ऊर्जा श्रेणीत महाराष्ट्राला पुरस्कार जाहीर | SKOCH awards 2022

अतिशय महत्वाच्या आणि मानाच्या समजल्या जाणाऱ्या SKOCH State of Governance 2022 पुरस्कारात ऊर्जा विभागाला स्टार ऑफ गव्हर्नन्स SKOCH awards 2022 in power & energy पुरस्कार जाहीर झाला आहे.

नवी दिल्लीत १८ जूनला होणाऱ्या समारंभात पुरस्कार प्रदान होणार

SKOCH awards 2022

SKOCH awards

‘स्कॉच स्टेट ऑफ गव्हर्नन्स रिपोर्ट’ 2021 मध्ये महाराष्ट्राने ऊर्जा श्रेणीमध्ये राष्ट्रीय स्तरावर अव्वल स्थान पटकावले आहे. 

‘इंडिया गव्हर्नन्स फोरम’चा एक भाग म्हणून 18 जून 2022 रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या समारंभात महाराष्ट्राला ‘स्टार ऑफ गव्हर्नन्स-स्कॉच अवॉर्ड इन पॉवर अँड एनर्जी’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

याबद्दल ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी ऊर्जा विभागांतर्गत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना श्रेय देत त्यांचे अभिनंदन केले आहे.

स्कॉच ग्रुपच्या वतीने दरवर्षी शासन, अर्थ, बॅंकिंग, तंत्रज्ञान या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांसाठी हा पुरस्कार ( SKOCH awards ) दिला जातो. 18 जून 2022 रोजी सिल्व्हर ओक हॉल, इंडिया हॅबिटॅट सेंटर, लोधी रोड, नवी दिल्ली येथे हा पुरस्कार दिला जाणार आहे.

महापारेषणने ( Mahageneco ) ड्रोनचा वापर हा विशेषतः दुर्गम भागातील अति उच्च दाब वाहिन्यांचे वेळेवर सर्व्हेक्षण व देखरेख करण्यासाठी केला आहे. मुंबई उपनगर व शहरी भागातील महत्त्वाच्या पारेषण वाहिन्यांच्या जुन्या तारा बदलून नवीन एचटीएलएस कंडक्टरचा उपयोग करून वाहिन्यांच्या क्षमतेत वाढ करण्यात आली आहे.

महापारेषणने ( Mahageneco ) मोनोपोल मनोऱ्यांचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे वहिवाट मार्ग समस्या कमी करण्यासाठी व रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे.

ऊर्जा एचव्हीडीसी योजनेअंतर्गत एकूण 1 लाख 29 हजार 546 कृषीपंप ऊर्जान्वित केले. मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेअंतर्गत एकूण 99 हजार 744 कृषीपंप बसविण्यात आले. 24 एप्रिल 2021 पासून सुरू झालेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, जमाती व भटक्या विमुक्त घटकांसाठी सुमारे 12 हजार 102 घरगुती वीजजोडणी देण्यात आली.

या पुरस्कारामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: