Farmer Id देशभरात agri stack scheme च्या अंतर्गत शेतकऱ्यांना एक विशिष्ठ ओळखपत्र क्रमांक दिला जात आहे. वनपट्टा प्राप्त अनुसूचित जमाती व पारंपरिक वननिवासी शेतकऱ्यांसाठी खास मोहीम

Farmer Id Agristack scheme 2.0
वनपट्टा प्राप्त अनुसूचित जमाती व पारंपरिक वननिवासी शेतकऱ्यांसाठी खास मोहीम
राज्यातील वनपट्टे धारक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी आणि कृषी क्षेत्राच्या डिजिटल परिवर्तनाला गती देणारी महत्त्वपूर्ण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या Agristack ‘Farmer ID’ नोंदणीसाठी राज्यभर विशेष अभियान राबविण्यात येत असून, ही नोंदणी नागरी सुविधा केंद्र (CSC) मार्फत पूर्णपणे मोफत स्वरूपात दिली जाणार आहे.
शासन निर्णयानुसार, कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘Farmer ID’ नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, वनहक्क अधिनियम, २००६ अंतर्गत वनपट्टा प्राप्त केलेल्या अनुसूचित जमाती व पारंपरिक वननिवासी शेतकऱ्यांसाठी ही मोहीम खास राबविण्यात येत आहे.
या उपक्रमामुळे वनपट्टे धारक शेतकऱ्यांचा शासकीय योजनांमध्ये अधिक प्रभावी सहभाग सुनिश्चित होणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या जवळील CSC केंद्रावर जाऊन आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी करावी.
What is Farmer ID Agri stack scheme
केंद्र शासनाच्या माध्यमातून पिक, जमीन, उत्पादन या सर्वांची आकडेवारी मिळविण्यासाठी आणलेली एक डिजिटल योजना म्हणजे Agristack scheme.
ऍग्रीस्टॅक ही डिजिटल शेतीची क्रांतिकारक संकल्पना आहे, जी शेतकरी, ग्राहक, विक्रेते आणि शासन यांना एकाच डिजिटल व्यासपीठावर जोडते. या माध्यमातून शेतीसंबंधी सर्व माहिती अचूक, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध होते.
यामध्ये Farmer ID अर्थात शेतकरी विशिष्ट ओळखपत्र क्रमांक हा एक अद्वितीय ओळख क्रमांक असून तो ऍग्रीस्टॅक अंतर्गत तयार केला जातो. यात शेतकऱ्यांचा आधार क्रमांक, जमीन मालकी (सातबारा उतारा) यांसारखी माहिती समाविष्ट असते.
Importance of Farmer ID
फार्मर आयडीमुळे शेतकऱ्यांना पुढील सुविधा मिळतात.
प्रधानमंत्री किसान, पिक विमा, नुकसान भरपाई, महाडीबीटीसारख्या योजनांचा थेट लाभ,
डिजिटल कर्ज वितरण जलदगतीने,
किमान आधारभूत किंमत नोंदणी व पारदर्शक व्यवहार, विविध शासकीय योजनांमध्ये अडथळे विना प्रवेश
फार्मर आयडीच्या माध्यमातून हवामान अंदाज, मृदा आरोग्य माहिती, पिक सल्ला यांसारख्या अचूक आणि वैयक्तिक सेवा शेतकऱ्यांना उपलब्ध होतात.
अतिउत्पादनक्षम शेतीसाठी मार्गदर्शन शेतकरी नवीन तंत्रज्ञान, योग्य सरकारी मदत आणि डिजिटल माहितीचा उपयोग करून अधिक उत्पादन आणि नफा मिळवू शकतात.
शेतकऱ्यांना सर्व शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी व पारदर्शकपणे मिळावा, यासाठी ऍग्रीस्टॅक प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. या डिजिटल उपक्रमामुळे शेती क्षेत्रात क्रांती घडणार असून प्रत्येक शेतकऱ्याचा डेटा सुरक्षित, अचूक व सुलभ होईल.
शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषी सहाय्यक, ग्रामसेवक किंवा ग्राम महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपला ऍग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी त्वरित तयार करून घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.



Pingback: Pm Kisan Ineligibility या शेतकऱ्यांचा हप्ता होणार बंद22
Pingback: MahaDBT Seed Subsidy 100% अनुदान भुईमुंग बियाणे, अर्ज सुरू