३ लाख ९० हजार शेतकऱ्यांचे सततच्या पावसाचे अनुदान येणार खात्यावर | satatcha paus anudan

satatcha paus anudan सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान ३ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर होणार जमा

satatcha paus anudan

satatcha paus anudan 2023

परभणी जिल्ह्यात पावसाळी हंगामात अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. सन 2022 च्या पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून आता 3 लाख 90 हजार 758 शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर हेक्टरी 8 हजार 500 रुपये या दराने 154 कोटी 48 लक्ष 7 हजार 680 रुपये रविवारपर्यंत (दि.15) जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आहेत.

जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांनी विशेष लक्ष घालून आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व पात्र बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आदेश दिले असून, या निधीची मागणी अ, ब, क, आणि ड अशा चार अहवालानुसार शासनाच्या महसूल व वन विभागा (मदत व पुनर्वसन)कडे करण्यात आली होती.

सर्व तहसीलदारांनी शेतकरी आणि त्यांच्या नावापुढील satatcha paus anudan रक्कमेची यादी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करावी व तसा अहवाल रविवार, (दि.15)पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या कामामध्ये कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचेही त्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

satatcha paus anudan सततच्या पावसामुळे शेतपिकांच्या नुकसानीसाठी मदत निधीची यादी

1 परभणी तालुका एकूण बाधित शेतकरी 36,143 , एकूण बाधित क्षेत्र 28,834 , निधी 245089000

2 सेलू तालुका एकूण बाधित शेतकरी 45,620 एकूण बाधित क्षेत्र 19,420, निधी 165070000

3 जिंतूर तालुका एकूण बाधित शेतकरी 83,874 , एकूण बाधित क्षेत्र 39,116, निधी 332486680

4 पाथरी तालुका एकूण बाधित शेतकरी 28,151 , एकूण बाधित क्षेत्र 12,653, निधी 107550500

5 मानवत तालुका एकूण बाधित शेतकरी 38,323, एकूण बाधित क्षेत्र 16,924, निधी 143854000

6 सोनपेठ तालुका एकूण बाधित शेतकरी 31,230 , एकूण बाधित क्षेत्र 16,100, निधी 136850000
7 गंगाखेड तालुका एकूण बाधित शेतकरी 51,419, एकूण बाधित क्षेत्र 14,900, निधी 126650000
8 पालम तालुका एकूण बाधित शेतकरी 50,556, एकूण बाधित क्षेत्र 21,565, निधी 183302500
9 पुर्णा तालुका एकूण बाधित शेतकरी 25,442, एकूण बाधित क्षेत्र 12,230, निधी 103955000
एकूण बाधित शेतकरी 3,90,758, एकूण बाधित क्षेत्र 1,81,742, निधी 154,48,07,680

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: