शेतमाल हमीभाव खरेदी ऑनलाईन नोंदणी सुरू | hamibhav nondani 2024

Harbhara hamibhav nondani 2024 – किमान आधारभूत किंमत खरेदीअंतर्गत हंगाम हमीभावाने खरेदी करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरु.

hamibhav nondani 2024

महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ व नाफेड कार्यालयाच्या संयुक्त विद्यामाने दरवर्षीप्रमाणे 2024-25 हंगामातही राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेडमार्फत मका, तूर, चना, मूग, उडीद, व सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी ई-समृद्धी पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नाफेड कार्यालयाने केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी ई-समृद्धी  (eSamriddhi) पोर्टल सुरू केले आहे. ‘नाफेड’मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी या पोर्टलवर नोंदणी करावी.

राज्यातील शेतकऱ्यांनी https://esamridhi.in/#login या संकेतस्थळाला भेट देवून आपल्या शेतमालाची एमएसपी दराने विक्री करण्यासाठी ई-समृद्धी पोर्टलवर पूर्वनोंदणी करावी आणि केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघामार्फत करण्यात आले आहे.

ई-समृद्धी पोर्टलवरील नोंदणीच्या अडचणीबाबत व अधिक माहितीसाठी जिल्हा पणन अधिकारी विलास मारुतीराव सोमारे (भ्रमणध्वनी क्र. 8108182950), एमईएमएल कार्यालयाचे प्रतिनिधी श्रीधर कानडे (भ्रमणध्वनी क्र. 9561717175) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

OLD Post

शेतकऱ्यांचा हरभरा निघाला असून,‎ शेतकरी खासगी बाजारात विक्री करत‎ आहेत.

मात्र खासगी बाजारात भाव‎ कमी असल्यामुळे हरभरा हमी भावाच्या‎ तुलनेत शेतकऱ्यांचे प्रतिक्विंटल 1000 रुपयांचे नुकसान होत आहे.‎ मात्र, अजूनही शासनाकडून हमी‎ भावाने हरभरा खरेदी किंवा नोंदणी‎ सुरू झाली नसल्याने शेतकऱ्यांना ८०० ते १००० रुपयाने कमी भावात हरभऱ्याची विक्री करावी लागत आहे.

https://youtu.be/oX6FZfr_bhY

त्यामुळे हरभऱ्याची हमीभावाने खरेदी ( Harbhara hamibhav nondani 2023 ) केव्हा सुरू होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात होता.

मात्र आता हरभरा खरेदीला ( Harbhara hamibhav nondani 2023 ) मुहूर्त मिळाला असून, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत दि. २४ फेब्रुवारी रोजीच्या पत्राद्वारे हमीभावाने हरभरा खरेदी सुरू करण्यापूर्वी शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शासनाकडून पणन महासंघासह‎ आठ विविध एजन्सीद्वारे शासकीय‎ हरभरा खरेदी केली जाणार आहे.

शासनाने‎ या पत्राद्वारे सोमवारपासून (दि २७)‎ नोंदणी सुरू करण्याचे आदेश दिले.‎

दरम्यान, हे आदेश स्थानिक जिल्हा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मार्केटिंग कार्यालयात पोहोचले नव्हते,‎ (कदाचित शासकिय सुटी‎ असल्यामुळे आदेश पोहोचले‎ नसतील) मात्र तेथील अधिकाऱ्यांना‎ या आदेशाबाबत मौखिक माहिती‎ आहे. त्यामुळे सोमवारी त्यांच्या वरिष्ठ‎ कार्यालयाकडून आदेश प्राप्त होताच‎ ‘पणन’च्या सातही खरेदी‎ केंद्रांवर नोंदणीची प्रक्रिया सुरू होणार‎ आहे.

किमान आधारभूत किंमत खरेदीअंतर्गत हंगाम 2022-23 मध्ये हमीभावाने 5 हजार 330 रुपये प्रति क्विंटल चणा खरेदी करण्यासाठी मार्केटिंग फेडरेशनमार्फत चणा ऑनलाईन शेतकरी नोंदणी 27 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.

तरी शेतकरी बांधवानी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी चालू हंगामातील चणा या पिकांचा ऑनलाईन पिकपेरा नोंद असलेला सातबारा उतारा, आधारकार्ड व बँकपासबूक इत्यादी कागदपत्रे तालुक्यातील खरेदी केंद्रावर देवून नोंदणी करावी.

1 thought on “शेतमाल हमीभाव खरेदी ऑनलाईन नोंदणी सुरू | hamibhav nondani 2024”

  1. SWAPNIL Hajare

    Satbara vr chana chi nond nh yet ah ..peek pera bharun suddha…..any solution

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: