Vrudh kalakar mandhan yojana 2024, अर्ज सुरू

वृध्द कलाकार साहित्यिक यांच्या मानधनासाठी राज्यात राबविल्या जाणाऱ्या Vrudh kalakar mandhan yojana चे सन 2024 करिता अर्ज सुरू, पहा अटी शर्ती कसा करायचा अर्ज.

Vrudh kalakar mandhan yojana

Vrudh kalakar mandhan yojana 2024 Application Invited

महाराष्ट्र हे एक अत्यंत पुरोगामी आणि सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असे राज्य आहे. अनेक कलाप्रकारांना आणि कलाकारांना महाराष्ट्राच्या या मातीने आणि रसिक प्रेक्षकांनी कायम प्रोत्साहन दिले आहे. विविध कला आणि कलाकारांप्रती राज्याच्या शासनकर्त्यांचा दृष्टीकोन उदार, सकारात्मक आणि प्रोत्साहनाचा आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे शासकीय पातळीवरील सांस्कृतिक कार्यासंबंधीच्या योजना कार्यान्वित करण्यात येतात.

राज्यातील 50 वर्ष पेक्षा जास्त वयाच्या भजनी, किर्तनी, गोंधळी, आराधी, तमाशा, साहित्यिक, गायक, वादक, कवी, लेखक अशा विविध कला क्षेत्रातील वृद्ध कलाकार, महिला, विधवा, दिव्यांग कलाकारांना वृध्द कलाकार मानधन योजनेअंतर्गत वेतन दिले जाते

ग्रामीण भागात मासिक 2250 रुपये तर राज्य स्तरीय 2700 रु पर्यंत मासिक मानधन देणारी योजना मान्यवर वृध्द साहित्यिक व कलावंत मानधन योजना शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचलनालय मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येते. 

Vrudh kalakar mandhan yojana या योजनेकरीता सन 2023- 24 करिता अर्ज मागविण्यात आले आहेत.

वृध्द कलाकार मानधन योजना

राज्यातील मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजना ही सन 1954-55 पासून संपूर्ण राज्यात या संचालनालयामार्फत राबविली जाते.

दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यात साधारणतः 100 च्या इष्टांकानुसार कलावंतांची निवड समिती करते.

मानधन मंजूर झालेल्या कलावंतांना श्रेणी निहाय (अ श्रेणी रु.3150, ब श्रेणी रु.2700, क श्रेणी रु.2250) मानधन दरमहा सांस्कृतिक कार्य संचालालयामार्फत अदा करण्यात येते.

वृध्द कलाकार मानधन ( वृद्ध कलाकार पेन्शन ) योजनेचे निकष

अर्जदार हा साहित्य व कला या क्षेत्रात ज्यांनी मोलाची कामगिरी करणारा असावा.

कला व वाड्मय क्षेत्रात 15 ते 20 वर्ष प्रदिर्घ काळाचा अनुभव असलेले कलाकार लाभार्थी होऊ शकतात.

अर्जदार कलाकार व साहित्यिकांचे वय 50 वर्षापेक्षा असावे लागते.

अर्जदार जर अर्धांगवायु, क्षयरोग, कृष्ठरोग, कर्करोग या रोगांनी आजारी असेल तसेच 40 टक्यापेक्षा जास्त शारिरिक व्यंग किंवा अपघाताने 40 टक्यांपेक्षा जास्त अपंगत्वामुळे स्वत:चा व्यवसाय करु शकत नसतील, अशा साहित्यिक व कलाकारांना वयाची अट शिथील करण्यात येते.

साहित्यिक व कलावंताच्या सर्व मार्गाने मिळून वार्षिक उत्पन्न 48 हजार रुपयेपेक्षा जास्त नसावे.

विधवा किंवा परितक्त्या वृध्द साहित्यिक व कलावंतानी मान‍धन देण्यासाठी प्राधान्य दिले जाते.

Vrudh kalakar mandhan yojana आवश्यक कागदपत्र

वृध्द साहित्यिक व कलावंत पती किंवा पत्नीचा एकत्रीत पासपोर्ट आकाराचा फोटो सक्षम अधिकारी यांनी साक्षांकित केलेला असावा,

अर्जदाराचा बँक खाते क्रमांक व बँकेचा आयएफएससी कोड सह बँक पासबुक ची सांक्षाकित प्रत, 

अर्जदाराच्या जन्मतारखेचा दाखला,

अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला,

उत्पन्नाचा दाखला.

रोग किंवा अपंगत्वाबाबत जिल्हा शल्य चिकीत्सक यांचे ऑनलाईन वैद्यकीय प्रमाणपत्र,

इतर शासकिय योजनांचा लाभ घेत नसल्याबाबतचे नोटरी केलेले प्रतिज्ञापत्राची प्रत,

कलासंबंधी अनुभव कागदपत्रे,

आधार कार्ड,

अर्जदाराचे कलाक्षेत्राबाबत परिचय पत्रात वर्षनिहाय उल्लेखनीय कार्याची माहिती. 

केंद्र, राज्य शासन पुरस्कार प्राप्त असल्यास तसेच सांस्कृतीक संचालनायाकडून पुरस्कार अथवा सन्मात पत्र सोबत जोडावे.

साहित्य प्रकाशित झाल्याबाबतचे आवश्यक पुरावे व साहित्यिक क्षेत्रातील पुरस्कार अर्जासोबत जोडावे.

अर्जदाराने अर्जामध्ये ज्या कला क्षेत्राचा उल्लेख केला असेल त्या कलाक्षेत्रासंबंधीचे आवश्यक पुरावे, रेडिओ आकाशवाणी प्रसारमाध्यमावरील कार्यक्रमाची माहिती व त्याबाबतचे छायाचित्रे, वर्तमानपत्रे कात्रणे व कला सादरीकरणाचा उल्लेख असावा.

Vrudh kalakar mandhan yojana arj Namuna PDf

कलाकार मानधन योजना Arj Namuna Pdf

for more information visit here

MAHASANSKRUTI

राज्य नाट्य महोत्सव, राज्य चित्रपट महोत्सव, तसेच संगीत, नृत्य, तमाशा, कीर्तन, भजन, लोककला, खडी गमंत, शाहिरी आणि दशावतार महोत्सव इत्यादी विविध कला महोत्सव आयोजित करण्यात येतात. याशिवाय या संचालनालयातर्फे नाट्यप्रशिक्षण शिबिरे, तमाशा प्रशिक्षण शिबिरे, बालनाट्य प्रशिक्षण शिबिरे, कीर्तन प्रशिक्षण शिबिरे व शाहिरी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येतात. याशिवाय वयोवृद्ध, अपंग, आर्थिक स्थैर्य नसलेल्या कलाकारांना आर्थिक मदत प्रदान करणे, सांस्कृतिक कार्य क्षेत्रात कार्य करीत असलेल्या संस्थांना सहाय्यक अनुदान देणे इत्यादी कामे या संचालनालयाकडे आहेत.

ज्या व्यक्तींनी साहित्य व कला क्षेत्रात मोलाची भर घातली आहे, ज्यांचे वय 50 वर्ष पूर्ण किंवा त्यापेक्षा जास्त आहे, ज्या कलावंत/साहित्यिक यांचे उत्पन्न रु.48 हजार पेक्षा जास्त नाही, जे कलावंत / साहित्यिक अन्य कोणत्याही शासकीय योजनेचा लाभार्थी नाही अशा साहित्यिक व कलावंतांना मानधन मिळण्यासाठी अर्ज करता येईल.

Vrudh kalakar mandhan yojana Application Last Date

15 feb 2024

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *