Free e ration card आता नागरिकांना मिळणार मोफत, gr निर्गमित

राज्य शासनाने आता नागरिकांना Free e ration card देण्याचा निर्णय घेतला आहे, शासन निर्णय निर्गमित.

Free e ration card

Free e ration card GR 16 May 2023

राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत ईशिधापत्रिका सुविधा ही सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लुट थांबविण्यासाठी निःशुल्क ( Free e ration card ) उपलब्ध करुन देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतलेला आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत ई-शिधापत्रिका सुविधा नि:शुल्क उपलब्ध 

शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमार्फत (RCMS) राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांकरिता QR Code आधारित ईशिधापत्रिका ऑनलाईन तसेच डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सदर शिधापत्रिकेवर योजनेबाबत अंत्योदय अन्न शिधापत्रिका (AAY), प्राधान्य कुटुंब योजना (PH) व राज्य योजनेंतर्गत APL Farmer, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेव्यतिरिक्त (NPH) असे नमूद करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने ई-शिधापत्रिका सुविधेकरिता सेवानिहाय शुल्क आकारण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.

मात्र राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचे व राज्य योजनेचे शिधापत्रिकाधारक हे गरीब व गरजु कुटुंबातील आहेत. त्यामुळे राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या व राज्य योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत ऑनलाईन ई शिधापत्रिका सुविधेकरीता सेवा शुल्क आकारणी योग्य नसल्याने हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

शासन निर्णय 📄PDF येथे पहा 👇

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत ईशिधापत्रिका सुविधा नि:शुल्क उपलब्ध 

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या (अंत्योदय अन्न योजना (AAY) व प्राधान्य कुटुंब योजना (PHH) ) व राज्य योजनेच्या (आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील APL शेतकरी) अशा सर्व शिधापत्रिकाधारकांना ऑनलाईन सेवेद्वारे ई-शिधापत्रिका सुविधा निःशुल्क (मोफत) उपलब्ध करून देण्यात येईल.

अर्जदार यांनी शिधापत्रिकेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर प्रचलित कार्यपद्धतीनुसार तपासणी करून योजनेच्या प्रकारानुसार ऑनलाईन ई शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यात येईल. अर्जदारास संबंधित संकेतस्थळावरून सदर ई-शिधापत्रिका डाऊनलोड करता येईल. सदर आदेश या शासन निर्णयाच्या दिनांकापासून लागू होतील..

सरकारी काम व सहा महिने थांब” या उक्तीप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांना पूर्वी रेशनकार्डसाठी तहसिल कार्यालयाचे, परिमंडळ कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत होते. त्यात प्रत्येक वेळी वेगवेगळ्या कागदपत्रांसाठी पिळवणूक करण्यात येत होती.

आता या सर्व कचाट्यातून सर्वसामान्य नागरिकांची सुटका शासनाने केलेली आहे. आता दलालांचा धंदा बंद होणार असून, सामान्य नागरिकास घरपोच कसलाही खर्च न करता मोफत रेशनकार्ड उपलब्ध होणार आहे.

अर्जदार यांनी शिधापत्रिकेसाठी https://rcms.mahafood.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर प्रचलित कार्यपध्दतीनुसार तपासणी करुन योजनेच्या प्रकारानुसार ऑनलाईन ई-शिधापत्रिका उपलब्ध करुन देण्यात येईल.

अर्जदारास RCMS च्या संकेतस्थळावरुन Public Login मधून ई शिधापत्रिका डाऊनलोड करता येईल. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळनार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: