वैयक्तीक शौचालय अनुदान शासनाचा मोठा निर्णय | shauchalay yojana 2025

केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी समजल्या जाणाऱ्या स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 अंतर्गत वैयक्तीक शौचालय अनुदान online अर्ज सुरू. shauchalay yojana 2025 कसा करायचा अर्ज, कागदपत्र, अनुदान सविस्तर माहिती. Sauchalay Online Registration

Watch How can I apply for toilet subsidy in Maharashtra?

shauchalay yojana

केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी समजल्या जाणाऱ्या स्वच्छ भारत अभियानाचा ( Swachh Bharat mission – 2 ) देशात दुसरा टप्पा सुरु झाला आहे.

New GR 15.04.2025

स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा-2 या योजनेच्या अंमलबजावणीस दि.1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीपर्यंत मुदतवाढ GR PDF

स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) ही केंद्र पुरस्कृत महत्त्वाकांक्षी योजना, केंद्र शासन व राज्य शासनाच्या संयुक्त उपक्रमाद्वारे राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागामध्ये स्वच्छतेसंदर्भात जनजागृती निर्माण करणे, स्वच्छतेची व्याप्ती वाढविणे व उघड्यावर मलविसर्जन करण्यास प्रतिबंध करण्यासाठी लाभार्थी कुटुंबाने वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण केल्यानंतर अनुषंगिक प्रोत्साहन अनुदान देण्यात येते.

स्वच्छ भारत अभियान (ग्रा.) ( Swachh bharat mission 2 )अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात राज्यातील ग्रामीण भागातील वैयक्तिक शौचालय नसलेल्या पात्र कुटुंबांना वैयक्तीक शौचालय अनुदान करिता ऑनलाइन अर्ज सुरु झाले आहेत.

यासाठी SBM च्या ऑनलाईन  प्रणालीद्वारे अर्ज करण्याची सुविधा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने सुरू केली आहे.

या प्रणालीद्वारे ग्रामीण भागातील पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधण्याकरिता व त्यानंतर प्रोत्साहन अनुदान मान्यतेसाठी अर्ज करता येणार आहेत.

ऑनलाइन प्रणालीद्वारे वैयक्तिक शौचालयाकरिता अर्ज करण्याची सुविधा, खालील लिंक वर उपलब्ध आहे.

https://sbm.gov.in/sbm_dbt/secure/login.aspx

वैयक्तिक शौचालय अनुदान (shauchalay yojana 2025 ) साठी online अर्ज कसा करावा खालील लिंक वर पहा.

https://sbm.gov.in/sbmphase२/homenew.aspx या लिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे.या लिंकवर अर्जदाराला सर्वात प्रथम नोंदणी ( beneficiary registration for free toilet scheme ) करायचे आहे.

नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जदारास मिळालेल्या वापरकर्ता आयडी व पासवर्ड सह ऑनलाईन पद्धतीने वैयक्तिक शौचालय बांधण्याकरिता व त्यानंतर वितरणासाठी प्रोत्साहन अनुदानाकरिता मान्यतेसाठी अर्ज करता येणार आहे.

लाभार्थी निवड

या योजनेअंतर्गत, दारिद्र्य रेषेखालील सर्व कुटुंबे व दारिद्र्यरेषेवरील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, लहान व अल्पभूधारक शेतकरी, भूमिहीन शेतमजूर, शारीरिकदृष्ट्या अपंग आणि महिला कुटुंब प्रमुख हे सर्व घटक या योजनेच्या प्रोत्साहन अनुदानास पात्र करण्यात आले आहेत.

यापूर्वी पायाभूत सर्वेक्षणात आढळलेल्या व वैयक्तिक शौचालय नसलेल्या, पायाभूत सर्वेक्षणातून सुटलेल्या तसेच पायाभूत सर्वेक्षणाबाहेरील अशा ६६ लाख ४२ हजार ८९० कुटुंबांना वैयक्तिक शौचालय सुविधा, स्वच्छ भारत अभियान (ग्रा.)च्या पहिल्या टप्प्यात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *