लातूर जिल्ह्यातील नुकसानी संदर्भात पीक विमा कंपनीकडून Soyabin vima latur नुकसान भरपाईसाठी जिल्हाधिकारी यांची अधिसूचना.
लातूर जिल्ह्यामध्ये खरीप हंगामामध्ये पेरलेल्या पिकावर पावसाच्या प्रादुर्भाव होऊन पिकांचे नुकसान झालेले आहे. या नुकसानी संदर्भात प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या तरतुदीनुसार हंगामामध्ये प्रतिकूल परिस्थिती (Mid Season Adversity) याबाबी अंतर्गत संयुक्त सर्वेक्षण करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीच्या 25 टक्के रक्कम देण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी आदेश जारी केलेला आहे.
Soyabin vima latur GR 2023
ज्याच्यामध्ये तीव्र दुष्काळ स्थिती असेल दुष्काळ संहिता 2016 नुसार किंवा पावसातील तीन ते चार आठवडे पेक्षा जास्त पडलेला खंड असेल, तापमानातील असाधरण घट वाढ असेल किंवा प्रजन्यमानातील असा दरान कमी जास्तपणा घट वाढ असेल मोठ्या प्रमाणात पिकांवरती कीड रोग यांचा प्रादुर्भाव असेल किंवा इतर नैसर्गिक आपत्ती पूर परिस्थिती अतिवृष्टी एकूण पेरणी क्षेत्राच्या 25% पेक्षा जास्त क्षेत्र जर यामुळे बाधित झाले असेल तर अशा प्रसंगी असे आधी सूचना काढले जाते.
लातूर जिल्ह्यातील सोयाबीन पीक विमाधारक शेतकऱ्यांना 25 टक्के आगाऊ नुकसान भरपाई देण्याची अधिसूचना निर्गमित Soyabin vima latur
खरीप हंगाम 2023 अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या सोयाबीन पीक विमाधारक शेतकऱ्यांना 25 टक्के आगाऊ (अग्रिम) रक्कम देण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी निर्गमित केली आहे. हंगाम मध्य (मिड सिझन) परिस्थितीच्या जोखमी अंतर्गत अधिसूचित विमा घटकातील पिकांसाठी ही अधिसूचना निर्गमित करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी एस. व्ही. लाडके यांनी दिली आहे.
दुष्काळ संहिता 2016 नुसार तीव्र दुष्काळ स्थिती, पावसातील तीन ते चार आठवड्यापेक्षा जास्त खंड आल्याने एकूण पावसाचे कमी झालेले प्रमाण, तापमानातील असाधारण घट अथवा वाढ (दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत 20 टक्केपेक्षा जास्त तफावत), पर्जन्यमानातील असाधारण कमी अथवा जास्त प्रमाण (दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत 20 टक्केपेक्षा जास्त तफावत), मोठ्या प्रमाणात कीड, रोग यांचा पिकांवरील प्रादुर्भाव (पीक पेरणी क्षेत्राच्या 25 टक्केपेक्षा जास्त क्षेत्रावर तीव्र प्रादुर्भाव), इतर नैसर्गिक आपत्ती, पूर परिस्थिती ज्यामुळे एकूण पीक पेरणी क्षेत्राच्या 25 टक्केपेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाल्यास अशा प्रातिनिधिक सूचकांनुसार अधिसूचना निर्गमित करण्याची तरतूद आहे.
या बाबींसाठी उपग्रह छायाचित्र, इस्त्रो (ISRO) तथा सॅक (SAC), एमएनसीएफसी (MNCFC) किंवा इतर शासकीय यंत्रणांचा अहवाल, पीक परिस्थितीबाबत शास्त्रज्ञांचे नियमित अहवाल, वर्तमानपत्रात प्रसिध्द बातम्या इत्यादींच्या आधारे जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांनी जिल्ह्यातील 60 महसूल मंडळांमध्ये अधिसूचना निर्गमित करुन विमा कंपनीला आदेशित केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण 60 महसूल मंडळांमध्ये सर्व सोयाबीन पीक विमा धारक शेतकऱ्यांना 25 टक्के आगाऊ नुकसान भरपाई रक्कम लवकरात लवकर देण्याचे आदेश विमा कंपनीला देण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. लाडके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
या बाबींकरता उपग्रह छायाचित्र इसरो इतर शासकीय यंत्रणाचा अहवाल पीक परिस्थितीबाबत शासनाचे नियम अहवाल वृत्तपत्र व वर्तमानप त्रात प्रसिद्ध बातम्या इत्यादीच्या आधारे अभ्यास केला जातो.
जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या आदेशानुसार भारतीय विमा कंपनी यांनी ही अधिसूचना जाहीर झाल्यापासून एक महिन्याच्या आत तरतुदीनुसार पात्र ठरलेल्या सोयाबीन या अधिसूचित पिकाच्या पिकाकरता उपरोक्त महसूल मंडळामधील सर्व पिक विमाधारक शेतकऱ्यांना संभाव्य नुकसान भरपाई रकमेच्या 25% आगाव रक्कम Soyabin vima latur त्यांच्या खात्यात जमा करावी अशा प्रकारचे आर एस निर्देश सुद्धा या अधिसूचनेच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत.
याचबरोबर सदर जोखीम अंतर्गत बाधित अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित सोयाबीन पीक Soyabin vima latur विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा केल्यानंतर उपरोक्त अधिसूचित विमा क्षेत्रातील सोयाबीन हे पीक विमाधारक शेतकरी हे पीक विमा हंगामाच्या शेवटी उत्पादनाच्या आधारे निश्चित होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी पात्र राहतील व नुकसान भरपाईची आगाव रक्कम ही अंतिम येणाऱ्या नुकसान भरपाई येथून समायोजित केले जाईल अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण माहिती सुद्धा या अधिसूचनेच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे