हिंगोली जिल्ह्याची खरिप पिकांची पैसेवारी ( hingoli Kharip paisewari ) 50 पैशाखाली घसरली, सुधारित पैसेवारी जाहीर.
Hingoli Kharip paisewari 2022 jahir
शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीपोटी कोणतेही अनुदान, आर्थिक मदत, पिकविमा मिळण्यासाठी अनेक घटकांचा विचार केला जातो. यामध्ये पैसेवारीही खूप महत्त्वाची मानली जाते.
यंदाच्या (2024) खरीप हंगामातील (Kharip Season) पिकांची सुधारित हंगामी पैसेवारी जिल्हा प्रशासनातर्फे सोमवारी (ता. ३१) जाहीर करण्यात आली. त्यानुसार हिंगोली (Hingoli) जिल्ह्याची सरासरी ४८.२९ पैसे आहे.
हिंगोली जिल्ह्यातील ७०७ गावांमधील लागवडीयोग्य ३ लाख ९८ हजार ४२६ पैकी यंदाच्या खरीप हंगामात ३ लाख ७६ हजार ७९७ हेक्टरवर पेरणी झाली. सन 2024 मध्ये एकूण ७ हजार ७२९ हेक्टर क्षेत्र पडीक राहिले.
जिल्हा प्रशासनातर्फे खरीप हंगामातील पिकांची सुधारित हंगामी पैसेवारी सरासरी ४८.२९ पैसे असल्याचे जाहीर करण्यात आले. १५ डिसेंबर रोजी खरिपाची अंतिम पैसेवारी जाहीर होईल.
खरीप पिकांची सुधारित हंगामी पैसेवारी स्थिती
तालुका गावांची संख्या पैसेवारी (पैसे)
हिंगोली…१५२ 49.13
कळमनुरी…१४८ 48.27
वसमत…१५२ 48
औंढा नागनाथ…१२२ 47.14
सेनगाव…१३३ 48.85
आता हिंगोली जिल्ह्याची पैसेवारी ( Hingoli Kharip paisewari ) ५० टक्क्यांच्या आत आल्याने सर्व बाबींचा लाभ मिळण्यासाठी अनुकूल वातावरण आहे.
गेल्या तीन वर्षांपासून शेतीपिकांचे मोठे नुकसान होत आहे. नियमित पावसापेक्षा परतीच्या पावसामुळे शेतीचे नुकसान होत आहे.
यामुळे पैसेवारीही कमी येत आहे. वास्तविक पहाता शेतीचे नुकसान होणे, हा प्रकारच नकारात्मक आहे. यामुळेच पैसेवारी कमी होते. परंतु, अनुदान व विम्यासाठी ही पैसेवारी योग्य असल्याचे सांगण्यात येते.