पावसाच्या खंडा मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा, परभणी जिल्हा ( Parbhani Pik vima ) अधिसूचना निर्गमित.
Parbhani pik vima update 2023
राज्याच्या विविध भागात अतिवृष्टी, तर काही भागात पावसाचा खंड पडला होता. यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
परभणी जिल्हयात ही अशीच काही परिस्थिती निर्माण झाली होती, जुलै च्या पावसानंतर ऑगस्ट महिन्यात २१ दिवस पावसाचा खंड पडला. त्यामुळे सोयाबीनच्या संभाव्य नुकसान भरपाई साठी प्रधानमंत्री पीक योजनेच्या निकषानुसार जिल्हाधिाऱ्यांमार्फत अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे.
या अधिसूचनेनुसार नुकसान ग्रस्त पात्र मंडळातील शेतकऱ्यांना मंजूर रकमेच्या २५% रक्कम पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत विमाधारक शेतकऱ्यांना देण्यासाठी इन्शुरन्स विमा कंपनीला आदेशित करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना दिली जाणारी २५% रक्कम अधिसूचना जाहीर झाल्यापासून एक महिन्याच्या आत ( prabhani pik vima )शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी विमा कंपनीला दिले आहेत.
या अधिसूचनेनुसार परभणी जिल्ह्यातील एकूण 52 महसूल मंडळ पैकी फक्त 41 मंडळातील शेतकऱ्यांना प्रधान पीक विमा योजना अंतर्गत parbhani pik vima 25% अग्रिम रक्कम मिळणार आहे.
सतत 21 दिवस पावसाचा खंड झाल्याने परभणी जिल्ह्यातील 41 मंडळात 52 ते 57 % पर्यंत सरासरी उत्पादनाच्या तुलनेत घट आली आहे.
यामध्ये परभणी, झरी, जांब, पेडगाव, टाकळी, पिंगळी, परभणी ग्रामीण
हादगाव बु., कासापुरी
सावंगी म्हाळसा, बाम्हणी, दुधगाव, वाघी
धानोरा, बोरी, आडगाव, चारठाणा
पूर्णा, कालेश्वर, चुडावा, कावलगाव
पालम, चाटोरी, बनवस
वालूर, कुपटा, देऊळगाव गात, चिखलठाणा बु., मोरेगाव मानवत, कोल्हा, रामपुरी बु., ताडबोरगाव
गंगाखेड, महातपुरी, माखणी, राणीसावरगाव, पिंपळदरी
सोनपेठ, आवलगाव, शेळगाव, वडगाव या महसूल मंडळाचा समावेश आहे. parbhani pik vima
पंतप्रधान पीक विमा योजनेतील मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी जिल्ह्यात सहा तालुक्यांतील 41 मंडळात अग्रीम विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे.
खरीप हंगाम 2023 ऑगस्ट महिन्यात परभणी जिल्ह्यातील आठ महसूल मंडळात 21 दिवस पावसाचा खंड पडला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी 20 ऑगस्ट रोजी शासकीय अधिकारी व विमा कंपनीचे प्रतिनिधींना सोयाबीनच्या नुकसानीसंदर्भात संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार या मंडळातील मागील 7 वर्षातील सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत यंदा सरासरी उत्पादनात 50 टक्क्यापेक्षा अधिक घट झाली असल्याचे आढळून आले. यामध्ये सर्वाधिक परभणी तालुक्यातील तीन मंडळांचा समावेश आहे.
पीक विमा योजनेतील प्रतिकूल परिस्थिती मुळे झालेले नुकसान या जोखीम बाबीअंतर्गंत या 41 मंडळातील शेतकऱ्यांना संभाव्य विमा भरपाईपैकी 25 टक्के अग्रीम रक्कम महिन्याभरात देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी विमा कंपनीला 25 ऑगस्ट रोजी दिले आहेत.