५ लाख ३२ हजार शेतकऱ्यांना २६० कोटींचा पिकविमा Dharashiv pikvima 2024

Dharashiv Pikvima crop insurance claim settelment
खरीप हंगाम 2024 मध्ये राज्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी मुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
अशेच नुकसान धाराशिव देखील दिसून आले होते. धाराशिव जिल्ह्यातील बहुतांश भागाला 2024 खरिप हंगामातील पावसाने झोडपून काढले होते. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक असलेल्या सोयाबीनच्या क्षेत्राला मोठा फटका बसला होता. यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट दिसून आलेली आहे.
या एकूण पात्र ठरलेल्या ५ लाख ३२ हजार ८२६ क्लेम पैकी तब्बल ४ लाख ७० हजार ७२ क्लेम हे फक्त सोयाबीन पिकाच्या नुकसानी साठीचे आहेत. या सर्व पात्र पूर्वसूचनांचा आढावा जिल्हास्तरीय समितीमध्ये घेण्यात आलेला असून, विमाकंपनीने मान्य केलेल्या या सर्व पात्र पूर्वसूचनांचा हेक्टरी रक्कम ६ हजार २०० ते ६ हजार ५०० रुपयांचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे.
साधारण महिन्याभरात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाऊ शकते. मात्र रक्कम तोकडी असल्याने यावर आक्षेप देखील घेतला जाऊ शकतो.