शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी ( CM kisan 2023 ) अंतर्गत सहा हजार रुपये वार्षिक देण्याचा निर्णय, शेतकऱ्यांना आता वर्षाला 12 हजार रुपये मानधन.

नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा जाहीर केली आहे.
नमो शेतकरी सन्मान निधी लाभार्थी CM Kisan Beneficiary
सामान्यत: या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत असेल, अशा सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ दिला जाईल, अशी माहिती देण्यात आलेली आहे.
नव्या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात जवळपास 1.15 कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारने ज्यांच्याकडे शेती आहे व ज्यांचे उदरनिर्वाहाचे साधन शेती आहे. अशा सर्व शेतकऱ्यांना यामध्ये समाविष्ट केले आहे. राज्य शासनाला या योजनेच्या अंमलबजावणीसाठी 6 हजार 900 कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे.
नमो शेतकरी सन्मान निधी योजना
शासनाच्या या नवीन नमो शेतकरी सन्मान निधी योजनेमुळे शेतकऱ्यांना दुप्पट फायदा होणार आहे. कारण यापूर्वी शेतकऱ्यांना फक्त पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून सहा हजार रुपये वार्षिक दिले जायचे; परंतु आता या नवीन योजना मुळे बारा हजार रुपये वार्षिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
https://www.prabhudevalg.com/2022/03/budget-maharashtra-2022.html
https://youtube.com/live/i5O8fqOGJv4?feature=share