घ्या नापीक जमिनीवर उजेडाच पीक प्रधान मंत्री कुसुम योजना  घटक अ  | PM kusum Component-A

Pradhan Mantri Kisan Urja Suraksha evam Utthaan Mahaabhiyaan – pm kusum Component-A शेतकऱ्यांना आधार सौर ऊर्जेचा, मार्ग समृद्ध अन उज्ज्वल भविष्याचा, जाणून घेऊया काय आहे योजना.

PM kusum Component-A

Pradhan Mantri Kisan Urja Suraksha evam Utthaan Mahaabhiyaan Component-A ( PM kusum Component-A )

देशात २०२२ पर्यंत १०० GW  सौर ऊर्जा निर्मिती चे महत्वाकांक्षी लक्ष्य साध्य करण्यासाठी ०.५   मे. वॅ. ते २ मे. वॅ. क्षमतेचे विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करण्याची योजना केंद्र शासनाने आखण्यात आली आहे. या योजनेच्या अंतर्गत निर्माण वीज वितरणच्या विद्यमान ३३/११ के. व्ही. उपकेंद्राशी थेट जोडली जाणार आहे.

या योजनेच्या माध्यमातून महावितरणची वीज वहन आणि वितरणहानी व्यतिरिक्त पारेषण यंत्रणेची आवश्यकता वाचणार आहे. या योनेअंतर्गत उपकेंद्राजवळील अशी सौर ऊर्जा निर्मिती संयत्रे शक्यतो शेतकऱ्यांमार्फत विकसित केली जाऊ शकतात, त्यांना त्यांच्या नापीक आणि अकृषिक जमिनीचा वापर करून उत्पन्न वाढवण्याची संधी मिळणार असुन ते त्यांच्या पडीक नापीक जागांवर सौर ऊर्जा प्रकल्प ०.५ मे. वॅ. ते २ मे. वॅ. (महावितरणच्या उपकेंद्राच्या ५ कि.मी.च्या परिघात) उभारु शकतात.

PM kusum Component-A योजनेची उद्दिष्ट

  1. Pradhan Mantri Kisan Urja Suraksha evam Utthaan Mahaabhiyaan Component-A जमिनीवरील विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प ( solar project ) बसवून शेतकऱ्यांना दिवसा ८ तासाकरीता वीज पुरवठा करणे. 
  2. शेतकऱ्यांच्या नापिक व बिगर शेतजमीनीचा वापर सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी करुन त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करणे.
  3. शासनावरील कृषी ग्राहक सबसिडीचा भार कमी करणे.
  4. महावितरणची पारेषण प्रणालीची बचत.
  5. विकेंद्रीत सौर प्रकल्पाद्वारे वहन् आणि वितरण हानीत होणारी बचत.

एम.एन.आर.ई.(MNRE) ने दिनांक २०.०९.२०१९ च्या आदेशानुसार प्रधानमंत्री कुसुम (PM KUSUM) घटक-अ योजनेअंतर्गत वर्ष २०२०-२१ मध्ये महावितरणला ५०० मे. वॅ. तर २०२१ २२ करिता ४४४ मे. वॅ. क्षमता मंजूर केली आहे.

PM kusum Component-A beneficiary eligibility अंतर्गत कोण प्रकल्प उभारू शकतात 

  • वैयक्तिक शेतकरी ( Individual farmer ), सहकारी, ग्रामपंचायत, शेतकरी उत्पादक संस्था (FPO), पाणी वापरकर्ते संघटना (WUA), सौर ऊर्जा उत्पादक (SPG).
  • शेतकरी, सहकारी, ग्रामपंचायत, शेतकरी उत्पादक संस्था (FPO), पाणी वापरकर्ते संघटना (WUA) जर सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यासाठी आवश्यक समभागाची व्यवस्था करण्यास सक्षम नसल्यास ते भाडेतत्वावर जमीन देऊन ( Mukhyamantri Saur Krishi vahini ) विकासकाद्वारे सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करण्याचा पर्याय निवडू शकतात.
  • मासिक भाडे देय सौर ऊर्जा उत्पादकाद्वारे (SPG ) उत्पन्न केलेल्या ऊर्जा बिलाच्या रकमेतून वजा केले जाईल आणि थेट महावितरणद्वारे शेतकऱ्यांना दिले जाईल.

शेतकरी/सहकारी संस्था/पंचायत/ फार्मरर्स प्रोडयूसर ऑर्गनायझेशन (FPO) /वॉटर युझर्स असोसिएशन (WUA), (सौर ऊर्जा विकासक (SPG) संबोधले जाईल) यांच्यासाठी कोणतेही अर्थिक निकष नाहीत. तथापि विकासकाला या योजनेअंतर्गत भाग घेण्याकरीता पुढील अटी बंधनकारक राहतील.

PM kusum Component-A अटी व पात्रता 

  • वार्षिक निव्वळ मूल्य – रु.१ कोटी प्रति मेगावॅट
  • वार्षिक उलाढाल – रु. २५ लाख प्रति मेगावॅट
  • वीज खरेदी करार कार्यकाळ: २५ वर्षे
  • कार्यान्वन: LOA जारी केल्याच्या तारखेपासून १२ महिने
  • वीज खरेदी कमाल मर्यादा दर: ३.१० रुपये/युनिट
  • किमान CUF: १५
  • बयाना रक्कम(EMD): रु. १ लाख/मेगावॅट
  • परफॉर्मन्स बँक गॅरंटी (PBG): ५ लाख/मेगावॅट
  • एखादया विकासकाला एका विशिष्ट उपकेंद्रासाठी एकापेक्षा जास्त अर्ज करण्याची परवानगी दिली जाणार नाही. सौर ऊर्जा विकासक त्याच उपकेंद्रासाठी दुसऱ्या निविदांमार्फत अभिव्यक्ति स्वारस्य सूचना (ईओआय) दाखल केलेले आढळल्यास त्याचे ईओआय देखील अपात्र ठरवले जाईल

शेतकरी/सहकारी संस्था/पंचायत/ फार्मर्स प्रोडयूसर ऑर्गनायझेशन (FPO) /वॉटर युझर्स असोसिएशन (WUA), हे कमीत कमी ०.५ मे.वॅ. ते २ मे.वॅ. क्षमतेच्या प्रकल्प/संयंत्राची ( solar project ) अभियांत्रिकी, उत्पादन, पुरवठा उभारणी, चाचणी आणि सौर प्रकल्प यांची रचना करेल जे ५०० मे.वॅ.च्या संचयी क्षमतेसह निरनिराळया ठिकाणी नापीक/ बिनशेती जमीन किंवा लागवडीयोग्य जमीन असल्यास, प्रकल्प् स्टिल्टसवर स्थापित केले जातील.

PM kusum Component-A प्रकल्पाचे संचालन आणि देखभाल २५ वर्षाच्या कालावधीसाठी राहील.

शेतकरी/सहकारी संस्था/पंचायत/ फार्मर्स प्रोडयूसर ऑर्गनाझेशन (FPO) /वॉटर युझर्स असोसिएशन (WUA)जर PM kusum Component-A सौर ऊर्जा प्रकल्प् विकसित करण्यासाठी आवश्यक समभागाची व्य्वस्था करण्यास सक्षम नसल्यास ते भाडे तत्वावर जमीन देऊन विकासकाद्वारे PM kusum Component-A प्रकल्प विकसित करण्याचा पर्याय निवडू शकतात. मासिक वीज भाडे देय सौर ऊर्जा विकासक (SPG) द्वारे उत्पन्न केलेल्या ऊर्जा बिलाच्या चलनातून वजा केले जाईल आणि महावितरणद्वारे शेतकऱ्यांना थेट बचत खात्यात दिले जाईल.

शेतकरी/सहकारी संस्था/पंचायत/ फार्मरर्स प्रोडयूसर ऑर्गनायझेशन (FPO) /वॉटर युझर्स असोसिएशन (WUA) उपलब्ध् जमिनीचा पूर्व व्यवहार्यता पार पाडतील आणि बॅकबेल डीपीआर, आर्थिक मॉडेल तयार करतील आणि PM kusum Component-A प्रकल्पासंबंधीत सर्व परवानग्या मिळवतील.

शेतकरी/सहकारी संस्था/पंचायत/ फार्मरर्स प्रोडयूसर ऑर्गनायझेशन (FPO) /वॉटर युझर्स असोसिएशन (WUA), सौर ऊर्जा विकासक (SPG) हे जमिनीचा विकास, सर्वेक्षण, भूगर्भीय माती चाचणी, साईटवर जाणारा रस्ता बांधणे, जमिनीवर कुंपण यासारखी सर्व पायाभूत कामे करतील. वीज निष्कासन, ग्रिड कनेक्टिव्हिटी आणि प्रकल्प पूर्ण करण्यासाठी इतर सर्व संबंधित कामे त्यांच्या स्वखर्चाने करतील.

PM kusum Component-A कमाल वीज दर रू ३.१० प्रती युनिट राहील. यशस्वी निविदाकार/ विकासक आणि महावितरण दरम्यान २५ वर्षासाठी वीज खरेदी करार केला जाईल.

  • आवश्यक क्षमता : ०.५ मे. वॅ. ते २ मे. वॅ.
  • आवश्यक जमीन: किमान ३ एकर ते कमाल १० एकर
  • महावितरण सबस्टेशन पासून आवश्यक अंतर: जास्तीत जास्त ५ किमी
  • कनेक्टिव्हिटी: महावितरण ३३/२२/११ केव्ही सबस्टेशनची ११ केव्ही/२२ केव्ही बस बार.

Pradhan Mantri Kisan Urja Suraksha evam Utthaan Mahaabhiyaan Component-A एलओए (LOA) जारी केल्याच्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत वीज खरेदी करार करण्यात येईल.

वीज खरेदी करारानुसार विकासकाकडून संपूर्ण वीज महावितरणास विकत घेणे बंधनकारक असेल.

किमान १५% CUF बंधनकारक.महावितरणतर्फे LC आणि Escrow ची व्यवस्था ठेवली जाईल.

बँक हमीच्या स्वरुपात ईएमडी रु.१ लाख/ मे.वॅ.

PBG परफॉर्मन्स बँक गँरंटीची वैधता : एलओए (LoA) जारी केल्याच्या तारखेपासून १२ महिने.अयशस्वी विकासकाला ईएमडी परत करणे : निवडलेल्या विकासकाला एलओए (LoA) जारी केल्यापासून १५ दिवसाच्या आत.सद्यस्थितीतील एमएनआरई/बीआयएसच्या मापदंडानुसार सौर उपकरणे, इनव्हर्टर, बीओएस आणि इतर उपकरणे यांना बंधनकारक असतील.

1 thought on “घ्या नापीक जमिनीवर उजेडाच पीक प्रधान मंत्री कुसुम योजना  घटक अ  | PM kusum Component-A”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *