muskmelon farming शेतीमध्ये हटके प्रयोग खरबूज लागवड, अवघ्या 70 दिवसात उत्पन्न, पहा सविस्तर माहिती
Table of Contents
खरबूज लागवड Muskmelon farming
महाराष्ट्रात खरबूजाची लागवड २३८ हेक्टर क्षेत्रावर केली जाते. उन्हाळी हंगामात नदीच्या पात्रात तसेच बागायती पीक म्हणून खरबूज पीक घेतले जाते. मात्र आता या पिकाची लागवड व्यापारी तत्वावर पॉलीहाऊसमध्येही करण्यात येत आहे. पॉलीहाऊसमधील नियंत्रित वातावरणामध्ये वर्षभर लागवड करता येते. पिकाचा कीड व रोग यापासून चांगल्याप्रकारे संरक्षण करता येते. फळधारणा चांगल्या प्रकारे होते, तसेच पाणी आणि खत व्यवस्थापन उत्तम प्रकारे करता येते.
खरबुजाचे फळ मधुर व स्वादिष्ट असते. त्याला एक प्रकारचा सुघंध असतो. या फळामध्ये चुना , फॉस्फरस ही खनिजे व अ ,ब ,क जीवनसत्वे काही प्रमाणात असतात.
खरबूज लागवड जमीन, पाणी व हवामान
मध्यम काळी पाण्याची निचरा होणारी जमीन या पिकास योग्य असते. या पिकांकरता जमिनीचा सामू ५.५ ते ७ योग्य असतो. दोन्ही पिकासाठी उष्ण व कोरडे हवामान आणि भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो. वेलींची वाढ होण्याकरिता २४ अंश सेल्सिअस ते २७ अंश सेल्सिअस तापमान उपयुक्त असते.
तापमान कमी अधिक वाढ झाल्यास म्हणजेच १८ अंश सेल्सिअस च्या खाली व ३२ अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास वेलींच्या वाढीवर व फळधारणेवर विपरीत परिणाम होतो. २१ अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमान असल्यास बियांची उगवण होत नाही.
खरबूज हे पिक अत्यंत जास्त पाण्याला बळी पडणारे पिक असून, यामध्ये पाण्याचे योग्य नियोजन खूप महत्त्वाचे आहे. ठिबक सिंचन या पद्धतीचा अवलंब करणे अतिशय गरजेचे असून शक्यतो ४ लिटर प्रति तास क्षमता असणारी डिप लाईनची निवड करावी.
ढगाळ वातावरण असेल तर अतिशय कमी पाणी लागते. खरबुजाला फळधारणा तसेच फळ फुगवण कालावधीमध्ये जास्त पाणी लागते. २ ते ३ लिटर पाणी प्रति झाड प्रति दिन याप्रमाणे आपण पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे.
खरबूज लागवड लागवड हंगाम
खरबूज लागवड जानेवारी ते मार्च, पावसाळा – जून ते ऑक्टोबर. महिन्यात केली जाते.
लागवडीसाठी ७५ सेमी. रुंद आणि १५ सेमी उंच गादी वाफे तयार करावेत या पद्धतीतलागवड रुंद गादी वाफ्याच्या दोन्ही बाजूंना करतात. त्यामुळे वेळ गादी वाफ्यावर पसरतो व फळे पाण्याच्या संपर्कात न येत खरब होत नाहीत. यासाठी३ ते ४ मी. अंतरावर सरी पडून सरीच्या बगलेत दोन्ही बाजूंना १ ते १.५ मी. अंतरावर ३ ते ४ बिया टोक्याव्यात.
खते व्यवस्थापन
प्रति हेक्टर २०० :१००: १०० नत्रः स्फुरद : पालाश प्रती हेक्टर द्यावे. नायट्रोजनची मात्रा लागवड करतेवेळी तसेच वाढीच्या अवस्थेमध्ये करावी. फॉस्परस करिता सिंगल सुपर फॉस्पेट या खताचा वापर करावा. पोटॅश हा घटकदेखील वाढीच्या सुरवातीपासून लागतो या प्रमाणे याचे नियोजन करावे.
५० किलो नत्र,५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश लागवडीपुर्व द्यावा व लागवडीनंतर १ महिन्यांनी ५०किलो नत्राचा दुसरा हफ्ता द्यावा. जमिनीच्या मगदुराप्रमाणे पिकास पाणी द्यावे वेलीच्या वाढीच्या काळात ५ ते ७ दिवसांच्या अंतराने व फळधारणा होऊन फळ वाढू लागल्यावर ८ते १० दिवसांच्याअंतरानेपाणी द्यावे.
मायक्रोन्यूट्रियंट व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचाही संतुलित वापर करणे खूप महत्त्वाचे आहे. फळाला छेद जाऊ नये म्हणून सुरवातीपासून कॅल्शियम व बोरॉन या दोन्ही अन्नद्रव्यांचा संतुलित वापर करणे महत्त्वाचे असते.
खरबूज वाण
पक्व फळे काढल्यानंतर कोरोगेटेड बॉक्समध्ये फोमनेटच्या सहाय्याने पॅकिंग करून फळे विक्रीसाठी पाठविली जातात. प्रती वेल १.५ किलोपर्यंत फळे मिळतात. खरबुजाचे हेक्टरी उत्पादन २५० ते १५० क्विंटल येते.
Muskmelon farming रोग
केवडा डाऊनी मिल्ड्यू – या रोगाच्या नियंत्रणासाठी एम झेड 72 25 ग्रॅम किंवा फोसेटील 20 ग्रॅम +मॅन्कोझेब 20 ग्राम 10 लिटर पाण्यात मिसळून 6 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. Melydi deo 600gm acr किंवा कर्झेट 600gm acr यांचा देखील उपयोग केवडा डाऊनी मिल्ड्यू साठी करू शकता.
काळा करपा मॅन्कोझेब , कॅप्टन किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी. या फवारणी पानावर पडलेले टिपके देखील नाहीसे होतात.
भुरी – कार्बेन्डाझिम , ट्रायाडेमार्फ किंवा डीनोकॅप 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून सहा दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
कीटक नियंत्रण –
नागअळी- निंबोळी अर्क 4 टक्के किंवा ट्रायझोफॉस 20 मिली 10 लि. पाण्यातून फवारणी करावी
फळमाशी – क्ल्यु ल्युरचे एकरी 5 सापळे लावावेत
काळा करपा – मॅन्कोझेब अथवा कलोरोथॅलोनील किंवा कॅप्टन किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड 25 ग्रॅम, 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून – पालटून फवारणी करावी.
सुधारित जाती :-
पुसा शरबती, दुर्गापुर मधु, अर्का जीत, अर्का राजहंस, पंजाब सुनहरी.