shabari gharkul आता घरकुलाला 2.5 लाख अनुदान, शबरी घरकूल योजनेत मोठा बदल

शबरी आदिवासी घरकुल योजनेची शहरी भागात अमलबजावणी, मिळणार ₹2.5 लाखाचे अनुदान, पहा लाभार्थी पात्रता, अटी शर्ती, अर्ज कसा करावा सविस्तर.

shabari gharkul

Shabari gharkul yojana 2024

11 January 2024 GR PDF Link

शबरी आदिवासी घरकुल योजनेची अंमलबजावणी शहरी भागात करणेबाबत.

राज्यात आदिवासी उपयोजने अंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वत:ची घरे नाहीत अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक, कुडा मातीच्या घरात, झोपडयांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवारात राहतात अशा अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे.

Shabari gharkul योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने शासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. सदर शासन निर्णयानुसार शबरी आदिवासी घरकूल योजना ही ग्रामीण व शहरी या दोन्ही भागात राबविणे अपेक्षित होते.

ग्रामविकास विभागाच्या दि.१०/०२/२०१६ च्या शासन निर्णयान्वये राज्यातील ग्रामीण गृहनिर्माण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व सनियंत्रण करण्यासाठी राज्य व्यवस्थापन कक्ष- इंदिरा आवास योजना कक्षाचे रुपांतर “राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण गृहनिर्माण कक्षामध्ये” करण्यात आलेले आहे.

त्यानुषंगाने या राज्य व्यवस्थापन कक्षाव्दारे ग्रामविकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, आदिवासी विकास विभाग व राज्य शासनाच्या विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व ग्रामीण घरकूल कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

त्यामुळे ग्रामीण भागात शबरी आदिवासी घरकूल योजनेची अंमलबजावणी ही या कक्षाद्वारे करण्यात येत आहे. पंरतू शहरी भागात शबरी आदिवासी घरकूल योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी अंमलबजावणी यंत्रणा नसल्याने शहरी भागात शबरी आदिवासी घरकूल योजनेची अंमलबजवणी ही संबधित महानगरपालिका/नगरपालिका/नगरपंचायत यांचेमार्फत करण्यासाठी नगरविकास विभागास आदिवासी विकास विभागाद्वारा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

आदिवासी विकास विभागाच्या या प्रस्तावास नगरविकास विभागाने सहमती दर्शविली असून त्यानुषंगाने मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.

राज्यातील शहरी भागातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वत:ची घरे नाहीत अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक, कुडा मातीच्या घरात, झोपडयांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवारात राहतात अशा अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांना शबरी आदिवासी घरकूल योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

Shabari gharkul shahari beneficiary elegibility

१) अनुसूचित जमातीचा असावा.

2) स्वत:च्या नावाने पक्के घर नसावे.

३) महाराष्ट्र राज्यातील १५ वर्षापासून रहिवासी असावा.

४) घराचे बांधकाम करण्यासाठी स्वत:ची किंवा शासनाने दिलेली जमीन असावी.

५) यापूर्वी कोणत्याही शासकीय घरकूल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

६) वय वर्षे १८ पूर्ण असावे.

७) स्वत:च्या नावाने बँक खाते असावे. aadhar link bank Account

घरकूल बांधकाम क्षेत्र हे आदिवासी विकास विभागाच्या दि.२८/०३/२०१३ रोजीच्या शासन निर्णयात नमूद केल्यानुसार घरकूलाचे बांधकामाचे चटई क्षेत्र हे २६९.०० चौरस फूट एवढे राहणार आहे.

उत्पन्न मर्यादा

या योजनेच्या लाभासाठी लाभार्थी वार्षिक उत्पन्न मर्यादा ही रु.३.०० लक्ष पर्यंत असावी.

अनुदान रक्कम Benefits

घरकूल बांधकामासाठी अनुदान रक्कम ही. २.५० लक्ष एवढी राहील. सदर अनुदान रक्कम ही खालीलप्रमाणे ४ टप्यात लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येईल.

आवश्यक कागदपत्रे- documents required for shabari awas 2024

१) अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्टसाईज फोटो 2 Passport Size Photo

२) रहिवासी प्रमाणपत्र

३) अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र Cast Certificate

४) घरकूल बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे किंवा नाही यासाठी पुरावा.

५) उत्पन्नाचा दाखला (तहसिलदार यांचा)

६) शिधापत्रिका Ration card

७) आधारकार्ड Aadhar card

८) एक रद्द केलेला धनादेश (Cancelled cheque) अथवा बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत (फोटो व खाते क्र. असलेले). Cancelled Cheque Or Bank Passbook

How to apply shabari awas Yojana अर्ज करावयाची पद्धत

या शासन निर्णयाच्या परिशिष्टामध्ये विहित केलेला अर्ज व कागदपत्रे ही प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडे व्यक्तीश:/टपालाने/ईमेलद्वारा सादर करावा.

लाभार्थी प्राधान्यक्रम

१) जातीय दगंलीमध्ये घराचे नुकसान झालेली व्यक्ती
२) अॅट्रोसिटी अॅक्टनुसार पिडित व्यक्ती
३) विधवा किंवा परित्यक्त्या महिला
४) आदिम जमातीची व्यक्ती

बांधकाम यंत्रणा-

१) लाभार्थ्यांनी स्वतःच बांधकाम केल्यास त्याला प्राधान्य देण्यात यावे.

२) नगरपंचायत/नगरपरिषद / महानगरपालिका क्षेत्रासाठी लाभार्थी स्वतः बांधकाम करु शकत नसेल तर, महानगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायत यांनी आपल्याकडील बांधकाम यंत्रणेमार्फत घरकुलांचे बाधकाम करावे.

३) महानगरपालिका उक्त योजना राबविण्यास सक्षम असून, त्यांनी आपल्या बांधकाम यंत्रणेमार्फत घरकुलांचे बाधकाम करावे.

४) महानगर क्षेत्रात (Metro cities) जमीनींच्या कमतरतेमुळे व अति किंमतीमुळे जागा घेऊन घर बांधणे शक्य होत नाही यासाठी शासकीय योजना/खाजगी विकसक यांचेकडून बांधण्यात येणा-या गृहप्रकल्पांमध्ये पात्र लाभार्थ्यांना सदर योजनेमधून अनुज्ञेय असणारे अनुदान देण्यात येईल.

लाभार्थी निवड समिती

Shabari Awas Arj namuna 2024

PDF

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *