१ जून पासून गरिबांचा विमा महागला PMJJBY and PMSBY scheme 2022

प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना (PMSBY) च्या प्रीमियम दरांमध्ये 1 जून 2022 पासून बदल.

PMJJBY
Hike in insurance policy premium

First ever Revision of premium rates of Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana (PMJJBY) and Pradhan Mantri Suraksha Bima Yojana (PMSBY) w.e.f. 1st June 2022

7 वर्षांपूर्वी 2015 मध्ये सुरू करण्यात आलेल्या या दोन्ही योजना सुरू झाल्यापासून आता या योजनांच्या प्रीमियम दरांमध्ये प्रथमच बदल करण्यात आला आहे.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) या योजनांचा दीर्घ काळापासूनचा प्रतिकूल दाव्यांचा अनुभव लक्षात घेऊन आणि या योजना आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य बनवण्यासाठी, या योजनांचे प्रीमियम दर निश्चित करण्यात आलेले आहेत.

दोन्ही योजनांसाठी 1.25 रुपये प्रतिदिन प्रीमियम दर निश्चित करून योजनांचे प्रीमियम दर बदलले आहेत. प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजनेची प्रीमियम रक्कम 330 रुपये प्रतिवर्ष वरून 436 रुपये प्रति वर्ष करण्यात आली आहे

तर प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेची विमा रक्कम ही 12 रुपयांवरून 20 रुपये इतकी करण्यात आली आहे.

In view of the long-standing adverse claims experience of the schemes, Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana and Pradhan Mantri Suraksha Bima Yojana and in order to make them economically viable, the premium rates of the schemes have been revised by making it Rs 1.25 per day premium for both schemes that includes revising Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima from Rs. 330 to Rs. 436 and PMSBY from Rs. 12 to Rs. 20.

31.3.2022 रोजी प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना अंतर्गत नोंदणी केलेल्या सक्रिय सदस्यांची संख्या 6.4 कोटी तर प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना च्या सदस्यांची संख्या 22 कोटी आहे.

प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना सुरु झाल्यापासून, 31.3.2022 पर्यंत अंमलबजावणी करणाऱ्या विमा कंपन्यांकडून प्रीमियम म्हणून 1,134 कोटी रुपये जमा करण्यात आले असून दाव्यांपोटी ही 1,134 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना अंतर्गत 31.3.2022 पर्यंत अंमलबजावणी करणार्‍या विमा कंपन्यांनी 9,737 कोटी रुपये प्रीमियम गोळा केला आहे तर दाव्यापोटी 14,144 कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत.

या दोन्ही योजनांअंतर्गत दावे थेट लाभ हस्तांतरण DBT मार्गाने लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतात.

गरिबांचा विमा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या योजना आता गरिबांच्या खिशाला कात्री लावणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: