आशा सेविकांना शासनाची खुशखबर | Asha sevika mandhan 2023

Asha sevika mandhan 2023 – राज्यातील हजारो आशा सेविका आणि गट प्रवर्तक यांना शासनाची खुशखबर, मानधनात केली मोठी वाढ. शासन निर्णय निर्गमित.

Asha sevika mandhan 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत राज्यातील आशा स्वयंसेविकांना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार एकुण ७८. सेवांपैकी नियमित ४ सेवांसाठी केंद्र शासनाकडून राष्ट्रीय आरोग्य अभियानातुन रु.3०००/- इतका मोबदला अदा करण्यात येतो.

केंद्र शासनाच्या प्राप्त होणा-या मोबदल्याच्या समप्रमाणात कमाल रु. 3०००/- पर्यंत राज्य शासनाच्या निधीतून दिला जातो.

२०२१ मध्ये शासन कडून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना राज्य शासनाच्या निधीतुन अदा करण्यात येत असलेल्या अनुक्रमे दरमहा रु.२०००/- व रु.३०००/- या मोबदल्यात अनुक्रमे दरमहा रु. १०००/- व रु.१२००/- अशी एकुण अनुक्रमे रु.३०००/- व रु.४२००/- अशी वाढ तसेच, रु.५००/- प्रतिमहा कोविड भत्ता अदा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

आशा सेविका मानधन

सद्यस्थितीत आशा स्वयंसेविका यांना राज्य शासनाचे दरमहा रु. ३५००/- व केंद्र शासनाचे रु.३०००/- असा एकुण रु. ६५००/- इतके मानधन दिले जाते.

आशा गट प्रवर्तक मानधन

तसेच, गटप्रवर्तक यांना राज्य शासनावे रु.४७००/- व केंद्र शासनाचे रु.८७७५/- असा एकुण रु. १३४७५/- मोबदला देण्यात येतो.

सध्या राज्यातील महामारीचे सावट अदयापही असल्याने त्याचा विचार करुन शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा देणा-या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक या दोन्ही घटकांच्या भुमिका महत्वाचा असल्यामुळे त्यांना दिल्या जाणा-या मोबदल्यात वाढ करण्यात आली आहे.

Asha sevika mandhan 2023 GR

PDF LINK

आता १० एप्रिल च्या या शासन निर्णयामुळे आशा स्वयंसेविका यांना राज्य शासनाच्या निधीतून अदा करण्यात येणा-या दरमहा रुपये ३५००/- या मोबदल्यात दरमहा एकूण रुपये १५००/- एवढी वाढ करन्यात आली आहे.

ज्यामुळे आता आशा सेविकांना आता ८००० प्रती माह एवढे मानधन मिळणार आहे.

तर गटप्रर्वतक यांना राज्य शासनाच्या निधीतून अदा करण्यात येणा-या दरमहा रुपये ४७००/- या मोबदल्यात दरमहा एकूण रुपये १५००/- एवढी वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

ज्यामुळे आता गतप्रवर्टक यांना १४९७५ रू एवढं मानधन मिळणार आहे.

आशा सेविका व गट प्रवर्तक यांच्या मानधनात केलेली ही वाढ १ एप्रिल २०२३ या महिन्यापासून देय होणा-या मोबदल्यात अदा करण्यात येणार आहे.

यासाठी सन २०२३-२४ या अर्थसंकल्पिय वर्षामध्ये होणा-या अंदाजे रुपये ५०७.७७ कोटी इतक्या वार्षिक आवर्ती खर्चास मान्यता देण्यात आली आहे. तसेच रुपये ५०७.७७ कोटी इतक्या वार्षिक आवर्ती खर्चाची तरतुद आगामी पावसाळी आधिवेशनामध्ये पुरवणी मागणीद्वारे करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Asha sevika mandhan 2023

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: