खोदकाम ( farm pond ) केले आहे, अशा पात्र शेतकऱ्यांना शेततळयाच्या आकारमान निहाय पुढीलप्रमाणे ५०% किंव्हा कमाल मर्यादेपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.

वैयक्तिक शेततळे अस्तरीकरन या घटकासाठी आकारमाननिहाय देण्यात येणारे अनुदान पुढीलप्रमाणे-

  1. 15X15X3 मीटरसाठी 50 टक्के प्रमाणे अनुदान रक्कम 28 हजार 275 रुपये.
  2. 20X25X3 मीटरसाठी 50 टक्के प्रमाणे अनुदान रक्कम 31 हजार 598 रुपये.
  3. 20X20X3 मीटरसाठी 50 टक्के प्रमाणे अनुदान रक्कम 41 हजार 218 रुपये.
  4. 25X20X3 मीटरसाठी 50 टक्के प्रमाणे अनुदान रक्कम 49 हजार 671 रुपये.
  5. 25X25X3 मीटरसाठी 50 टक्के प्रमाणे अनुदान रक्कम 58 हजार 700 रुपये.
  6. 30X25X3 मीटरसाठी 50 टक्के प्रमाणे अनुदान रक्कम 67 हजार 728 रुपये
  7. 30X30X3 मीटरसाठी 50 टक्के प्रमाणे जास्तीत जास्त देण्यात येणारे अनुदान रक्कम 75 हजार रुपये असेल.

सामूहिक शेततळे या घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी समुहाकडे फलोत्पादन पिके असणे आवश्यक आहे. पात्र शेतकऱ्यांना पुढीलप्रमाणे अनुदान देय आहे. आणि तसे हमीपत्र ही शेतकऱ्यांना द्यावे लागेल.

सामूहिक शेततळे घटकांसाठी आकारमान निहाय देय अनुदान पुढील प्रमाणे आहे.

आकारमान (मी) 34 x34 x4.7 फलोत्पादन क्षेत्र (हे.) 2 हेक्टर ते 5 हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त अनुदान लाखात- 3 लाख 39 हजार रुपये,

आकारमान (मी) 24 x24 x4 फलोत्पादना क्षेत्र (हे.) 1 हेक्टर ते 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त अनुदान लाखात- 1 लाख 75 हजार रुपये असे आहे.

त्यानूसार महा-डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. संगणक/ लॅपटॉप, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून उक्त संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावयाचे आहे.

त्याकरीता पोर्टलवर अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे सातबारा, आठ अ, बँक पासबुक व आधारकार्ड लिंक असलेला मोबाईल सोबत असणे आवश्यक आहे.

सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, सदर घटकाचा लाभ घेण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सिंचन सुविधा या घटकाखाली अर्ज करावेत.

योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, आपल्या तालूक्यातील तालूका कृषि अधिकारी, कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: