भूविकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना 964 कोटींची कर्जमाफी( shetkari karjmafi 2022 ); कर्मचाऱ्यांना देखील मोठा दिलासा.
shetkari karjmafi 2022 Bhuvikas bank
भूविकास बँकेचे कर्ज घेतलेल्या 34,788 कर्जदार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी 964 कोटी 15 लाख रुपयांची कर्जमाफी देण्याचा तसेच ही रक्कम भूविकास बँकेकडून शासनास येणे असलेल्या रकमेमध्ये समायोजित करण्यासआज दिनांक ९ नोव्हेंबर २०२२ रोजी एक शासन निर्णय घेऊन मंजुरी देण्यात आली आहे.
भूविकास बँक Shetkari karjmafi 2022 शासन निर्णय खालील लिंक वर पहा 👇👇
या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 69 हजार हेक्टर शेतजमिनीवरील भूविकास बँकांच्या कर्जाचा बोजा ( shetkari karjmafi 2022 ) कमी होणार आहे. तसेच राज्यातील सर्व भूविकास बँकांचे सेवानिवृत्त तसेच कार्यरत व कंत्राटी कर्मचाऱ्यांची एकूण देणी अदा करण्यात येणार असल्याने या सर्व कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
याव्यतिरिक्त भूविकास बँकांच्या 24 जिल्ह्यातील 40 मालमत्ता सहकार विभागाच्या ताब्यात आल्याने विभागाची या जिल्ह्यांमध्ये भाड्याच्या जागेत असलेल्या क्षेत्रीय कार्यालयांसाठी स्वत:ची जागा मिळणार असून या कार्यालयांच्या भाड्यापोटी होणाऱ्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.
याशिवाय भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांची 275.40 कोटी रुपयांची देणी देण्यासाठी ही रक्कम सहकार आयुक्त व निबंधक यांना शासनामार्फत उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली.
अशा रकमेपोटी भूविकास बँकेच्या रु. 515.09 कोटी मुल्यांकनाच्या एकूण 55 मालमत्तांपैकी सुमारे 40 मालमत्ता सहकार विभागाच्या क्षेत्रीय स्तरावरील कार्यालयांसाठी सहकार विभागाकडे हस्तांतरीत करण्यात येतील. 7 मालमत्ता संबंधीत जिल्हाधिकारी यांचेकडे हस्तांतरीत करण्यात येतील. 4 मालमत्तांबाबत न्यायालयात याचिका दाखल असल्याने त्यांच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात मान्यता देण्यात आली. तसेच सांगली भूविकास बँकेच्या अवसायन आदेशास उच्च न्यायालयाची स्थगिती असल्याने या बँकेच्या 4 मालमत्ता संबंधित बँकेकडे ठेवण्यास मान्यता देण्यात आली.
शिखर भूविकास बँकेची शासकीय कर्जरोखे आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमधील मुदतठेवींची संपूर्ण रक्कम (व्याजासह) शासनाकडे हस्तांतरीत करुन घेण्यात येईल.
shetkari karjmafi 2022
सद्यस्थितीत राज्यातील २९ जिल्हा भूविकास बँकांकडील ३४७८८ कर्जदारांची थकीत कर्जाची रक्कम (व्याजासह ) सुमारे रु. ९६४.१५ कोटी इतकी आहे. सदर संपूर्ण कर्जाची रक्कम ( व्याजासह) माफ करण्यात येत आहे.
त्यानुसार सर्व जिल्हा भूविकास बँकांनी त्यांच्याकडील कर्जाच्या रकमा या बँकांकडून शासनास येणे असलेल्या रक्कमेत समायोजीत कराव्यात.
सदर कर्जाचे बोजे ज्या थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमीनींवर आहेत त्या जमिनींवरील सदर बोजे कमी shetkari karjmafi 2022 करण्याबाबत महसूल विभागाशी समन्वय साधून पुढील कार्यवाही संबंधीत जिल्हा भूविकास बँकांच्या अवसायकांनी तातडीने करावी.
ब) कर्मचाऱ्यांची थकीत देणी :
सदर शा. नि. अन्वये भुविकास बँकांच्या सेवानिवृत्त / कार्यरत / कंत्राटी कर्मचाऱ्यांची एकूण थकीत देणी (उपदान व इतर वैधानिक देणी) अंदाजे रु. २७५.४० कोटी इतकी रक्कम सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांना उपलब्ध करुन देण्यात येत आहेत… त्यानुषंगाने सहकार आयुक्त यांनी भुविकास बँकेच्या संबंधीत कर्मचाऱ्यांना त्यांची थकीत देणी अदा करणेबाबत पुढील आवश्यक ती कार्यवाही करावी.
क) भूविकास बँकांच्या मालमत्ता :
1) शिखर भुविकास बँक व जिल्हा भूविकास बँकांच्या एकूण ५५ मालमत्तांपैकी सोबतच्या परिशिष्ट – अ० मध्ये नमूद केलेल्या ४० मालमत्ता संबंधीत अवसायकांनी सहकार आयुक्तांकडे हस्तांतरीत कराव्यात.
II) भुविकास बँकांच्या परिशिष्ट – ब मध्ये नमूद ४ मालमत्तांची विक्री प्रक्रीया न्यायप्रविष्ट आहे त्याप्रकरणी न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही संबंधीत अवसायकांनी करावी. III) परिशिष्ट – क० मध्ये नमूद उर्वरीत ७ मालमत्ता संबंधीत अवसायकांनी संबंधीत जिल्हाधिकारी यांचेकडे हस्तांतरीत कराव्यात. त्यानुसार सहकार आयुक्त तसेच संबंधीत अवसायक यांनी आवश्यक ती कार्यवाही करावी.
IV) सांगली भूविकास बँकेच्या अवसायनाच्या आदेशास मा. उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. यास्तव सांगली भुविकास बँकेच्या ४ मालमत्तांबाबत मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अवसायकांनी पुढील आवश्यक ती कार्यवाही करावी.
ड) शिखर भुविकास बँकेची गुंतवणूक:
शिखर भूविकास बँकेने शासकीय कर्जरोखे व महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक केलेली आहे. सदर शासकीय कर्जरोखे व महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमधील मुदतठेवींची संपूर्ण रक्कम (व्याजासह) सहकार आयुक्तांकडे हस्तांतरीत करावी. त्यानुषंगाने अवसायक शिखर भुविकास बँक यांनी पुढील आवश्यक ती कार्यवाही करावी.
तसेच इतर जिल्हा भूविकास बँकांकडील शिल्लक निधी देखील संबंधीत बँकांच्या अवसायकांनी सहकार आयुक्तांकडे हस्तांतरीत करावा.
भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांची संपुर्ण देणी अदा केल्यानंतर सहकार आयुक्तांनी त्यांच्याकडे शिल्लक असणारी रक्कम शासनास जमा करावी.
shetkari karjmafi 2022