कृषी विभागात विविध पदांची भरती, जाहिरात प्रसिद्ध | krishi vibhag bharti 2023

krishi vibhag bharti 2023 – महाराष्ट्र शासन कृषी विभागात विविध पदासाठी भरती प्रक्रिया सुरू, जाहिरात प्रसिद्ध. जाणून घेऊयात सविस्तर पात्रता, अटी, विभागनिहाय पद, वेतन, ऑनलाईन अर्ज कसा करायचा.

महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागातील कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषि सहसंचालक, कोकण विभाग, औंरगाबाद विभाग, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर, लातूर विभाग कार्यालयांतर्गत रिक्त पदे भरली जाणार आहेत.

कृषि विभागातील कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त विविध नियुक्ती प्राधिकारी यांचे आस्थापनेवरील वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक, लघु टंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) पदांसाठी भरती-2023

सरळ सेवा परीक्षेद्वारे गुणवत्तेच्या आधारे निवड करून भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

krishi vibhag bharti 2023 पदाचे नाव -वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक, लघु टंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) 

या पदासाठी अर्ज करण्यास शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

  • वर्घुटंकलेखक, लघुलेखक (उच्च श्रेणी) व लघुलेखक (निम्न श्रेणी) सरळसेवेने भरणेबाबतची जाहीरात (कृषि आयुक्तालय पुणे) PDF
  • वर्ग-३ मधील सहाय्यक अधिक्षक व वरिष्ठ लिपीक संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहीरात(कोल्हापूर विभाग) PDF
  • वर्ग-३ मधील सहाय्यक अधिक्षक व वरिष्ठ लिपीक संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहीरात (नाशिक विभाग) PDF
  • वर्ग-३ मधील सहाय्यक अधिक्षक व वरिष्ठ लिपीक संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहीरात (नागपूर विभाग ). PDF
  • वर्ग-३ मधील सहाय्यक अधिक्षक व वरिष्ठ लिपीक संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहीरात (औरंगाबाद विभाग) PDF
  • वर्ग-३ मधील सहाय्यक अधिक्षक व वरिष्ठ लिपीक संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहीरात ( कोकण विभाग ठाणे ) PDF
  • वर्ग-३ मधील सहाय्यक अधिक्षक व वरिष्ठ लिपीक संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहीरात (अमरावती विभाग ) PDF
  • वर्ग-३ मधील सहाय्यक अधिक्षक व वरिष्ठ लिपीक संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहीरात (लातूर विभाग) PDF
  • वर्ग-३ मधील सहाय्यक अधिक्षक व वरिष्ठ लिपीक संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहीरात (पुणे विभाग) PDF

वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक, लघु टंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी)  वेतन श्रेणी krishi vibhag bharti 2023

लघुटंकलेखक – S-८ : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते

लघुलेखक (निम्न श्रेणी ) ९-१४ : ३८६००- १२२८०० (सुधारित – ६-१५ : ४१८००-१३२३००) अधिक महागाई भत्ता नियमाप्रमाणे इतर देय भत्ते

लघुलेखक ( उच्च श्रेणी ) S-१५ : ४१८००-१३२३०० (सुधारित – s-१६ : ४४९००-१४२४००) अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते.

सहाय्यक अधीक्षक S-13 : 35400-112400 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते.

वरिष्ठ लिपिक S-8 : 25500-81100 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते.

krishi vibhag bharti 2023 परीक्षा शुल्क

अमागास रु.७२०/-गासवर्गीय / आ. दु.घ/ अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – रु. ६५०/-

मागासवर्गीय / आ. दु.घ/ अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – रु. ६५०/-

• वयोमर्यादा –

खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 40 वर्षेमागासवर्गीय प्रवर्गासाठी 18 ते 45 वर्षे

मागासवर्गीय प्रवर्गासाठी 18 ते 45 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन krishi vibhag bharti Online application

krishi vibhag bharti 2023 Link for Application

Recruitment of Senior Clerk, Assistant Superintendent, Steno Typist, Stenographer (Lower Grade) and Stenographer (Higher Grade) in the Agriculture Department on the Establishment of various Recruitment Authorities under the Commissionerate of Agriculture-2023

Click HERE For APPLY

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवाराला कृषि विभागाच्या https://ibpsonline.ibps.in/campmar23/ या संकेतस्थळावर संकेतस्थळावर लॉगइन (Log in) करावे लागेल.

अर्ज ६ एप्रिल २०२३ पासून सुरु होतील. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2023 आहे.

उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

krishi vibhag bharti 2023 – https://ibpsonline.ibps.in/campmar23/

अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. या भरतीकरिता अधिक माहिती krishi.maharashtra.gov.in या वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.

तसेच ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणा दिनांक ६ एप्रिल, २०२३ पासून दिनांक 30 एप्रिल, २०२३ या कालावधीमध्ये करता येईल. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

krishi vibhag bharti 2023 – कृषी भरती परीक्षेचा अभ्यासक्रम

सदर परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम शासन अधिसूचना कृषि व पदुम विभाग, दि. २८ नोव्हेंबर, २०१८ अन्वये विहित करण्यात आल्यानुसार राहील.

विभागीय परीक्षेसाठी दोन पेपर असतील: सामान्य विषय (पेपर- १) व कृषि विभागाचे विषय (पेपर-२).

प्रत्येक पेपरसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे १०० प्रश्न आणि तितकेच गुण आणि ९० मिनिटांचा कालावधी असेल.

कृषी भरती ऑनलाईन अर्जासाठी महत्वाच्या सूचना

ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खालील प्रमाणे आवश्यक कागदपत्रे / स्वाक्षरी इत्यादींचे स्कॅन करून ठेवावे :

छायाचित्र (४.५ सें. मी. X ३.५ सें.मी.)

स्वतःची स्वाक्षरी (काळ्या शाईने)

स्वतःच्या डाव्या अंगठ्याचा ठसा (काळ्या किंवा निळ्या शाईच्या पांढऱ्या कागदावर )

इंग्रजी भाषेतील खाली दिलेला मजकुर असलेले स्वहस्ताक्षरात लिहिलेले घोषणापत्र (पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने)

हे सर्व स्कॅन केलेले दस्तऐवज या जाहिरातीतील मुद्दा ९.३ मध्ये नमूद तपशिलाप्रमाणे आहेत याची खात्री उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी करावी.

इंग्रजी भाषेतील मोठ्या अक्षरातील (Capital Letters) स्वाक्षरी स्वीकारली जाणार नाही. डाव्या अंगठ्याचा ठसा योग्यरित्या स्कॅन केलेला असावा आणि त्यावर डाग येऊ देऊ नये. (उमेदवारास डावा अंगठा नसल्यास असा उमेदवार अर्ज करण्यासाठी उजव्या अंगठ्याचा वापर करू शकतो.)

अर्ज करण्यासाठी इतर सूचना :

उमेदवाराचे नाव, वडिलांचे, पतीचे नाव, आडनाव, आईचे नाव, जन्मदिनांक, भ्रमणध्वनी क्रमांक, छायाचित्र, स्वाक्षरी, पत्रव्यवहाराचा पत्ता ही मुलभूत माहिती आहे जी उमेदवाराला सविस्तर द्यावी लागेल.

पत्ता नमूद करताना उमेदवाराने आपल्या पत्त्याचा प्रकार निश्चित करावा. ( उदा. पत्रव्यवहाराचा पत्ता व कायमचा पत्ता किंवा दोन्ही.)

त्यानंतर उमेदवाराने अतिरिक्त माहितीच्या पर्यायावर क्लिक करावे आणि आपल्या जात प्रवर्गाबद्दल माहिती भरावी.
ज्यांच्याकडे आधार क्रमांक आहे त्यांनी तत्संबंधी माहिती भरावी तसेच उमेदवाराने आधार क्रमांक/ आधार नोंदणी क्रमांक याबद्दलची माहिती द्यावी.

मराठी भाषेतील प्राविण्य, MS-CIT प्रमाणपत्र (D.O.E.A.C.C सोसायटीच्या अधिकृत C.C.C किंवा O स्तर किंवा A स्तर किंवा B स्तर किंवा C स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र) या संबंधीची माहिती भरावी.

अनुभवाच्या जागी उमेदवाराने कृषि सहाय्यक पदावर नियमित नियुक्तीने हजर झालेला दिनांक नमूद करावा. कृषि सेवक पदावरील सेवा अनुभव म्हणून गृहीत धरली जाणार नाही.

एकदा शैक्षणिक तपशिल प्रविष्ट केल्यानंतर अर्जदारास पुढे (Next) या बटणावर क्लिक करावे लागेल, त्या बटणावर क्लिक केल्यानंतर अर्जदाराकडून पुष्टीची विनंती केली जाईल की त्यांनी ते बटण क्लिक केल्यास मागील तपशील संपादित करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *