मनरेगा योजनेअंतर्गत बहारणार फुल शेती – Ful Sheti Anudan Yojana 2022 पाहूया सविस्तर काय मिळणार लाभ, अटी , पात्रता , अनुदान, लागणारी कागदपत्र सविस्तर.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत राज्यात कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सलग शेतात फुल पिकाच्या लागवडी करिता अनुदान देण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गुलाब, मोगरा, निशिगंधा या फुलांची लागवड करण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी विभागाने १ ऑक्टोंबर २०२० रोजी एक पत्रक काढून राज्यात फुल पिकांची ( flower farming ) लागवड करण्यासाठीच्या अंदाजपत्रकास मंजुरी दिली आहे.
या संदर्भातील मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत या मार्गदर्शक सूचनांनुसार शेतकऱ्यांना आपल्या सलग शेतात गुलाब, मोगरा, निशिगंधा या फुल पिकांची लागवड करण्यासाठी अनुदान, आर्थिक मापदंड प्रति मनुष्य दिन २३८ ( नवीन २५६ रुपये ) प्रमाणे तयार करून ही योजना राबविण्यास मंजुरी दिली आहे, पाहूया सविस्तर
Table of Contents
Ful sheti Anudan योजनेची माहिती
सलग शेतात फुल शेती लागवड ( Ful sheti Anudan ) या योजनेमध्ये वैयक्तीक लाभार्थ्याच्या सलग शेतावर निशीगंध, मोगरा आणि गुलाब या तीन प्रकारच्या फुलपिकांची लागवड करण्यासाठी प्रती हेक्टर 2 लाख रु. पर्यंत अनुदान दिले जाते.
Ful sheti Anudan लाभार्थी पात्रता
- अनुसूचित जाती
- अनुसूचित जमाती
- भटक्या जमाती
- भटक्या विमुक्त जमाती
- दारिद्र्य रेषेखालील इतर कुटुंबे
- महिला प्रधान कुटुंबे
- शारिरीक अपंगत्व प्रधान असलली कुटुंबे
- भुसुधारक योजनेचे लाभार्थी
- इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
- अनुसूचित जमातिचे व अन्य परंपरागत वन निवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियम 2006 नुसार पात्र व्यक्ती.
- उपरोक्त 1 ते 10 प्रवर्गातील पात्र लाभार्थींना प्राधान्य देण्यात आल्यानंतर कृषी कर्ज माफी योजना 2008 नुसार-
- लहान शेतकरी (1 हेक्टर पेक्षा जास्त परंतू 2 हेक्टर पर्यंत जमीन असलेले) (जमीन मालक व कूळ)सिमांत शेतकरी
- सिमांत शेतकरी( 1 हेक्टर पर्यंत जमीन असलेले शेतकरी) (जमीन मालक व कूळ).
मग्रारोहयो साठी वरील प्रवर्गातील जॉबकार्ड धारक व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे. याचबरोबर लाभार्थी हा स्वत: जॉब कार्ड धारक असावा. या योजना करीता लाभार्थ्याला स्वत:/कुटुंबातील एखादी कार्यक्षम व्यक्ती प्रमाणीत मजुर म्हणुन घोषित करणे आवश्यक असते. लागवडी साठी खडड़े खोदणे, लागवड करणे, पाणी देणे, औषधे फवारणे हि सर्व कामे लाभधारकाने स्वत: किव्हा जॉबकार्ड धारक मजुरांकडून करुन घेणे या योजनेअंतर्गत बंधनकारक असते.
अर्ज केलेल्या लाभधारकाच्या नावे स्वतः ची जमीन असणे आवश्यक आहे, जर जमीन कूळ कायद्या खाली येत असेल व 7/12 वर कुळाचे नाव असेल तर योजना राबविण्याकरिता कुळाची संमती असणे आवश्यक आहे.
Ful sheti Anudan आवश्यक कागदपत्रे
- प्रपत्र-अ मधील अर्ज,
- प्रपत्र – ब प्रमाणे संमतीपत्र,
- अर्जदाराचे जमिनीचे सातबारा ( 7/12 ) , 8अ,
- लाभार्थी अर्जदार दारिद्र्य रेषेखालील असल्यास दाखला, अर्जदार जात प्रवर्गातील असल्यास जातीचा दाखला किव्हा तीचा उल्लेख असलेली कोणतेही अधिकृत शासनाचे पुरावे.
अर्ज कुठे करावा
वरती दिलेला विहित नमुन्यातील अर्ज ग्रामपंचायत कार्यालयात सादर करावा. शेतकऱ्याने ग्रामपंचायत मध्ये अर्ज केल्यानंतर लाभार्थीची निवड ग्रामसभे मार्फत केली जाते. पुढे ग्रामपंचायतीच्या शिफारशी सह कृषी विभागास हा अर्ज हस्तांतरीत केला जातो. यासाठी दरवर्षी एप्रिल अखेर ग्रामसभा घेणे आवश्यक आहे.
लागवडी साठी कलमे, रोपे कोठून खरेदी करावीत
- कृषी विभागाच्या रोपवाटीका
- खाजगी शासन मान्य रोपवाटिका
- सामाजिक वनीकरण विभाग किंवा अन्य शासकीय विभागाच्या रोपवाटिका
- कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिकाकलमे/रोपे खरेदी व वाहतुक लाभार्थी यांनी स्वत: करायची आहे
लागवड कालावधी
या योजनेअंतर्गत फुल शेती लागवड कालावधी हा 1 जुन ते 30 नोव्हेंबर असा आहे.
अनुदान
फुल शेती लागवड अनुदान ( Ful sheti Anudan ) योजनेअंतर्गत निशीगंध, गुलाब आणि मोगरा या फुलपिकांच्या लागवडी साठी प्रती हेक्टर कमाल रु.2 लाख इतके अनुदान (मजुरी व सामुग्री साठी) मिळते. आणि हे सर्व अनुदान एकाच वर्षात १०० % मिळते.
फुलपिकांची कलमे/रोपे तसेच खते ,औषधे व इतर साहित्य शेतकरी यांनी स्वत: खरेदी करणे आवश्यक आहे. खरेदी च्या पावत्या सादर केल्यानंतर अनुदान रक्कम लाभार्थ्याला थेट आधार लिंक बँक खात्यावर कृषी विभागाकडून देण्यात येते.
कृषी पर्यवेक्षक हे प्रत्येक लाभार्थीचे स्वतंत्र सविस्तर अंदाज पत्रक तयार करुन मंडळ कृषी अधिकारी यांना सादर करतात. मंडळ कृषी अधिकारी हे छाननी करुन शिफारशीसह तालुका कृषी अधिकारी यांना सादर करतात.
रु.10 लाख पर्यंतच्या अंदाज पत्रकास तांत्रिक मंजुरी तालुका कृषी अधिकारी देतात. उपविभागीय कृषी अधिकारी हे प्रशासकीय मान्यता देतात. प्रशासकीय मान्यता देण्यापूर्वी सदरची कामे ही ग्राम/तालुका/जिल्हा मंजूर आराखड्यात असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.प्रत्येक लाभार्थिच्या अंदाजपत्रकास स्वतंत्र तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्यात येते. प्रशासकीय मान्यतेनंतर लागवड करण्यात येते.
या योजने साठी हजेरी पत्रक (इ-मस्टर) निर्गमीत करणे, भरणे,पारित करणे, आणि कुशल व अकुशल बाबीची देयके प्रदान करण्याचे अधिकार तालुका कृषी अधिकारी यांना आहेत.
तसेच मजुरीच्या बाबतीत ग्रामरोजगार सेवक हजेरी पत्रक भरुन कृषी सहाय्यकाच्या प्रती स्वाक्षरी सह तालुका कृषी अधिकारी यांना सादर करतात. तांत्रिक अधिकारी कामाचे मोजमाप घेउन मजुरीची परीगणना करतात व तालुका कृषी अधिकारी यांना सादर करतात. कृषी सहाय्यक लागवडीच्या नोंदी मापनपुस्तिकेत घेतात.तालुका कृषी अधिकारी यांना हजेरी पत्रकाचे देयक प्रदान करण्यासाठी डिजिटल स्वाक्षरीदार म्हणुन घोषित करण्यात आलेले आहे.
तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील सहाय्यक अधिक्षक/कृषी अधिकारी हे प्रथम स्वाक्षरीदार तर तालुका कृषी अधिकारी हे द्वितीय स्वाक्षरीदार असतात.
तालुका कृषी अधिकारी यांचे कडुन हजेरी पत्रका संबंधीत देयके मंजूर झाल्यानंतर तहसिल कार्यालयातील क्लर्क कम डाटा एंट्री ऑपरेटर मार्फत वेज लिस्ट/मटेरियल लिस्ट तयार करुन तालुका कृषी अधिकारी यांचे कडे पाठविण्यात येते.
वेजलिस्ट/ मटेरियल लिस्टची प्रिंट काढुन तालुका कृषी अधिकारी स्वाक्षरी करतात.
तालुका कृषी अधिकारी यांनी साक्षांकित केलेल्या वेजलिस्ट/ मटेरियल लिस्ट प्राप्त झाल्यानंतर दोन दिवसात F T O तयार करुन प्रदानासाठी बँक/पोस्ट ऑफिसला पाठवण्यात येते. दर 15 दिवसांनी हजेरीपत्रका प्रमाणे मजुरी दिली जाते. मजुरीची रक्कम फक्त बँक/पोस्ट मार्फत दिली जाते.
Flower sheti / ful sheti anudan guidelines PDF