९०% अनुदानावर शेळी गट वाटप, अर्ज सुरू | Ahilya yojana

राज्य आणि केंद्र सरकारच्या ९०% अनुदानावर १० शेळी १ बोकड साठी राबवली जाणाऱ्या अहिल्या योजना ( Ahilya yojana) करिता अर्ज सुरू, घ्या जाणून अटी शर्ती पात्रता व कागदपत्र माहिती.

Ahilya yojana

अहिल्या शेळी योजना Ahilya yojana 2023

अहिल्या शेळी योजना Ahilya yojana 2023 या योजने अंतर्गत राज्यातील वय १८ ते ६० वर्षा मधील, अनुसूचित जाती / जमाती, दारिद्र्य रेषे खालील, अल्प भूधारक (१ ते २ हेक्टर पर्यन्त भूधारक ), अश्या लाभार्थ्या कडून दि. १०/१२/२०२२ ते दि. ०७ जानेवारी २०२३ अर्ज मागविण्यात आले आहेत.

अहिल्या शेळी योजना Ahilya yojana 2023 योजनेची पूर्ण माहिती / अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती याबाबतचा संपूर्ण तपशील www.mahamesh.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज महामंडळाच्या www.mahamesh.co.in या संकेतस्थळावर तसेच Android Mobile मधील Google Play store वरून Ahilya Yojana App व्दारे वरील

Application link – https://play.google.com/store/apps/details?id=com.ahilyayojanahttps://play.google.com/store/apps/details?id=com.ahilyayojana

अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्विकारले जाणार आहेत.

योजनेचे ठळक वैशिष्ठे

• राज्यात शेळी पालन व्ययसायास प्रोत्साहन देण्यासाठी. योजने अंतर्गत देण्यात येणारे लाभ

• उस्मानाबादी / संगमनेरी अथवा स्थानिक वातावरणात तग घरातील अशा प्रजातींच्या पैदासक्षम १० शेळ्या व १ बोकड असा शेळीगत वाटप करण्यात येईल • एकूण रक्कम रु ६६०००/-

• लाभार्थी साठी ९०% शासन हिस्सा (रु ५९,४००/-) व १०% लाभार्थी हिस्सा (रु,

६६००/-)

Ahilya yojana पात्रता

• अनुसूचित जाती जमाती साठी

• दारिद्र्य रेषे खालील लाभार्थी

• अल्प भूधारक (१ ते २ हेक्टर पर्यन्त भूधारक)

• महिलां लाभार्थीनाच प्राधान्य

• लाभधारकाचे वय १८ वर्षापेक्षा कमी व ६० वर्षापेक्षा जास्त नसावे.

• पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेअंतर्गत गेल्या ३ वर्षामध्ये लाभ घेतलेल्या व्यक्तीस किंवा कुटुंबातील व्यक्तीस या योजनेअंतर्गत पुन्हा अर्ज करता येणार नाही.

• एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस अर्ज करता येईल.

• अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेत किंवा सेवानिवृत्ती वेतनधारक / शासकीय पदाचा लाभ घेणारा, तसेच राज्य, केंद्र शासन / स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य / पदाधिकारी/ लोकप्रतीनिधी नसावा.

अर्ज वेळापत्रक व कार्यपद्धती

• अर्ज सादर करण्याचा कालावधी १०/१२/२०२२ ते ०७/०१/२०२३ पर्यंत

कागदपत्र अपलोड करण्याची मुदत ०६ मार्च २०२३

• योजनेची पूर्ण माहिती या अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती याबाबतचा संपूर्ण तपशील www.mahamesh.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

• ऑनलाईन पद्धतीने अर्ज महामंडळाच्या वरील संकेतस्थळावर तसेच Android Mobile मधील Google Play store वरून AhilyaYojana App व्दारे करण्यात यावे

• अधिक माहिती साठी संकेतस्थळ वर भेट घ्या www.mahamesh.co.in

ahilya yojana कागदपत्र

० आधार कार्ड

° लाभार्थी फोटो

० रेशन कार्ड

० जातीचा दाखला (सक्षम अधिकाऱ्यांचा)

० रहिवासी दाखला (सक्षम प्राधिकारी) (बंधपत्रामधील नमुना क्रमांक २ मध्येच सादर करावयाचा आहे)

• अपत्य दाखला (बंधपत्रामधील नमुना क्रमांक ३ मध्येच सादर करावयाचा आहे). १ मे २००१ नंतर तिसरे हयात अपत्य नसावे.. ० अर्जदाराचे शेतजमिनीचा अलीकडील तीन महिन्यातील ७/१२ उतारा किंवा

अर्जदाराच्या नावे जमीन नसल्यास (कुटुंबियांपैकी) संमतीपत्र देणाऱ्या व्यक्तीच्या नावाच्या शेतजमिनीचा ७/१२ उतारा व १०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर संमतीपत्र (बंधपत्रामधील नमुना क्रमांक ४ मध्येच सादर करावयाचा आहे). or भाडेतत्वावर शेतजमीन घेतली असल्यास शेतजमीन मालकासमवेत केलेल्या भाडेकराराची सत्यप्रत (रु. १००/- स्टॅम्प पेपर वर नोटरी करून) (बंधपत्रामधील नमुना क्रमांक ५ मध्येच सादर करावयाचा आहे).

० अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)

० महामंडळामार्फत शेळी मेंढी पालनाचे प्रशिक्षण घेतले असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र

० स्वयंमघोषणा पत्र ( बंधपत्रामधील नमुना क्रमांक ६ मध्येच सादर करावयाचा

आहे)

० बीपीएल कार्ड

० बँक पासबुक ची झेरॉक्स

आपण जर या अटी पात्रता निकषात बसत असाल तर अर्ज करू शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *