जिल्ह्याची खरिप पिकांची पैसेवारी ( amravati antim paisewari ) 48 पैशावर, शेतकऱ्यांची शासनाच्या मदती कडे नजर.
Amravati antim paisewari 2022 jahir नांदेड जिल्हा खरीप पिकांची अंतिम पैसेवारी 48 पैसे
राज्यात खरीप हंगामातील पीक परिस्थितीची पाहणी करून पैसेवारी काढली जाते. यामध्ये सुरुवातीला ३० ऑक्टोबरला सुधारित पैसेवारी जाहिर केली गेली होती, मात्र आता शेतकऱ्यांचे लक्ष अंतिम पैसेवारी कडे लागले होते.
जिल्ह्यात यंदा पावसाळ्यात सर्व भागात सारखा पाऊस झाला नाही. पेरण्यांना उशिराने सुरवात झाली. त्यानंतर जून ते ऑगस्ट व शेवटी ऑक्टोबर मध्ये अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे खरिपातील पिकांचे पिकांचे मोठे नुकसान झाले होते यामुळे आता आणेवारी वर काय परिणाम होतोय याकडे सर्वांचे लक्ष होते.
यानंतरच्या काळातही पिकांमध्ये पाहिजे तशी सुधारणा झाली नाही. परिणामी जिल्ह्यातील बहुतांश पिके हातातून गेली.
जिल्हा प्रशासनाने पैसेवारी जाहीर केली. जिल्ह्याची ही अंतिम पैसेवारी 48 टक्क्यांच्या घरात आहे.
अमरावती जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांची पैसेवारी पन्नास पैशाच्या खाली जाहीर झाल्याचा अहवाल प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे पाठविला होता.
यानंतर अंतिम पैसेवारी जाहीर झाली. यातही जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांची पैसेवारी ४८ पैसे जाहीर केली आहे.
खरिपातील अंतिम पैसेवारी पन्नास पैशांच्या खाली जाहीर झाल्याचे जिल्हाधिकारी यांनी विभागीय आयुक्तांना कळविले आहे.
तालुकानिहाय पैसेवारी
अमरावती ४७
तिवसा ४८
चांदूर रेल्वे ४८
धामणगाव ४७
नांदगाव खंडे. ४८
मोर्शी ४६
वरुड ४७
अचलपूर ४७
चांदूरबाजार ४७
दर्यापूर ४७
अंजनगाव सु ४५
धारणी ४९
चिखलदरा ४८
भातकुली ४८
यावर्षी खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस आणि तूर या पिकांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. प्रारंभी अतिवृष्टीने सोयाबीनचे पीक हातून गेले.
अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन सोंगताही आले नाही. सततच्या पावसाने आणि पूरपरिस्थितीने पीक वाहून गेले. तर सततच्या पावसाने शेताचे नुकसान झाले.
शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीपोटी मिळणारे अनुदान, आर्थिक मदत, पिकविमा मिळण्यासाठी अनेक घटकांचा विचार केला जातो. यामध्ये पैसेवारीही खूप महत्त्वाची मानली जाते.
यामुळे पैसेवारीही कमी येत आहे. वास्तविक पहाता शेतीचे नुकसान होणे, हा प्रकारच नकारात्मक आहे. यामुळेच पैसेवारी कमी होते.