सन २०२२ मध्येही अपेक्षेप्रमाणे खरिप पिकांची पैसेवारी ( latur Kharip paisewari ) ४७ पर्यंत घसरली, लातूर ची सुधारित खरिप पैसेवारी जाहीर. शेतकऱ्यांना पीकविमा, नुकसान भरपाई मिळण्यास अनुकूलता.
Latur Kharip paisewari 2022 Sudharit
राज्यात खरीप हंगामातील पीक परिस्थितीची पाहणी करून पैसेवारी काढली जाते. यामध्ये सुरुवातीला १५ ऑक्टोबरला हंगामी पैसेवारी जाहिर केली गेली आहे, आता शेतकऱ्यांचे लक्ष सुधारित पैसेवारी कडे लागले होते.
खरीप पिकांची सुधारीत पैसेवारी ३१ ऑक्टोबरला जाहिर करण्याची पद्धत आहे, त्यानुसार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी जिल्हाधिकारी लातूर यांनी लातूर जिल्ह्याची सुधारित पैसेवारी ( latur kharip paisevari 2022 ) जाहिर केली आहे.
लातूर जिल्ह्यात यंदा पावसाळ्यात सर्व भागात सारखा पाऊस झाला नाही. पेरण्यांना उशिराने सुरवात झाली. त्यानंतर अतिवृष्टी, शंखी गोगलगाय व सततच्या पावसामुळे खरिपातील पिकांचे पिकांचे मोठे नुकसान झाले होते.
याचा परिणाम जिल्हा प्रशासनाकडून सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या सुधारित हंगामी पैसेवारीवर झाला आहे.
लातूर जिल्ह्यातील सर्व ९५२ गावांतील खरीप हंगामाची पीक पैसेवारी सरासरी ४७ म्हणजे पन्नासपेक्षा कमी जाहीर करण्यात आली आहे. नजर अंदाजे पैसेवारीही पन्नासपेक्षा कमी जाहीर करण्यात आली होती.
जिल्ह्यात सर्वेक्षणानुसार ९५१ गावांपैकी ८३१ गावांत खरीप तर १२० गावांत रब्बीचे पिके घेण्यात येतात.
तालुकानिहाय पैसेवारी Latur Kharip paisewari 2022
लातूर- ४८, औसा – ४८, रेणापूर ४८, उदगीर ४८, अहमदपूर – ४७, चाकूर ४८, जळकोट ४६, देवणी ४८, निलंगा ४७ व शिरूर अनंतपाळ – ४८.
यावर्षी जिल्ह्यात साेयाबीनचाच पेरा अधिक झाला होता. लागोपाठ आलेल्या संकटांमुळे सोयाबीन हातचे गेले आहे. जिल्ह्यात एका पिशवीला किमान १० क्विंटल उत्पन्न होणे अपेक्षित आहे. आता केवळ ३ क्विंटलच उत्पन्न हाती लागले आहे. यामुळे यावेळी पैसेवारी किमान ५० च्या आत येणे अपेक्षित होते. त्यानुसार पैसेवारी जाहिर करण्यात आल्यामुळे आता शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीपोटी कोणतेही अनुदान, आर्थिक मदत, पिकविमा मिळण्यासाठी अनेक घटकांचा विचार केला जातो. यामध्ये पैसेवारीही खूप महत्त्वाची मानली जाते.
आता लातूर जिल्ह्याची पैसेवारी ( Latur Kharip paisewari ) ५० टक्क्यांच्या आत आल्याने सर्व बाबींचा लाभ मिळण्यासाठी अनुकूल वातावरण आहे.
गेल्या तीन वर्षांपासून शेतीपिकांचे मोठे नुकसान होत आहे. नियमित पावसापेक्षा परतीच्या पावसामुळे शेतीचे नुकसान होत आहे.
यामुळे पैसेवारीही कमी येत आहे. वास्तविक पहाता शेतीचे नुकसान होणे, हा प्रकारच नकारात्मक आहे. यामुळेच पैसेवारी कमी होते. परंतु, अनुदान व विम्यासाठी ही पैसेवारी योग्य असल्याचे सांगण्यात येते.