Kharip PikVima या ३ जिल्ह्यातील ३६ महसूल मंडळ वगळली, खासदार पीकविमा प्रश्नी मैदानात

Kharip Pikvima खरीप हंगाम 2025 मध्ये सर्वाधिक नुकसानग्रस्त झालेली धाराशिव सोलापूर आणि लातूर जिल्ह्यातील जवळजवळ 36 महसूल मंडळ पिक विमा वाटपापासून वंचित ठेवण्यात आलेले आहेत या महसूल मंडळातील पिक विमा प्रश्नी धाराशिव चे खासदार ओमराजे निंबाळकर आक्रमक.

Kharip PikVima

Kharip Pikvima 2025

खरीप हंगाम 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि याचप्रमाणे लातूर सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये देखील पावसाने घातलेल्या थैमानामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते.

सुरुवातीला पिक विमा कंपनीच्या माध्यमातून धाराशिव आणि लातूर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पिक विमा देण्यासाठी टाळाटाळ केली होती पिक विम्याचा प्रश्न जिल्हास्तरीय विभागीय राज्यस्तरीय आणि केंद्रस्तरीय तक्रार निवारण समितीकडे गेलेला होता. 14 जुलै 2026 रोजी केंद्रस्तरीय तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून या पिक विमा कंपनीला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा सात दिवसात वाटप करण्याचे आदेश दिले आहेत.

मात्र हा पिक विमा वितरित केला जात असताना पिक विमा कंपनीच्या माध्यमातून अद्यापही लातूर सोलापूर आणि धाराशिव या तीन जिल्ह्यांमधील जवळजवळ 36 महसूल मंडळा वगळली आहे.

यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव ग्रामीण, आंबेजवळगाव, पाडोळी, जेवळी, धानोरी, माकणी, आनाळा, शेळगाव, जवळा, पाचपिपळा, सोनारी, आसू, शिराढोण, आणि वाशी अशा 14 महसूल मंडळाचा समावेश आहे.

तर सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी , खांडवी, आगळगाव, पांगरी, सुरडी, पानगाव, वैराग, नारी, उपळे दुमाला, सौंद्रे, आणि गौडगाव अशा बारा महसूल मंडळाचा या वगळलेल्या मंडळामध्ये समावेश आहे.

याचबरोबर लातूर जिल्ह्यामधील देखील कासार शिरसी, कासार बालकुंदा, भूत मुगळी, मदनसुरी, माथोळा, किनी थोट, किल्लारी, उजनी, लांबजना, औसा अशा दहा महसूल मंडळामध्ये पिकविमा देण्यासाठी कंपनीच्या माध्यमातून टाळाटाळ केली जात आहे.

याच प्रश्नावरती धाराशिव चे खासदार ओमराजे निंबाळकर हे आता आक्रमक होताना दिसत आहेत प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत तांत्रिक त्रुटीमुळे वगळण्यात आलेल्या या तिन्ही जिल्ह्यातील 36 महसूल मंडळाचा तातडीने समावेश करून पात्र शेतकऱ्यांना पिक विमा चा लाभ मंजूर करण्यात यावा यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे विनंती केली आहे.

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांनी तांत्रिक त्रुटीमुळे वगळलेल्या 23 महसूल मंडळाचा तात्काळ पिक विमा योजनेत समावेश करावा संबंधित शेतकऱ्यांना सर्व लाभार्थ्याप्रमाणेच पीकविमा नुकसान भरपाई तातडीने मंजूर करून द्यावी आणि भविष्यात अशा प्रकारच्या तांत्रिक त्रुटी टाळण्यासाठी कायमस्वरूपी व पारदर्शक यंत्रणा विकसित करण्यात यावी अशा प्रकारच्या काही मागण्या त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत.

#पीकविमा #प्रधानमंत्रीपीकविमायोजना #शेतकरी #धाराशिव #सोलापूर #लातूर #Kharif2025 पिकविमा

Kharif2025
Kharif2025