अत्यल्प पाऊस कारणाने झालेल्या नुकसानीस्तव धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ( soyabin vima Osmanabad ) सोयाबीन पिक वीमा मंजूर करण्यात आला आहे.
soyabin vima Osmanabad GR 2023
त्यानुसार धाराशिव जिल्ह्यात खरीप ज्वारी बाजरी मका उडीद मूग दूर सोयाबीन व कापूस या पिकांसाठी पीक विमा योजना kharip pik vima 2023 राबविण्यात येत आहे.
सदरची अधिसूचना निर्गमित करताना खालील प्रातिनिधीक सूचकांच्या (Proxy Indicator) आधारे अधिसूचित विमा क्षेत्र घटकातील अधिसुचित पीकांकरीता अधिसूचना निर्गमित करणेबाबत तरतूद आहे. प्रातिनिधीक सूचक पुढीलप्रमाणे.
१. तीव्र दुष्काळ स्थिती (दुष्काळ संहिता २०१६ नुसार )
२. पावसातील ३-४ आठवडयापेक्षा जास्त खंड आल्याने एकूण पावसाचे कमी झालेले प्रमाण. ३. तापमानातील असाधारण घट/वाढ (दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत २० टक्केपेक्षा जास्त तफावत).
४. पर्जन्यमानातील असाधारण कमी/जास्त प्रमाण (दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत २० टक्केपेक्षा जास्त तफावत).
५. मोठया प्रमाणात किड, रोग यांचा पिकांवरील प्रादुर्भाव (पिक पेरणी क्षेत्राच्या २५ टक्केपेक्षा जास्त क्षेत्रावर तीव्र प्रादुर्भाव).
६. इतर नैसर्गिक आपत्ती, पूर परिस्थिती ज्यामुळे एकूण पिक पेरणी क्षेत्राच्या २५ टक्केपेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाल्यास. वरील बाबींकरीता उपग्रह छायाचित्र, इस्रो (ISRO) / सॅक (SAC), MNCFC किंवा इतर शासकीय यंत्रणांचा अहवाल, पिक परिस्थितीबाबत शास्त्रज्ञांचे नियमित अहवाल, वृत्तपत्र किंवा वर्तमानपत्रात प्रसिध्द बातम्या इत्यादींच्या आधारे.
तद्नुषंगाने, मी डॉ सचिन ओम्बासे, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हास्तरीय संयुक्त समिती, प्रधानमंत्री पिक विमा योजना, उस्मानाबाद या अधिसुचनेद्वारा प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत उपरोक्त संदर्भ क्र. १ च्या मार्गदर्शक सूचनेमधील मुद्दा क्र.२१.४ व २१.४.६.७ अन्वये हंगामातील प्रतिकुल परिस्थितीत नुकसान भरपाई यानुसार जिल्ह्यातील खालील मंडळात उत्पंनात घट दिसून आली आहे.
त्यामुळे शासन निर्णय क्र प्रपिवियो – २०२३ /प्रक्र.५२/११ ओ, दि. २६ जून, २०२३ अन्वये व उपरोक्त संदर्भ क्र. ५ च्या बैठकीतील चर्चेनुसार व प्राप्त सर्वेक्षण अहवालानुसार खालील नमूद केलेल्या अधिसूचित पिक विमा क्षेत्रातील सोयाबीन या अधिसूचित पिकासाठी संभाव्य नुकसान भरपाई रक्कमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना देण्यासाठी एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि. यांना आदेशित करण्यात येत आहे.
उस्मानाबाद जिल्हयातील हंगामातील प्रतिकुल परिस्थितीमुळे ५० टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेली पिकनिहाय, महसूल मंडळनिहाय दिनांक ३१/०८/२०२३ अखेर अपेक्षित उत्पादनाची माहीती.
वरील पात्र मंडळांना पीक विमा कंपनी कडून 1 महिन्याच्या आत 25% अग्रिम पीक विमा ( soyabin vima Osmanabad भरपाई द्यावी अशे निर्देश जिल्हाधिकारी यांनी या अधिसूचनेत दिले आहेत.
याच प्रमाणे सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाने झालेल्या नुकसानी मुळे इतर मंडळात नुकसान झाले आहे त्याचे ही पूनरसर्वेक्षण करावे अशे निर्देश दिले आहेत. soyabin vima Osmanabad