Aple Sarkar GR 2026 यांना मिळणार आपले सरकार सेवा केंद्र; नवीन निकष लागू

Aple Sarkar GR नवीन आपले सरकार सेवा केंद्र या उमेदवारांना मिळणार, निवडीबाबत नवीन निकष लागू.

Aple Sarkar GR 2026

आपले सरकार सेवा केंद्र Aple Sarkar GR 2026

राज्यात नागरिकांना आपले सरकार सेवा केंद्र मार्फत विविध सुविधांचा लाभ दिला जातो याच केंद्राची स्थापना करण्यासाठी उमेदवारांना आवश्यक असलेल्या पात्रतेच्या निकषांमध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून बदल करण्यात आलेला आहे. 09 July 2026 रोजी 19 जानेवारी 2018 च्या शासन निर्णयामध्ये काही बदल करून आपले सरकार सेवा केंद्र देण्याकरिता उमेदवाराची निवड करण्यासाठीचे नवीन निकष लागू करण्यात आले आहेत.

या नवीन नियमावलीनुसार ASSK VLE निवड ही केवळ किमान पात्रतेच्या आधारे न करता त्यांची शैक्षणिक गुणवत्ता डिजिटल कौशल्य पायाभूत सुविधा आर्थिक क्षमता प्रामाणिकपणा आणि नागरिकांना सेवा देण्याची क्षमता या सर्व बाबीचा अभ्यास करून केली जाणार आहे.

नवीन शासन निर्णयानुसार Aple Sarkar Seva Kendra VLE ची निवड केली जात असताना शैक्षणिक पात्रतेसाठी दहा गुण संगणक व डिजिटल साक्षरता यासाठी 15 गुण केंद्रावर असलेल्या पायाभूत सुविधा करता 15 गुण उमेदवाराची आर्थिक क्षमता यासाठी दहा गुण ग्राहक सेवा व संवाद कौशल्य मुलाखत यासाठी वीस गुण उमेदवाराचा अनुभव यासाठी दहा गुण व्यवसाय आराखडा यासाठी पाच गुण सामाजिक समावेशकता पाच गुण तर चारित्र्य पडताळणी दहा गुण अशी एकूण शंभर गुणाच्या आधारे केली जाणार आहे.

ASSK उमेदवारासाठी किमान पात्रता

  • उमेदवार हा कमीत कमी 18 वर्षे पूर्ण झालेला असावा
  • उमेदवाराचे किमान शिक्षण हे उच्च माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात बारावी उत्तीर्ण असावा.
  • उमेदवाराला संगणकाचे मूलभूत ज्ञान आवश्यक राहील यासाठी सीसीसी किंवा एमएस-सीआयटी किंवा समक्ष प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे.
  • उमेदवार हा आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी रिक्त असलेल्या जागेतील ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका या क्षेत्राचा स्थानिक रहिवासी असावा.
  • उमेदवाराकडे आधार कार्ड पॅन कार्ड आधार संलग्न बँक खातं व इतर आवश्यक ओळखपत्र असणे गरजेचे आहे.
  • या पदाची नेमणूक केली जात असताना नैतिक अध:पतन आर्थिक फसवणूक किंवा सायबर गुन्ह्याबाबत दोषारोप असलेला उमेदवार निवडला जाणार नाही.

आपले सरकार सेवा केंद्र करिता आवश्यक पायाभूत सुविधा

नवीन नियमानुसार आपले सरकार सेवा केंद्र स्थापनेसाठी किमान खालील सुविधा असणे आवश्यक आहे.

केंद्राची जागा किमान 100 चौरस फूट असावी, त्या केंद्रात दोन संगणक किंवा दोन लॅपटॉप, एक लेझर प्रिंटर, Scanner, बायोमेट्रिक उपकरण, वेबकॅम याचबरोबर केंद्राकरिता यूपीएस अथवा पर्यायी Electricity BackUp असणं आवश्यक असणार आहे.

याचबरोबर केंद्र ब्रॉडबँड इंटरनेट ग्रामीण भागासाठी कमीत कमी 10MBPS तर नागरी भागासाठी किमान 20 MBPSजोडणी केलेले असावे केंद्रामध्ये सीसीटीव्ही व्यवस्था नागरिकांसाठी  प्रतीक्षा कक्ष या सुविधा असाव्यात.

आपले सरकार सेवा केंद्र उमेदवाराच्या मुलाखतीसाठी मार्गदर्शक सूचना

केंद्र स्थापनेसाठी निवड करण्यात येणाऱ्या उमेदवाराची मुलाखत घेत असताना त्या उमेदवाराला शासकीय सेवांचे ज्ञान नागरिकाभिमुख सेवावृत्ती डिजिटल प्रणाली हाताळण्याची क्षमता समस्या सोडवण्याची क्षमता संवाद कौशल्य त्याचा प्रामाणिकपणा व नैतिकता इत्यादी बाबीचं मूल्यांकन केलं जाणार आहे.

Assk Vle करार व कराराचे नूतनीकरण

नवीन नियमावलीनुसार निवड झालेल्या उमेदवाराला तीन वर्षाचा आपले सरकार सेवा केंद्र साठीचा करार केला जाईल आणि याच्यानंतर त्या उमेदवाराने केलेल्या व्यवहाराची संख्या नागरिकांचा समाधान सेवा देण्यास लागणारा कालावधी प्राप्त तक्रारीची संख्या आणि त्याचे निराकरण प्रणालीची कार्यक्षमता आर्थिक शिस्त शासनाच्या विविध मोहिमांमध्ये सहभाग इत्यादी च्या मूल्यांकनावरती त्या कराराचं नूतनीकरण केलं जाईल.

ASSK VLE करिता अपात्रतेचे निकष

Aple Sarkar Seva Kendra Vle निवड करत असताना उमेदवाराच्या माध्यमातून खोटी बनावट कागदपत्र सादर करणे कोणत्याही शासकीय योजनेतून कार्याधित समाविष्ट करणे किंवा आर्थिक फसवणूक आणि सायबर गुन्ह्याचे प्रलंबित प्रकरण असणं इत्यादी बाबी करता त्या उमेदवाराला अपात्र केलं जाईल.

आपले सरकार सेवा केंद्र निवड प्रक्रिया.

नव्या शासन निर्णयानुसार आपले सरकार सेवा केंद्र स्थापनेसाठीच्या निवड प्रक्रियेमध्ये अर्जाची प्राथमिक छाननी पडताळणी केली जाईल गुणांकनाच्या आधारे व कागदपत्राचे परीक्षण करून उमेदवाराची निवड केली जाईल शंभर गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल प्राथमिक निवड यादी प्रसिद्ध करून त्यावरती हरकती मागवल्या जातील यानंतर अंतिम निवड यादी व नियुक्ती आदेश दिले जातील यानंतर सहा महिन्याचे अनिवार्य प्रशिक्षण आणि समाधानकारक कार्यप्रदर्शनानंतर त्या रियलीला अंतिम नियमित मान्यता दिली जाईल.

आपले सरकार सेवा केंद्र स्थापने करता निर्गमित करण्यात आलेला हा नवीन नियमावलीचा जीआर आपण खालील लिंक वरती पाहू शकता.

आपले सरकार सेवा केंद्रबाबत केंद्र शासनाच्या CSC २.० अंतर्गत मार्गदर्शक सूचनेबाबतच्या तरतुदींमध्ये सुधारणा