जिल्ह्याची खरिप पिकांची पैसेवारी ( akola paisewari ) ५० पैशांपेक्षा कमी,
Akola paisewari 2023 jahir अकोला खरीप पिकांची 2023 ची अंतिम पैसेवारी / आणेवारी जाहीर.
राज्यात खरीप हंगामातील पीक परिस्थितीची पाहणी करून पैसेवारी काढली जाते.
जिल्ह्यात यंदा पावसाळ्यात सर्व भागात सारखा पाऊस झाला नाही. पेरण्यांना उशिराने सुरवात झाली. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड व शेवटी सप्टेंबर मध्ये अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे खरिपातील पिकांचे पिकांचे मोठे नुकसान झाले होते यामुळे आता आणेवारी वर काय परिणाम होतोय याकडे सर्वांचे लक्ष होते.
शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीपोटी मिळणारे अनुदान, आर्थिक मदत, पिकविमा मिळण्यासाठी अनेक घटकांचा विचार केला जातो. यामध्ये पैसेवारीही खूप महत्त्वाची मानली जाते.
जिल्हयातील सातही तहसील कार्यालयांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांनुसार जिल्हयातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आली. त्यानुसार जिल्हयातील लागवडीयोग्य ९९० गावांमधील खरीप पिकांची नजरअंदाज सरासरी पैसेवारी ४८ पैसे म्हणजेच ५० पैशांपेक्षा कमी आहे.
तालुकानिहाय गावाची अंतिम पैसेवारी
अकोला तालुक्यातील १८१ गावांची पैसेवारी ४८ पैसे आली आहे.
अकोट तालुक्यातील 185 गावांची पैसेवारी ४८ पैसे आली आहे.
तेल्हारा तालुक्यातील 106 गावांची पैसेवारी ४८ पैसे आली आहे.
बाळापूर तालुक्यातील 103गावांची पैसेवारी ४८ पैसे आली आहे.
पातूर तालुक्यातील 94 गावांची पैसेवारी ४८ पैसे आली आहे.
मूर्तिजापूर तालुक्यातील 164 गावांची पैसेवारी ४६ पैसे आली आहे.
बार्शिटाकळी तालुक्यातील 157 गावांची पैसेवारी ४७ पैसे आली आहे.
Hungami paisewari update हेही पाहा
यंदाच्या (2023) खरीप हंगामातील ( hungami paisewari Kharip Season) पिकांची हंगामी पैसेवारी , नजरअंदाज पैसेवारी जिल्हा प्रशासनातर्फे शनीवारी (ता. ३० ) जाहीर करण्यात आली. त्यानुसार अकोला ( akola Kharip paisewari ) जिल्ह्याची हंगामी पैसेवारी सरासरी 57 पैसे दाखविण्यात आली आहे.
जिल्हयातील सातही तहसील कार्यालयांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांनुसार जिल्हयातील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आली. त्यानुसार जिल्हयातील लागवडीयोग्य ९९० गावांमधील खरीप पिकांची नजरअंदाज सरासरी पैसेवारी ५७ पैसे म्हणजेच ५० पैशांपेक्षा जास्त आहे.
तालुकानिहाय गावाची नजरअंदाज पैसेवारी
अकोला तालुक्यातील १८१ गावांची पैसेवारी ५५ पैसे आली आहे.
अकोट तालुक्यातील 185 गावांची पैसेवारी 57 पैसे आली आहे.
तेल्हारा तालुक्यातील 106 गावांची पैसेवारी ५५ पैसे आली आहे.
बाळापूर तालुक्यातील 103गावांची पैसेवारी 56 पैसे आली आहे.
पातूर तालुक्यातील 94 गावांची पैसेवारी 62 पैसे आली आहे.
मूर्तिजापूर तालुक्यातील 164 गावांची पैसेवारी 57 पैसे आली आहे.
बार्शिटाकळी तालुक्यातील 157 गावांची पैसेवारी 58 पैसे आली आहे.
जिल्हयातील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जिल्हयातील कपाशी आणि सोयाबीन या पिकांच्या नजरअंदाज पैसेवारीचा समावेश
सन 2023 या वर्षाकरीता तहसिलदार यांच्याकडुन प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार खरीप हंगामातील प्रमुख पिकांची जिल्ह्याची सरासरी हंगामी अंतिम पैसेवारी 48 पैसा इतकी जाहिर करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
तालुक्यानिहाय हंगामी पैसेवारी
अकोला 55 पैसे,
अकोट 57 पैसे,
तेल्हारा 55 पैसे,
बाळापूर 56 पैसे,
पातूर 62 पैसे,
मुर्तिजापूर 57 पैसे
बार्शीटाकळी 58 पैसे
असे सरासरी 57 पैस निश्चित करण्यात आली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून शेतीपिकांचे मोठे नुकसान होत आहे. नियमित पावसापेक्षा परतीच्या पावसामुळे शेतीचे नुकसान होत आहे.
यामुळे पैसेवारीही कमी येत आहे. वास्तविक पहाता शेतीचे नुकसान होणे, हा प्रकारच नकारात्मक आहे. यामुळेच पैसेवारी कमी होते, अनुदान व विम्यासाठी ही पैसेवारी योग्य नसल्याचे सांगण्यात येते.
Akola antim paisewari