अखेर शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ | niymit karjmafi 2022

नियमित पने कर्जाची परतफेड ( Niymit karjmafi 2022) करणाऱ्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचा मोठा दिलासा.

niymit karjmafi 2022

niymit karjmafi 2022 Update

नियमितपणे आपल्या कर्जाची परतफेड ( niymit karjmafi 2022 ) करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 हजार रुपयांचा प्रोत्साहन पर अनुदान 2020, 2021, 2022 तीन वर्षाच्या बजेटमध्ये करण्यात आलेली घोषणा. तर 2022 चे बजेटमध्ये या योजनेसाठी 10,000 हजार कोटी रुपयांची तरतूद हे सर्व झालेला असताना, मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली असताना फक्त एक शासन निर्णय न काढण्यामुळे शेतकऱ्याला पन्नास हजार रुपयांच्या अनुदानापासून वंचित वंचित राहिले होते.

गेल्या तीन वर्षापासून शेतकरी या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत असं असताना मात्र आता सरकार बदल झाला, महाविकास आघाडी शासनाने शासन निर्णय ( Govt GR ) न काढल्यामुळे हे 50,000 हजार रुपये अनुदान मिळेल की नाही मिळेल अशा प्रकारचे एक शक्यता सध्या निर्माण झाली होती शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात संभ्रमात केलेले होते.

नियमित पने आपले पिक कर्ज ( Crop Loan ) भरणारे शेतकरी आपल्यावरती कुठेतरी अन्याय होतोय अशी एक भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती.

याच्यासाठी शेतकऱ्यांमधून खूप मोठ्या प्रमाणात असंतोष देखील निर्माण झालेला होता याच्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी सुद्धा शेतकरी प्रयत्न करत होते आणि अखेर या विषयी आवाज उठवण्यात आलेला आहे.

सांगलीचे खासदार धैर्यशील माने याचबरोबर आमदार प्रकाश आंबिटकर यांच्या माध्यमातून आज मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या शेतकऱ्यावरती होणाऱ्या अन्यायाबाबत वाचा फोडण्यात आलेली आहे.

नियमित पीक कर्जाची ( Pik karj ) परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काही अटींमुळे 50 हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नाही.

महात्मा फुले कर्जमाफी योजनेत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यासाठी शासनाने लावलेले नियम जाचक आहेत. २०१८-१९ मध्ये अतिवृष्टीग्रस्त ज्या शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई दिली आहे त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.

याची दखल घेऊन लवकरच अशा पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाणार नाही, शेतकऱ्यांना हे अनुदान मिळावे अशे निवेदन त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले.

या निवेदना नंतर Niymit karjmafi 2022 याबाबतचा शासन निर्णय ( Government GR ) त्वरीत काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

आता या संधर्भातील GR आल्यानंतर लवकरच पुढील चित्र स्पष्ट होईल मात्र तूर्तास या घोषणेने शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणार हे स्पष्ट झाले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: