वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना सोलर पंप | solar pump registration

वीज जोडणी साठी कोटेशन भरून वीज जोडनीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मिळणार सोलर पंप नोंदणी ( solar pump registration) सुरू.

solar pump registration

solar pump registration 2023 for paid pending

राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावे म्हणून राज्य शासन शेतकऱ्यांसाठी अनुदानावर सौर कृषी पंप ( Saur krishi pump yojana ) योजना गेल्या काही वर्षापासून राबवीत आहे.

याचबरोबर बरेच शेतकरी विजेच्या नवीन जोडणीच्या प्रतीक्षेत ही आहेत यासाठी अशा प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील १ लाख शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाद्वारे जोडणी दिली जाणार आहे.

यात ज्या शेतकऱ्यांनी महावितरणाकडे वीज कनेक्शन साठी अर्ज करून वीज कनेक्शन साठी कोटेशन भरलेले आहे. परंतु अद्याप त्यांची वीज जोडणी करून देण्यात आलेली नाही अशा शेतकऱ्यांसाठी आता विजेच्या कनेक्शन ऐवजी सोलर पंप ( Solar Pump ) देण्याचे धोरण निश्चित केले आहे.

यासाठी अशा जोडण्या प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना आपण सोलर जोडणी साठी इच्छुक आहात का हे विचारून त्यांची नवीन सोलर पंप जोडणी साठी नोंदणी घेतली जात आहे.

ज्या शेतकऱ्यांनी विजेच्या जोडणी घेण्यासाठी महावितरणाकडे कोटेशन चा भरणा केलेला आहे. अशा शेतकऱ्यांना महावितरण द्वारे मेसेज देऊन नोंदणी साठी सांगण्यात येत आहे.

महावितरण च्या माध्यमातून ही नोंदणी करण्यासाठी महावितरणच्या वेबसाइटवर एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन आपण आपली अर्जाची नोंदणी करू शकतात.

Link 👉 https://wss.mahadiscom.in/wss/wss?uiActionName=getAgPPConsent

नोंदणी कशी करावी पहा खालील व्हिडिओ मध्ये.


वरील अर्जाची पेज Link ओपन झाल्यानंतर आपल्याला सुरुवातीला या पेज वरती आपणास ग्राहक क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे.

ग्राहक नंबर वर एंटर केल्यानंतर नोंदणी या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक अर्जाचे पेज दिसेल.

त्या अर्जामध्ये शेतकऱ्या विषयी सर्व माहिती दाखवली जाईल. त्यानंतर तुम्ही मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून सोलर पंप घेण्यास इच्छुक आहात का असे विचारले जाईल.

तुम्ही इच्छुक असाल तर होय किंवा इच्छुक नसेल तर नाही बटन वर क्लिक करावे.

त्यानंतर या ठिकाणी तुमची नोंदणी केली जाईल की तुम्ही सौर पंप घेण्यासाठी इच्छुक आहात.

त्यानंतर तुमची सोलर देण्याच्या प्रक्रिया सुरू होईल.

इच्छुक या वर क्लिक केलं तर तुम्हाला परत एक ओटीपी पाठवला जाईल ज्यामधून तुमचे व्हेरिफिकेशन केले जाईल.

नवीन पुढील अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेऊ.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: