निराधार मानधन योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाची खुशखबर ! | Niradhar Yojana Maharashtra

Niradhar Yojana Maharashtra – निराधार मानधन योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाची खुशखबर, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजनेसाठी लाभार्थ्यांच्या खात्यात थेट डीबीटीमार्फत जमा होणार अनुदान

Niradhar Yojana Maharashtra dbt

शासनाच्या विशेष सहाय्य कार्यक्रमांअर्तंगत राबविण्यात येणा-या राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अंतर्गत लाभार्थ्यांना ठराविक मानधन दरमहा अदा केले जाते. हे मानधन लाभार्थ्यांना तहसिल स्तरावरुन बँकेत पाठवून संबंधिताच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया केली जाते. मात्र आता शासनामार्फत सदर अर्थसहाय्याचे वितरण हे डी.बी.टी पोर्टलच्या माध्यमातून निराधारांच्या थेट खात्यात वर्ग केले जाणार आहे.

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी यापूर्वी तहसिलच्या संजय गांधी योजना विभागामार्फत संबंधित बँकेत सर्व लाभार्थ्यांची यादी पाठवून त्यानूसार निधी दिला जात होता, त्यानंतर तो निधी बँकेकडून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केला जात होता. या प्रकियेस विलंब होत होता. त्यामुळे वयोवृध्द लाभार्थ्यांना अनुदानासाठी बँकांत खेटे घालावे लागत होते. मात्र आता डी.बी.टी पोर्टल निराधारांचे अनुदान थेट बँक खात्यात मिळणार असल्याने निराधारांची हेळसांड थांबुन बँक कर्मचा-यांची कसरत थांबणार आहे.

त्यासाठी या दोन्ही योजनांचा लाभ घेत असलेल्या पात्र निराधारांकडून आधारकार्ड आणि मोबाईल क्रमांक संकलित करण्याची प्रक्रिया जालना जिल्हयातील सर्व 8 तालुक्यांतील संजय गांधी योजना विभागाकडून सुरु करण्यात आलेली आहे. याबाबत गावस्तरावरुन तलाठ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन संबंधितांना कळविले जात आहे.

30 मे पर्यंत द्या कागदपत्रे, अन्यथा अनुदान अडकणार- संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना

संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी येत्या 30 मे पर्यंत अदयावत आधारकार्ड व मोबाईल क्रमांक (बँकेशी संलग्न असलेले) तलाठी यांच्याकडे देण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. या मुदतीत आधारकार्ड व मोबाईल क्रमांक न देण्याच्या लाभार्थ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागेल.

ही कागदपत्रे द्यावी लागणार

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेचे अनुदान आता डीबीटीमार्फत सरळ लाभार्थ्यांच्या खात्यात दिले जाणार आहे. यासाठी हयात असलेले प्रमाणपत्र, अपडेट आधार कार्ड, बँकेचे पासबुक, मोबाईल क्रमांक.

आधार ज्या बँकेला लिंक असेल त्याच बँकेत पैसे जाणार आहेत. संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योनजेच्या लाभार्थ्यांचे दरमहा मानधन आता डीबीटीच्या माध्यमातून थेट बँक खात्यात वर्ग केले जाणार आहे. संबधीत योजनेच्या लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड व मोबाईल क्रमांक गावातील तलाठ्याकडे किंवा प्रत्यक्ष तहसिल कार्यालयात उपलब्ध करुन द्यावे, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Niradhar Yojana Maharashtra GR PDF 👇👇

GR LINK

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या दोन्हीही योजनांमधून लाभार्थीना दरमहा वेळेवर अनुदान मिळावे यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत ५५६ कोटी रुपये तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतंर्गत ९४० कोटी रुपये असा एकूण १,४९६ कोटी रुपये इतका निधी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून वितरित करण्यात आला असून लाभार्थींना तो तत्काळ वाटप करावा अशा सूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी सर्व जिल्हाधिकान्यांना दिल्या आहेत.

संजय गांधी निराधार अनुदान योजना तंर्गत किमान १८ ते ६५ वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वत: चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी, ३५ वर्षावरील अविवाहित स्त्री. तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो.

संजय गांधी निराधार अनुदान योजना योजनेमध्ये दारिद्रयरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा २१ हजार रुपये पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. या योजनेखाली पात्र लाभार्थींना १५०० रुपये दरमहा अर्थसहाय्य दिले जाते. तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधून दारिद्रयरेषेखालील यादीच्या कुटुंबात नाव असलेल्या व २१ हजार रुपये पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या ६५ व ६५ वर्षावरील पात्र लाभार्थीस दरमहा १५०० रुपये अर्थसहाय्य देण्यात येते.

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या योजनांचे स्वरुप विचारात घेऊन या पुढील काळात योजनेतील लाभार्थीना तातडीने अर्थसहाय्य वितरीत होण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचनाही सचिव श्री. भांगे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत मा. लोकप्रतिनिधी, विविध दिव्यांग संघटना व स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी व पाठपुरावा करण्यात येत होता. तसेच सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर करताना संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात रु.१०००/- वरुन रु.१५००/- इतकी वाढ करण्यात येत आहे, अशी घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली होती. त्यानुषंगाने सदरहू योजनेतंर्गत पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने दिनांक २८ जून २०२३ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाल्यानुसार खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील सर्व लाभार्थ्यांना देण्यात येत असलेल्या रुपये १०००/- इतक्या मासिक अर्थसहाय्यात रुपये ५००/- इतकी वाढ करुन अर्थसहाय्याची रक्कम दरमहा रुपये १५००/- करण्यास याद्वारे शासन मान्यता देत आहे. त्यानुसार १ अपत्य किंवा २ अपत्य असलेल्या विधवा लाभार्थ्यांना देखील अर्थसहाय्याची रक्कम दरमहा रु. १५००/- इतकी राहील.

विशेष सहाय्य योजनेतील Niradhar Yojana Maharashtra लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण सर्वसाधारण / अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेल्या मंजूर तरतूदीमधून करण्यात यावा. सदर अर्थसहाय्यात वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेतील सर्व लाभार्थ्यांना लागू होईल.

संदर्भाधीन शासन निर्णयात हयात प्रमाणपत्राच्या तरतूदीमध्ये बदल करण्यात येत असून लाभार्थ्यांनी त्याच आर्थिक वर्षात हयात प्रमाणपत्र सादर केल्यास लाभार्थ्याचे बंद केलेले अर्थसहाय्याचे वाटप पूर्ववत करण्यात यावे. तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्याच्या मुलाला नोकरी मिळाल्यानंतर (शासकीय / निमशासकीय / खाजगी) मुलाचे व कुटूंबाचे उत्पन्न विचारात घेऊन लाभार्थ्याची पात्रता ठरविण्यात यावी. याबाबत
२० ऑगस्ट, २०१९ च्या शासन निर्णयातील लाभार्थ्याच्या मुलाची २५ वर्ष वयाबाबतची अट रद्द करण्यात येत आहे.

आज राज्य शासनाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत ६२५ कोटी रुपये तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेंतर्गत १ हजार १९४ कोटी रुपये निधी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना माहे ऑक्टोबर २०२२ मध्ये वितरीत करण्यात आला आहे.

Niradhar Yojana Maharashtra GR link 👉👇

संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी सन 2022-23 या आर्थिक वर्षातील माहे एप्रिल, 2022 ते मार्च, 2023 करीता अनुदानाचे वितरण.

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी सन 2022-23 या आर्थिक वर्षातील माहे एप्रिल, 2022 ते मार्च, 2023 करीता अनुदानाचे वितरण.

Sanjay Gandhi Niradhar Yojana 2022 Maharashtra

संजय गांधी निराधार अनुदान ( Niradhar Yojana Maharashtra ) योजनेतर्गत किमान १८ ते ६५ वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतू, पोटगी न मिळालेल्या अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी, ३५ वर्षावरील अविवाहित स्त्री, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो.

या योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये २१ हजार पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. या योजनेखाली पात्र लाभार्थींना रुपये १ हजार दरमहा इतके अर्थसहाय्य दिले जाते. तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधून दारिद्रय रेषेखालील यादीच्या कुटूंबात नांव असलेल्या व रु.२१,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या ६५ व ६५ वर्षावरील पात्र लाभार्थीस दरमहा रु. १,०००/- अर्थसहाय्य देण्यात येते.

माहे सप्टेंबर २०२२ अखेरपर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत रु.५९५ कोटी तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतंर्गत रु. १०५३ कोटी निधी खर्च झालेला आहे. या दोन्हीही योजनांमधून लाभार्थींना दरमहा नियमित अनुदान देता यावे, ही बाब विचारात घेऊन संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत रु.६२५ कोटी तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतंर्गत रु. १ हजार १९४ कोटी निधी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना माहे ऑक्टोबर २०२२ मध्ये वितरीत करण्यात आला आहे, अशी माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रसिद्धीस देण्यात आली आहे.

Niradhar Yojana Maharashtra 2022

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: