Tractor yojana 2024 – ट्रॅक्टर अनुदान योजना अर्ज सुरू

Tractor yojana 2024 – ट्रॅक्टर अनुदान योजना अर्ज सुरू. राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजना राबविण्यासाठी मान्यता, पहा अटी शर्ती अनुदान सविस्तर माहिती.

Tractor yojana 2023

Tractor yojana 2024 GR

राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजना सन 2024 मध्ये राबविण्यासाठी करिता रु. 56 कोटी निधी वितरीत करण्याबाबत

राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजना Tractor yojana 2024  पार्श्वभूमी 

राज्यात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. तथापि,शेती कामांसाठी मजुरांचा प्रश्न गंभीर आहे .सध्याचे व त्यामुळे शेती साठी येणारा खर्च, मजुरांचा अभाव यामुळे शेतीची कामे वेळेवर न होणे आणि प्रत्यक्ष शेतीतून मिळणारे उत्पन्न यामुळे शेती व्यवसाय हा खडतर होत आहे.

सन २०२२ शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे केंद्र शासनाचे उद्दिष्ट असून शेतीकरिता लागणाऱ्या निविष्ठांचा खर्च कमी करून उत्पादनामध्ये वाढ करावयाची झाल्यास पारंपारिक शेतीमध्ये बदल करून आधुनिक पद्धतीने यांत्रिकीकरणात द्वारे शेती करणे आवश्यक आहे.

https://youtube.com/live/5uNjJ8mIECE?feature=share

त्यासाठी पेरणी ,कापणी पश्चात प्रक्रिया यांत्रिकीकरणाने द्वारे करणे गरजेचे आहे. यांत्रिकीकरणाचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्यास शेती उत्पादनामध्ये वाढ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणे शक्‍य आहे.

महाराष्ट्रात सुमारे ८०% शेतकरी हे अल्प व अत्यल्प भूधारक आहेत .यांत्रिकी करण्यासाठी लागणारे यंत्र किंवा अवजारे शेतकरी त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे खरेदी करू शकत नाही. त्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करणे गरजेचे आहे.

केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरणाचा कार्यक्रम राज्यात राबविण्यात येतो. त्याचप्रमाणे ,राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान ,राष्ट्रीय तेलबिया व तेलताड अभियान व एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम अंतर्गत सुद्धा अल्पप्रमाणात यांत्रिकीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येतो.

तथापि, शेतकऱ्यांकडून असणाऱ्या मागणीच्या प्रमाणात या योजनेमधून शेतकऱ्यांना कृषी अवजारांचा पुरवठा करणे शक्य होत नाही .यापूर्वी राष्ट्रीय कृषी विकास योजनेमधून  कृषी यांत्रिकीकरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात येत होता. तथापि, सद्यस्थितीत राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून देण्यात येणाऱ्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे.

त्यामुळे कृषी यांत्रिकीकरणासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना मधून फारसा निधी उपलब्ध करून देणे शक्य होत नाही. तसेच ,राष्ट्रीय कृषी विकास योजनेमध्ये ट्रॅक्टर, ऊस कापणी यंत्र, पावर टिलर यांसारख्या जास्त किमतीच्या यंत्रांना अनुदान अनुज्ञेय नाही. परंतु ,सदर यंत्रांची मागणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे केंद्र शासन पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी मर्यादा आहे.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात १८ मे २०१८ राज्यात 100% राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना ( Tractor yojana 2022 ) ही योजना राबविण्यास मान्यता दिली.

राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना योजना हि १०० % राज्य पुरस्कृत योजना आहे.

Tractor yojana 2024 या योजने मध्ये

ट्रॅक्टर, पॉवर टीलर,

स्वयंचलित औजारे उदा.रिपर,रिपर कम बाइंडर, पॉवर वीडर(इंजीन ऑपरेटेड),

ट्रॅक्टर चलीत औजारे उदा. रोटाव्हेटर, पीटीओ ऑपरेटेड वीडर, रेज्ड बेड प्लांटर, पल्टी नांगर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र(थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर),कॉटन श्रेडर,ट्रॅक्टर माउन्टेड स्प्रेयर, 

काढणी पश्चात तंत्रज्ञान उपकरणे उदा.मिनी राईस मिल, मिनी दाल मिल, पैकिंग मशीन, ग्राईंडर/पल्व्हराइजर/पॉलीशर, क्लिनर कम ग्रेडर,

अशा प्रकारच्या औजारांच्या खरेदी साठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते.

Tractor yojana 2023 अनुदान 👇👇

पात्र औजारे व मिळणार अनुदान

अल्प व अत्यल्प भुधारक,अनुसूचित जाती/जमाती आणि महिला शेतकरी यांना या योजनेत ५०% अनुदान मिळते तर इतर शेतकऱ्यांना ४० % अनुदान मिळते. 

Tractor yojana 2024 अनुदानासाठी जीएसटी रक्कम गृहित धरण्यात येत नाही.

त्याच प्रमाणे शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी गट यांना कृषी औजारे बँक स्थापन करण्यासाठी 60 टक्के, १२ लाख रु. पर्यंत अनुदान मिळते.

अल्प भूधारक / अत्यल्प भूधारक / महिला शेतकरी / अज / अजा शेतकरी

  • Tractor yojana 2022 ट्रॅक्टर (08-70 पीटीओ एचपी) -2,00,000 TO 5,00,000
  • पॉवर टिलर – 8 बीएचपी व त्यापेक्षा जास्त – 85000/- 8 बीएच पी पेक्षा कमी – 65000/-
  • रिपर कम बाइन्डर (3 व्हील) – 175000/-
  • रिपर कम बाइन्डर (4 व्हील) – 250000/-
  • रीपर – 75000/-
  • पॉवर वीडर (2 बीएचपी पेक्षा कमी इंजीन ऑपरेटेड  ) – 25000/-
  • पॉवर वीडर (2 बीएचपी ते 5 एचपी इंजीन ऑपरेटेड ) – 35000/-
  • पॉवर वीडर (5 बीएचपी पेक्षा जास्त इंजीन ऑपरेटेड) – 63000/-

35 बिएचपी पेक्षा जास्त ट्रॅक्टर चलित अवजारे

  • रोटाव्हेटर 5 फुट – 42000/-
  • रोटाव्हेटर 6 फुट – 44800/-
  • थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा कमी) – 100000/-
  • थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा जास्त) – 250000/-
  • पेरणी यंत्र (सीड ड्रिल 9 दाती व त्यापेक्षा जास्त) – 20000/-
  • रेजड बेड प्लांटर (बीबीएफ यंत्र)- 35000/-
  • कल्टीव्हेटर – 50000/-
  • पलटी नांगर हायड्रॉलिक डबल बॉटम – 70000/-
  • पलटी नांगर हायड्रॉलिक ट्रिपल बॉटम – 89500/-
  • पलटी नांगर मेकॅनिकल डबल बॉटम – 40000/-
  • नांगर मेकॅनिकल ट्रिपल बॉटम – 50000/-
  • ट्रॅक्टर माउन्टेड/ऑपरेटेड स्प्रेयर (एयर केरियेर/एयर असिस्ट)- 125000/-
  • विडर (पीटीओ ऑपरेटेड)/वीड स्लैशर- 75000/-
  • कॉटन श्रेडर/मॉवर श्रेडर -100000/-
  • Chaff cutter- ( operated by engine/electric motor below 3 hp and power Tiller, and tractor of below 20 hp)-  20000/- रु.
  • Manually operated chaff cutter (above 3 feet)-  रु.6300/-.
  • Manually operated chaff cutter ( upto 3 feet)-  50 टक्के, रु.5000/-.

Tractor yojana 2023 या योजनेत इतर लाभार्थी शेतकऱ्यांना ४० %  अनुदान दिले जाते.

ट्रॅक्टर (08-70 पीटीओ एचपी )-100000/-

पॉवर टिलर –  8 बीएच पी पेक्षा कमी – 50000/- 8 एचपी आणि त्यापेक्षा जास्त – 70000/-

स्वयंचलित अवजारे

  • रिपर कम बाइन्डर (3 व्हील) – 140000/-
  • रिपर कम बाइन्डर (4 व्हील) – 200000/-
  • रीपर – 60000/-
  • पॉवर वीडर (2 बीएचपी पेक्षा कमी इंजीन ऑपरेटेड  ) – 20000/-
  • पॉवर वीडर (2 बीएचपी ते 5 बीएचपी इंजीन ऑपरेटेड) – 30000/-
  • पॉवर वीडर (5 बीएचपी पेक्षा जास्त इंजीन ऑपरेटेड) – 50000/-

35 बिएचपी पेक्षा जास्त ट्रॅक्टर चलित अवजारे

  • रोटाव्हेटर 5 फुट – 34000/-
  • रोटाव्हेटर 6 फुट – 35800/-
  • थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर -(क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा कमी)- 80000/-
  • थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर -(क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा जास्त)- 200000/-
  • पेरणी यंत्र (सीड ड्रिल 9 दाती व त्यापेक्षा जास्त) – 16000/-
  • रेजड बेड प्लांटर (बीबीएफ यंत्र)- 30000/-
  • कल्टीव्हेटर – 40000/-
  • पलटी नांगर हायड्रॉलिक डबल बॉटम – 56000/-
  • पलटी नांगर हायड्रॉलिक ट्रिपल बॉटम – 71600/-
  • पलटी नांगर मेकॅनिकल डबल बॉटम – 32000/-
  • पलटी नांगर मेकॅनिकल ट्रिपल बॉटम – 40000/-
  • ट्रॅक्टर माउन्टेड/ऑपरेटेड स्प्रेयर- 100000/-
  • विडर (पीटीओ ऑपरेटेड)/वीड स्लैशर- 60000/-
  • कॉटन श्रेडर/मॉवर श्रेडर -80000/-
  • Chaff cutter- ( operated by engine/electric motor below 3 hp and power Tiller, and tractor of below 20 hp)-  16000/- रु.
  • Manually operated chaff cutter (above 3 feet)-  रु.5000/-.
  • Manually operated chaff cutter ( upto 3 feet)-  रु.4000/-

आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात Documents For Tractor Scheme

  1. शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे
  2.  शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा
  3.  शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक
  4. ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजाराचा टेस्ट रिपोर्ट ( machinery test report) परिक्षण अहवाल 
  5. बँक पास बुक,
  6. यंत्राचे कोटेशन,
  7.  फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार
  8.  कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास, ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक असणार आहे. 
  9.  शेतकऱ्याने एखाद्या घटकाचा  / औजाराचा  लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला सन २०२१ – २२ मध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील १० वर्षे ट्रॅक्टरसाठी लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाही सन २०२२ – २३  मध्ये इतर औजारासाठी मात्र तो शेतकरी लाभार्थी म्हणून पात्र राहील. 

How to apply tractor yojana 2023 अर्ज कुठे करावा

Tractor yojana 2023 या योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने mahadbt farmer scheme https://mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर भरणे आवश्यक आहे.

यासाठी शेतकरी स्वतःच्या मोबाईल/लैपटॉपवर त्याचप्रमाणे सीएससी सेंटर/ ग्रामपंचायत मधील संग्राम केंद्र येथे ही हा अर्ज भरु शकतात.

एक शेतकरी एक अर्ज योजना ( Mahadbt Farmer Scheme ) अनेक या संकेत स्थळावर “शेतकरी योजना” ( Farmer Scheme ) हा पर्याय निवडायचा आहे. शेतकरी यांना “वैयक्तीक लाभार्थी” तसेच “शेतकरी गट/एफपीओ/सहकारी संस्था” म्हणुन नोंदणी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. प्रथम युजर नेम आणि पासवर्ड तयार करुन आपले खाते उघडायचे आहे.

Watch to register

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: