Shri anna abhiyan Maharashtra- राज्यात महाराष्ट्र श्री अन्न अभियान शेतकऱ्यांना मिळणार पिक प्रात्याक्षिके, सुधारित व संकरीत प्रमाणीत बियाण्याचे वितरण, कीड व रोग व्यवस्थापनासाठी औषधांचे वितरण, जैविक खते व सूक्ष्म मुलद्रव्यांचा पुरवठा, विविध यंत्रे व कृषि औजारांचे वाटप.
संयुक्त राष्ट्र संघाने सन २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष, २०२३ म्हणून घोषित केले आहे.
त्यानुसार राज्यामध्ये “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष, २०२३” साजरे करण्याच्या अनुषंगाने सर्व संबंधित प्रशासकीय विभागांमार्फत / सहकार्याने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी/संनियंत्रण करण्यासाठी राज्यस्तरीय सुकाणू समिती व कृती दलाची स्थापना दि.१७ नोव्हेंबर, २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये करण्यात आली आहे.
या अंतर्गत “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ ची अंमलबजावणी राज्यात यशस्वीरित्या करण्यात येत आहे.
याच प्रमाणे दि.०९ मार्च, २०२३ रोजी मा. उप मुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांनी अर्थसंकल्पामध्ये संयुक्त राष्ट्र संघाने २०२३ हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले असून, “महाराष्ट्र श्री अन्न (Milientist) अभियान” सुरु केले आहे. त्यासाठी २०० कोटी रुपये तरतूद प्रस्तावित आहे.
श्री अन्नाच्या उत्पादन वाढीसाठी तंत्रज्ञानाचा प्रसार, पिक प्रात्यक्षिके, यांत्रिकीकरण प्रक्रिया, मुल्यसाखळी विकास आणि प्रचार प्रसिद्धी यांचा अंतर्भाव आहे. सोलापूर येथे “श्री अन्न उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा केलेली आहे.
या घोषणेच्या अनुषंगाने राज्यामध्ये महाराष्ट्र श्री अन्न अभियान (Millets year Maharashtra) राबविण्यासाठी खालील प्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
Shri anna abhiyan Maharashtra GR शासन परिपत्रक
PDF LINK राज्यात महाराष्ट्र श्री अन्न (Millets) अभियान सुरू
अंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचप्रमाणे राज्यामध्ये साजरे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ च्या निमित्ताने राज्यामध्ये महाराष्ट्र श्री अन्न ( Shri anna abhiyan Maharashtra ) अभियान सुरु करण्यात आले आहे.
राज्यात दिनांक १ एप्रिल २०२३ ते दिनांक ३१ मार्च, २०२४ या कालावधीत Shri anna abhiyan Maharashtra या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पुढीलप्रमाणे उपक्रम राबविले जाणार आहेत.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान NFSA
पौष्टीक तृणधान्यांचे राज्यातील लागवडीखालील क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढावी यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत काही उपक्रम हाती घेतले जाणार आहेत.
यात प्रचार प्रसिध्दी पिक प्रात्याक्षिके, सुधारित व संकरीत प्रमाणीत बियाण्याचे वितरण, कीड व रोग व्यवस्थापनासाठी औषधांचे वितरण, जैविक खते व सूक्ष्म मुलद्रव्यांचा पुरवठा, विविध यंत्रे व कृषि औजारांचे वाटप, शेतीशाळा व शेतकरी प्रशिक्षणांचे आयोजन, जिल्हास्तरीय कार्यशाळांद्वारे पौष्टिक तृणधान्य पिकांच्या उत्पादन वाढ व आहारातील वापर वाढ यासाठी प्रचार व प्रसिध्दी इत्यादी उपक्रम राबविण्याकरीता रुपये ११० कोटी इतका निधी मंजूर तरतुदीतून खर्च करण्यात येणार आहे.
Pocra yojana
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत समाविष्ट असलेल्या जिल्ह्यांपकी ज्या जिल्ह्यांमध्ये ज्वारी आणि बाजरी ही पौष्टीक तृणधान्य घेतली जातात अशा जिल्ह्यांमध्ये या पिकांचे क्षेत्र व उत्पादकता वाढवणे व उत्पादन खर्च कमी करणे, मुल्यसाखळी बळकट करण्यास सहाय्य करणे यासाठी पुढील उपक्रम राबविले जातील.
हवामानातील बदल आणि पावसाचा लहरीपणा या गोष्टींचा शेतीवर होत असलेला प्रतिकूल परिणाम लक्षात घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन, तांत्रिक सहाय्य, ग्राम कृषी संजीवनी सदस्यांसाठी विशेष कार्यशाळा, हवामान अनुकूल तंत्रज्ञान प्रसारासाठी शेतीशाळा, पौष्टीक तृणधान्य उत्पादकांसाठी लागवड तंत्रज्ञान, काढणी पश्चात व्यवस्थापन, विक्री व्यवस्थापन इत्यादी विषयावर प्रशिक्षण / कार्यशाळा / अभ्यासदौरे, तालुका निहाय कृषी हवामान सल्ला सेवा, हवामान अनुकूल वाणांच्या बियाण्याचे उत्पादन, उत्पादीत मालाच्या मुल्यवृध्दी साठी शेतकरी उत्पादक / महिला गटांना अर्थसहाय्य, उत्पादीत मालाची साठवणूक शास्त्रीय पद्धतीने करण्यासाठी गोदाम उभारणीसाठी अर्थसहाय्य केले जाणार आहे.
या साठी रुपये ५ कोटी निधी मंजूर तरतुदीतून खर्च करण्यात येणार आहे.
PMFME प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना व मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत (PMFME) व मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना तसेच एक जिल्हा एक उत्पादन या आधारावर सोलापूर, ठाणे व नंदूरबार या जिल्ह्याकरीता पौष्टीक तृणधान्य आधारित सूक्ष्म अन्न प्रक्रिया प्रकल्पाचा समावेश, लाभार्थ्यांना प्रशिक्षण सुविधा इत्यादीसाठी रुपये ५० कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.
मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत (SMART) शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या पौष्टीक तृणधान्य प्रकल्पांना प्राधान्य देण्यात येईल.
तृणधान्यांच्या मुल्यसाखळी विकासासाठी विशेष विस्तार कार्यक्रमाचे आयोजन, पायाभूत सुविधांची उभारणी, प्राथमिक च दुय्यम प्रक्रिया उद्योग उभारणी. ब्रेडींग, मार्केटींगच्या सूविधा उपलब्ध करून देणे, त्याचप्रमाणे राष्ट्रीय तृणधान्य संशोधन संस्था (IMF) हैद्राबाद या संस्थेसोबत सामंज्यस करार करून सोलापूर येथे तृणधान्य मूल्यसाखळी विकास प्रकल्पात काम करणाऱ्या शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रशिक्षण देण्यासाठी त्याचप्रमाणे त्यांची क्षमता बांधणी करण्यासाठी “श्री अन्न (Millets) उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
यासाठी रुपये ३० कोटी निधी मंजूर तरतुदीतून खर्च करण्यात यावा.
त्याचप्रमाणे राज्यातील कृषी विद्यापिठांमार्फत शेतकरी शाखा मंचातील सदस्यांना पौष्टिक तृणधान्य विषयी मार्गदर्शन, ज्वारी, बाजरी व नाचणी लागवड तंत्रज्ञान प्रात्यक्षिकाचे आयोजन.
याच प्रमाणे तृणधान्य उत्पादकांची पिक स्पर्धा आयोजन, तृणधान्य पीक लागवड आकाशवाणी व वृत्तपत्र व्दारे प्रचार प्रसिध्दी करणे, आकाशवाणी मार्फत सघन लागवड माहिती, बाजरी संशोधन योजना पीक प्रात्यिक्षक, नियोजन व निविष्ठा वाटप, शेती माती मासिकातून तृणधान्य विषयक लेख व यशोगाथा प्रसिद्धी प्रसिद्धी माध्यमांमार्फत व्याख्यान.
मुलखतीद्वारे प्रसिद्धी, महिलांसाठी पौष्टीक तृणधान्याचे आहारातील महत्व (प्रशिक्षण व आरोग्य तपसाणी कार्यक्रमांचे आयोजन, ग्रामीण व शहरी स्तरावर शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी व महिलांसाठी आहारतज्ञ व योगतज्ञ यांचे तृणधान्याच्या महत्वाबाबत मार्गदर्शन व प्रभात फे-यांचे आयोजन असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.