PM Kisan eKYC – OTP द्वारे kyc पुन्हा सुरू !

शेतकऱ्यांना मोठी खुशखबर ! PM Kisan eKYC via OTP available again

PM Kisan eKYC

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan ) पोर्टलवर eKYC प्रमाणीकरण आधार OTP द्वारे पुन्हा सुरू कधी होणार या अपडेटची वाट पाहणाऱ्या pm kisan च्या पात्र लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

PM kisan पोर्टलने OTP द्वारे आधार-आधारित eKYC वर पुन्हा प्रमाणीकरण सुरू केले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी PM-KISAN योजना लागवडीयोग्य जमीन असलेल्या देशभरातील सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना वार्षिक 6000 रुपये आर्थिक सहाय प्रदान करणारी योजना आहे. 

दोन हेक्टरपर्यंत लागवडीयोग्य जमीन असलेले छोटे आणि सीमांत शेतकरी या योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र आहेत.

PM Kisan eKYC

मात्र या पात्र शेतकऱ्यांना पुढील हप्ता मिळविण्यासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धती वापरून त्यांचे KYC पूर्ण करणे अनिवार्य केले आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना आधार OTP द्वारे केली जाणारी eKYC तात्पुरते निलंबित करण्यात आली होती. तर पात्र शेतकऱ्यांना ekyc करिता सामायिक सेवा केंद्रांना ( CSC Center) वर भेट देऊन eKYC  बायोमेट्रिक च्या माध्यमातून करण्यासाठी सुचवण्यात आले होते.

मात्र ही प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी कीचकड, वेळखाऊ आणि खार्चिक होती.

या सर्व परिस्थितीत PM kisan पोर्टलने OTP द्वारे आधार-आधारित eKYC वर पुन्हा प्रमाणीकरण सुरू केले आहे, यामुळे साहजिकच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

याचबरोबर केंद्र सरकारने शेतकऱ्यांना पीएम किसान अंतर्गत अनिवार्य eKYC पूर्ण करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2022 पासून 31 जुलै 2022 पर्यंत वाढवली आहे.

पहा अगदी दोन मिनिटात कशी करायची PM kisan ekyc

Online kyc

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *